Homeताज्या बातम्यालोणी काळभोर गावचे सरपंचपदी नागेश काळभोर विराजमान.

लोणी काळभोर गावचे सरपंचपदी नागेश काळभोर विराजमान.

लोणी काळभोर प्रतिनिधी –  लोणी काळभोर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत नागेश अंकुशराव काळभोर यांची सरपंचपदी  बिनविरोध निवड करण्यात आली . मावळते सरपंच राहुल काळभोर यांनी सरपंचपदाचा राजीनामा दिल्याने  लोणी काळभोर ग्रामपंचायत कार्यालयात निवडणूक घेण्यात आली.यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून लोणीकंदचे मंडलअधिकारी संदीप झिंगाडे, लोणी काळभोरचे मंडल अधिकारी लक्ष्मण बांडे,  ग्रामपंचायतअधिकारी सतीश गवारी , ग्राममहसुल अधिकारी बाळासाहेब वनवे यांनी काम पाहिले . या निवडणुकीत नागेश काळभोर यांचा एकमेव अर्ज आल्याने निवडणूक अधिकारी संदीप झिंगाडे यांनी नागेश काळभोर यांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषित केले .
सन २०२१ सालच्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत तब्बल १३ सदस्य निवडून आलेल्या सत्ताधारी गटाला प्रशांत काळभोर यांच्या गटाने दुसऱ्यांदा हादरा दिल्याने केवळ चार सदस्य हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रशांत काळभोर यांच्या गटाचे निवडुन येऊन सुध्दा दुसऱ्यांदा गटासाठी सरपंचपद आणल्याबद्दल त्यांचे जिल्ह्यातून कौतुक होत आहे .
हवेली तालुक्‍यातच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यात लोकसंख्येने मोठ्या व गावकी-भावकीसाठी प्रसिद्ध असणाऱ्या लोणी काळभोर  ग्रामपंचायतीमध्ये सत्ताधारी गटाला पाच वर्षांसाठी मिळालेली सत्ता शेवटच्या काही महिन्यांसाठी गमवायची नामुष्की पत्करावी लागली आहे.
यावेळी महाराष्ट्र केसरी पै. राहुल काळभोर, हवेली बाजार समितीचे संचालक प्रशांत काळभोर यांनी नवनिर्वाचित सरपंच नागेश काळभोर यांचा सत्कार केला. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य संजय गायकवाड, ,उपसरपंच सौ.बकुळाताई पांडुरंग केसकर, ,मा.सरपंच राजाराम विठ्ठल काळभोर,योगेश काळभोर सविता लांडगे,माधुरी काळभोर राहुल काळभोर, भरत काळभोर, मा.उपसरपंच सौ प्रियांका सचिन काळभोर, ललिता काळभोर गणेश कांबळे सविता नितीन जगताप,, भारती राजाराम काळभोर, रत्नाबाई राजाराम वाळके, ज्योती अमित काळभोर, संगीताताई सखाराम काळभोर,मा सरपंच वंदना प्रशांत काळभोर सदस्य सुनील गायकवाड व ग्रामपंचायत चे आजी माजी पदाधिकारी तसेच अण्णासाहेब काळभोर,रमेश भोसले ,कमलेश काळभोर ,गुरुदेव काळभोर, युवराज काळभोर ,सतिश काळभोर , हेमंत गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते सचिन नारायण काळभोर, नितीन जगताप, पांडुरंग केसकर आदी मान्यवर व बहुसंख्येने नागरिक उपस्थित होते.
जिल्ह्यातील सर्वांत मोठ्या ग्रामपंचायतींपैकी एक असलेल्या लोणी काळभोर ग्रामपंचायतीवर यशवंत सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष माधव काळभोर व माजी जिल्हा परिषद सदस्य विलास काळभोर यांच्या नेतृत्वाखालील परिवर्तन पॅनेलचा १५ जानेवारी २०२१ रोजी झालेल्या निवडणुकीत झेंडा फडकावला होता. सतरा सदस्यांच्या असलेल्या ग्रामपंचायतीत परिवर्तन पॅनेलने तब्बल तेरा जण निवडून आले होते. तर हवेली बाजार समितीचे संचालक प्रशांत काळभोर व माजी सरपंच शरद काळभोर यांच्या नेतृत्वाखालील अष्टविनायक पॅनेलला केवळ चार जागांवर समाधान मानावे लागले होते.
गेल्या काही महिन्यापासून ग्रामपंचायतीत काही सदस्यांमध्ये सुप्त संघर्ष सुरु होता. परिणामी सत्ताधारी गटाचे अनेक सदस्य हवेली बाजार समितीचे संचालक प्रशांत काळभोर यांच्या गटाला मिळाले होते . त्यामुळे राहुल काळभोर यांनी नागेश काळभोर यांचा एका मताने सरपंचपदाच्या निवडणूकी मध्ये पराभव करुन सत्ता प्रशांत काळभोर यांच्या गटाकडे खेचून आणली होती .त्यानंतर राजकारणात बरीच उलथापालथ होऊन प्रशांत काळभोर गटाने नागेश काळभोर यांना सरपंच करण्याचे ठरविले . त्यामुळे आज बुधवार दिनांक २९ आँक्टोबर रोजी झालेल्या निवडणुकीत सरपंचपदाची माळ नागेश काळभोर यांच्या गळ्यात पडली .
सुरुवातील सत्ताधारी गटाकडे१३ सदस्यांचे संख्याबळ असतानाही साडेचार वर्षाच्या सत्तेला सुरुंग लावण्यात प्रशांत काळभोर यांच्या गटाला यश आले. त्यामुळे आता सरपंच पदासाठी झालेल्या निवडणुकीमध्ये सरपंचपद पुन्हा आपल्या गटाकडे आणण्यात यश मिळविले आहे .याबाबत प्रशांत काळभोर यांची राजनीती पुन्हा एकदा पुणे जिल्ह्यात चर्चेची ठरली असुन केवळ ४सदस्य असुन सुध्दा दोनदा सरपंचपद आपल्या गटाकडे ठेवण्यात ते यशस्वी झाले . मागील सरपंच पदाच्या निवडणूकीत केवळ एका मताने पराभव झाल्याने सर्व ग्रामस्थांना हुरहूर लागली होती. परंतु आज सरपंचपदाची माळ गळ्यात पडल्याने नवनिर्वाचित सरपंच नागेश काळभोर यांची गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली .

