Homeसामाजिकथेऊर येथील ‘समाधान शिबिर’ भर पावसात उत्साहात संपन्न, हवेलीतील पानंद रस्त्यांसाठी भरीव...

थेऊर येथील ‘समाधान शिबिर’ भर पावसात उत्साहात संपन्न, हवेलीतील पानंद रस्त्यांसाठी भरीव निधी उपलब्ध करणार- जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी.

लोणी काळभोर प्रतिनिधी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त व दिवंगत उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांच्या प्रथम जयंती निमित्त तसेच महसूल दिनाचे औचित्यसाधून, पंचायत समिती हवेली व अप्पर तहसील कार्यालय हवेली यांच्या संयुक्त विद्यमाने ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान’ अंतर्गत विशेष ‘समाधान शिबिराचे’ आयोजन, शुक्रवारी (दि. ३१) रोजी थेऊर येथील, आशीर्वाद बँक्वेट हॉल सभागृहात करण्यात आले. या शिबिरात विविध शासकीय सेवांचा लाभ नागरिकांना देण्यात आला.
यावेळी आमदार ज्ञानेश्वर कटके यांनी हवेलीतील काही डेव्हलपर्स व बिल्डर्सनी विनापरवानगी नैसर्गिक ओढे- नाले बुजविल्याने नागरी वाड्या-वस्त्यांमध्ये पावसाचे पाणी थेट शिरत असून, नागरिकांना मोठ्या संकटाला सामोरे जावे लागत आहे, हा मुद्दा ठळकपणे उपस्थित करत प्रशासनाचे लक्ष वेधून, संबंधितांवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. तसेच नदी प्रदूषणामुळे नदीकाठच्या गावांमध्ये डास व मच्छरांचा वाढलेला त्रास, यावरही उपाययोजना करण्याची गरज असल्याचे सांगितले. तसेच शिवरस्ते व पाणंद रस्त्यांसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली.
यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी महसूल दिन प्रथमच ग्रामीण भागात अभियान स्वरूपात साजरा करण्यामागील उद्देश स्पष्ट केला. भटके-विमुक्त व आदिवासी समाजातील नागरिकांना जातीचे दाखले, विविध शासकीय प्रमाणपत्रे आणि निवारा उपलब्ध करून देण्यासाठी महसूल विभाग सातत्याने कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले. आतापर्यंत सुमारे १,८०० कुटुंबांना घरे उपलब्ध करून देण्यात आली असून, जमीन व घर नसलेल्या आदिवासी कुटुंबांपर्यंत योजनांचा लाभ पोहोचविण्यासाठी प्रयत्न सुरू राहतील, असे त्यांनी नमूद केले. वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी शिवरस्ते व पाणंद रस्ते खुले करण्यात आले असून, या रस्त्यांचे डांबरीकरण करण्यासाठी जिल्हा नियोजन समिती (DPC) मधून निधी उपलब्ध करून दिला जाईल, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. पुरंदर विमानतळासाठी जमीन हस्तांतरण प्रक्रियेत महसूल अधिकाऱ्यांनी केलेल्या कामाचेही त्यांनी कौतुक केले.
हवेली पंचायत समितीचे सभापती युवराज हिरामण काकडे यांनी, लोकप्रतिनिधी म्हणून सर्वसामान्य नागरिकांना शासकीय सेवा गावोगावी उपलब्ध करून देणे हे आमचे कर्तव्य असल्याचे सांगत, भविष्यातही सर्वसामान्यांपर्यंत सेवा-सुविधा पोहोचविणार असल्याचे सांगितले.
प्रांतअधिकारी यशवंत माने व तहसीलदार तृप्ती कोलते यांनी सांगितले की, या अभियानातून आतापर्यंत ३६ हजार ४०० नागरिकांना विविध सेवांचा लाभ देण्यात आला असून, जातीचे दाखले, विविध प्रमाणपत्रांचे वाटप तसेच पाणंद रस्त्यांबाबतची कामे वेगाने सुरू आहेत. तसेच आमच्या कार्यालयास प्राप्त झालेल्या प्रकरणांचा तातडीने निपटारा करण्याचे उद्दिष्ट असल्याचे सांगितले.
यावेळी आदिवासी समाजाचे अध्यक्ष नामदेवराव भोसले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाला जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, आमदार ज्ञानेश्वर कटके, उपजिल्हाधिकारी नामदेव टिळेकर, प्रांतअधिकारी यशवंत माने, तहसीलदार तृप्ती कोलते, सभापती युवराज काकडे, उपसभापती विद्या गायकवाड, जिल्हा परिषद सदस्या सुरेखा हरगुडे, संदेश आव्हाळे, रमेशबापू हरगुडे, , सुदर्शन चौधरी, कृषिराज चौधरी, राणी वाळके, सुषमा मुरकुटे, संतोष मुरकुटे, महावितरणचे देविदास बैकर, उपभियंता महादेव धाडवे तसेच हवेलीतील सर्व ग्राम महसूल अधिकारी, मंडल अधिकारी, कर्मचारी, पोलीस पाटील आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
शिबिरात नागरिकांना विविध दाखले, महसूल विभागाच्या सेवा, महावितरण समस्या, कृषी योजनांसह विविध शासकीय योजनांचा लाभ देण्यात आला. तसेच महसूल दिनानिमित्ताने हवेलीतील सर्व महसूल अधिकारी, मंडल अधिकारी, कर्मचारी, पोलीस पाटील यांचा सभापती युवराज काकडे व तहसीलदार तृप्ती कोलते यांच्या शुभहस्ते सन्मान करण्यात आला.
पुणे फास्ट न्युज मुख्य संपादक चंद्रकांत दुंडे
संपर्क
8806043369

