Homeताज्या बातम्याकारखाना चालू करण्यासाठी जमीन विक्री हा पर्याय - ...

कारखाना चालू करण्यासाठी जमीन विक्री हा पर्याय – चेअरमन सुभाष जगताप

लोणी काळभोर प्रतिनिधी – गेली चौदा वर्ष बंद राहून कर्जबाजारी झालेल्या थेऊर (ता. हवेली) येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याची ९९.२७ एकर जमीन विक्री करण्याचा पर्याय असुन तरच कारखाना चालू होऊ शकतो असे मत यशवंत सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सुभाष जगताप यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. दिनांक २६/०२/२०२५ रोजी कारखान्याची सर्वसाधारण सभा वृंदावन पॅलेस थेऊर रोड येथे होणार असुन संचालक मंडळाचे म्हणणे मांडण्यासाठी पत्रकार परिषदेत जगताप यांनी खुलासा केला. कारखान्यावर एकूण ३०० कोटी रुपयांची विविध देणणी असून जर बँकांची ओटीएस केली तर ११२कोटी रुपये कारखान्याचे वाचणार आहेत. कारखान्याच्या जमिनीचा १२ वेळा लिलाव होऊन सुद्धा ही जमीन विक्री झाली नाही .त्यामुळे हवेली तालुक्यातीलच दुसरी मोठी संस्था पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीला देण्याचा प्रस्ताव कारखान्याने दिला आहे .तसेच येणाऱ्या २६ तारखेला सर्वसाधारण सभेत तशी परवानगी सभासदांची घेण्यासाठी ही सभा घेण्यात येणार आहे. संचालक मंडळ निवडून आल्यापासून विविध पर्याय तपासून बघितले परंतु त्यातून मार्ग निघाला नसून ९९.२७ एकर जमीन विकल्याशिवाय दुसरा पर्याय नाही . असे जगताप यांनी सांगितले यावेळी व्हाईस चेअरमन किशोर उंद्रे व संचालक मंडळ उपस्थित होते. आधीच्या संचालक मंडळाने २०६ एकर जमीन गहाण ठेवली आहे तर ११७एकर जमीन विकण्याचा तसा त्यांचा प्रस्ताव होता . परंतु आत्ताच्या संचालक मंडळांनी ९९.२७ एकर जमीन विक्रीचा प्राथमिक स्वरूपाचा प्रस्ताव कृषी उत्पन्न बाजार समितीला दिला आहे आणि या दोन संस्था अण्णासाहेब मगर यांनी स्थापन केल्या असल्यामुळे जमीन बाजार समितीला देण्यासाठी व सभासदांची परवानगी घेण्यासाठी ही सभा ही सर्वसाधारण सभा आयोजित केली आहे असे जगताप यांनी सांगितले .
मुख्यसंपादक – चंद्रकांत गुलाब ढुंडे

या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी” संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. संपर्क :-

+918806043369

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता उद्योजक व्हावे.उदय काळभोर.

0
लोणी काळभोर प्रतिनिधी कदमवाकवस्ती येथील एम आयटी काॅर्नर येथे चार तरुणांनी एकत्र येत ‘सात्विक थाळी’ नावाने हॉटेल सुरू केले हॉटेलचे उद्घाटन...

कोरेगाव भिमा विजयस्तंभ परीसरात वर्षावास प्रवचन मालिकेचे उद्घाटन.

0
लोणी काळभोर प्रतिनिधी दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तालुका हवेली पूर्व च्या अंतर्गत ग्राम शाखा पेरणे फाटा यांच्या विद्यमाने ऐतिहासिक कोरेगाव भीमा ...

थेऊर येथील ‘समाधान शिबिर’ भर पावसात उत्साहात संपन्न, हवेलीतील पानंद रस्त्यांसाठी भरीव निधी उपलब्ध...

0
लोणी काळभोर प्रतिनिधी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त व दिवंगत उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांच्या प्रथम जयंती निमित्त तसेच महसूल दिनाचे औचित्यसाधून, पंचायत...

*एमआयटी एडीटी विद्यापीठाचा तेजस पाटील भारतीय फेन्सिंग संघात!*

0
* लोणी काळभोर प्रतिनिधी चीनमधील शांघायात होणाऱ्या प्रतिष्ठित ‘फॉइल ग्रँड प्रिक्स’ स्पर्धेत करणार देशाचे प्रतिनिधित्व* पुणे : येथील एमआयटी आर्ट, डिझाईन आणि तंत्रज्ञान विद्यापीठ (एडीटी), लोणी-काळभोर,...

error: Content is protected !!