दुर्मिळ योगायोग – सर + पंच

नवनिर्वाचित सरपंच नागेश काळभोर यांचा आज वाढदिवस असुन त्यांना वाढदिवसाच्या दिवशी सरपंचपदाची माळ गळ्यात पडल्याने सर्व ग्रामस्थांना आनंद झाला असुन परिसरात सर नावाने ओळख असणारे नागेश काळभोर मागील सरपंचपदाच्या निवडणूकीमध्ये एका मताचा पंच बसल्यामुळे त्यांचा पराभव झाला होता . आणि आता सरपंच झाल्यामुळे सरपंच नावाने ओळखले जाणार आहेत . हा पण एक योगायोग म्हणावा लागेल.
मुख्य संपादक
चंद्रकांत दुंडे
संपर्क.8806043369

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

कुंजीरवाडी येथील धनश्री कार्यालयात मराठा समाजाची बैठक संपन्न मनोज जरांगे...

0
लोणी काळभोर प्रतिनिधी - कुंजीरवाडी (ता. हवेली) येथील धनश्री कार्यालयात मराठा समाजाची महत्त्वपूर्ण बैठक उत्साहात संपन्न झाली. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी संघर्ष करणारे मनोज...

तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता उद्योजक व्हावे.उदय काळभोर.

0
लोणी काळभोर प्रतिनिधी कदमवाकवस्ती येथील एम आयटी काॅर्नर येथे चार तरुणांनी एकत्र येत ‘सात्विक थाळी’ नावाने हॉटेल सुरू केले हॉटेलचे उद्घाटन...

कोरेगाव भिमा विजयस्तंभ परीसरात वर्षावास प्रवचन मालिकेचे उद्घाटन.

0
लोणी काळभोर प्रतिनिधी दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तालुका हवेली पूर्व च्या अंतर्गत ग्राम शाखा पेरणे फाटा यांच्या विद्यमाने ऐतिहासिक कोरेगाव भीमा ...

थेऊर येथील ‘समाधान शिबिर’ भर पावसात उत्साहात संपन्न, हवेलीतील पानंद रस्त्यांसाठी भरीव निधी उपलब्ध...

0
लोणी काळभोर प्रतिनिधी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त व दिवंगत उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांच्या प्रथम जयंती निमित्त तसेच महसूल दिनाचे औचित्यसाधून, पंचायत...

error: Content is protected !!