लोणी काळभोर प्रतिनिधी : अनिरुद्ध मराठे.
येथील पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या माळी मळा परिसरात आज मंगळवारी (५ मे) रोजी सकाळी पेट्रोलजन्य टँकरच्या वेल्डिंगचे काम सुरू असताना टाकीत असलेल्या गॅसमुळे अचानक झालेल्या स्फोटात भाजल्यामुळे एक कामगार गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर पुण्यातील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीतील माळी मळा परिसरातील ‘भारत वेल्डिंग वर्क्स’ या वर्कशॉपमध्ये मंगळवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारांस टँकरच्या दुरुस्तीचे काम सुरू होते. काम सुरू असतानाच अचानक मोठा स्फोट झाला. स्फोटाची तीव्रता इतकी होती की वरील पत्र्याचे शेड तुटून पत्रे बाजूला उडून पडले.
या घटनेत चांद बाबू हा कामगार गंभीर भाजला. स्फोटानंतर तो शेडखाली अडकला होता. घटनेची माहिती मिळताच माजी उपसरपंच राजेंद्र काळभोर यांचेसह अजय मोरे, अनिरुद्ध मराठे आणि रामा काळे यांनी प्रसंगावधान दाखवत जखमीला बाहेर काढले आणि तातडीने रुग्णवाहिका बोलावून पुण्यातील रुग्णालयात उपचारासाठी पाठवले. स्फोटात टँकरचे मोठे नुकसान झाले असून काही अंतरावरपर्यंत आवाज ऐकू गेल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सुदैवाने इतर कोणतीही जीवितहानी झाली नाही.
संबंधित टँकरचा वापर पेट्रोल व डिझेल वाहतुकीसाठी केला जात होता. टाकीत उरलेल्या ज्वलनशील वायूंच्या साठ्यामुळे वेल्डिंगदरम्यान ठिणगी पडून स्फोट झाला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे. परंतु यांचे नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू आहे.
फोटो १) स्फोट झालेला टँकर.
२) स्फोटामुळे पत्र्याचे शेड तुटून पत्रे बाजूला उडून पडले.
मुख्य संपादक चंद्रकांत दुंडे
संपर्क.8806043369
RELATED ARTICLES
- Advertisment -
तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता उद्योजक व्हावे.उदय काळभोर.
लोणी काळभोर प्रतिनिधी
कदमवाकवस्ती येथील एम आयटी काॅर्नर येथे चार तरुणांनी एकत्र येत ‘सात्विक थाळी’ नावाने हॉटेल सुरू केले हॉटेलचे उद्घाटन...
कोरेगाव भिमा विजयस्तंभ परीसरात वर्षावास प्रवचन मालिकेचे उद्घाटन.
लोणी काळभोर प्रतिनिधी
दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तालुका हवेली पूर्व च्या अंतर्गत ग्राम शाखा पेरणे फाटा यांच्या विद्यमाने ऐतिहासिक कोरेगाव भीमा ...
थेऊर येथील ‘समाधान शिबिर’ भर पावसात उत्साहात संपन्न, हवेलीतील पानंद रस्त्यांसाठी भरीव निधी उपलब्ध...
लोणी काळभोर प्रतिनिधी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त व दिवंगत उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांच्या प्रथम जयंती निमित्त तसेच महसूल दिनाचे औचित्यसाधून, पंचायत...
*एमआयटी एडीटी विद्यापीठाचा तेजस पाटील भारतीय फेन्सिंग संघात!*
* लोणी काळभोर प्रतिनिधी
चीनमधील शांघायात होणाऱ्या प्रतिष्ठित ‘फॉइल ग्रँड प्रिक्स’ स्पर्धेत करणार देशाचे प्रतिनिधित्व*
पुणे : येथील एमआयटी आर्ट, डिझाईन आणि तंत्रज्ञान विद्यापीठ (एडीटी), लोणी-काळभोर,...