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सुरज चौधरी यांचेकडून पत्रकार बंधुसाठी स्नेहभेटीचे आयोजन.

0
लोणी काळभोर प्रतिनिधी - दिवाळी सणाचे औचित्य साधून पेठ गावचे आदर्श सरपंच सूरज भालचंद्र चौधरी यांच्या वतीने सर्व सन्माननीय पत्रकार बांधवांसाठी खास...

किल्ले सिंहगडावर दिपावली पहाट कार्यक्रम, हवेलीतील ऐतिहासिक वारशाच्या संवर्धनासह गडकिल्ल्यांच्या विकासासाठी कटिबद्ध- सभापती काकडे.

0
लोणी काळभोर प्रतिनिधी चंद्रकांत दुंडे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या व स्वराज्याचे तिसरे छत्रपती राजाराम महाराज आणि नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या...

अंगारकी चतुर्थी निमित्ताने थेऊर येथे भाविकांची मोठी गर्दी.

0
लोणी काळभोर प्रतिनिधी आज भाद्रपद महिन्यातील अंगारक चतुर्थी असल्याने भाविकांनी श्री चिंतामणीच्या दर्शनाला पहाटे पासून गर्दी केली होती. पहाटे पुजारी ...

यशवंत कारखान्याच्या सभेत गोंधळ घालून सभा उधळून पुन्हा बोगस सभा व खोटे प्रोसिडिंग लिहिण्याचा...

0
लोणी काळभोर प्रतिनिधी यशवंत सहकारी साखर कारखान्याची मागिल सर्वसाधारण सभा म्हणजे दिनांक २६.फेब्रुवारी.२०२५ वा दिनांक २८.सप्टेबर.२०२५ च्या सर्वसाधारण सभा म्हणजे फक्त सभासदांना दिखाव्यासाठीचा...

कुंजीरवाडी येथील धनश्री कार्यालयात मराठा समाजाची बैठक संपन्न मनोज जरांगे...

0
लोणी काळभोर प्रतिनिधी - कुंजीरवाडी (ता. हवेली) येथील धनश्री कार्यालयात मराठा समाजाची महत्त्वपूर्ण बैठक उत्साहात संपन्न झाली. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी संघर्ष करणारे मनोज...

error: Content is protected !!