द टायग्रिष स्कुल – अन्युअल डे २०२४ – ‘नवरस’ द नाईन इमोशन्स
लोणी काळभोर प्रतिनिधी.अल्पावधितच नावारुपाला आलेल्या द टायग्रिष स्कुलचा ‘अन्युअल डे’ २४ डिसेंबर २०२४ ला मोठ्या दिमाखात साजरा झाला. या वर्षी ‘नवरस – द नाईन इमोशन’ या संकल्पनेवर आधारित कार्यक्रमाची आखणी करण्यात आली होती. कार्यक्रमाचे उदघाटन यशवंत शुगर फॅक्टरीचे व्हाईस चेअरमन मोरेश्व्र पांडुरंग काळे यांच्या हस्ते द्वीप प्रज्वलनाने करण्यात आले. तसेच यशवंत शुगर फॅक्टरीचे संचालक नवनाथ आबा काकडे यांनी सरस्वती पूजन केले. या प्रसंगी मनोज काळभोर, गणेश रसाळ, गणेश कुंजीर हे उपस्थित होते. उपस्थितांचे स्वागत संस्थेचे अध्यक्ष प्रशांत काळभोर, उपाध्यक्षा रुपाली ताई काळभोर, सचिव लिना वाघ, सल्लागार गुरुदेव आबा काळभोर सी.ई.ओ. चंद्रशेखर वाघ यांनी केले. ‘विद्यार्थ्यांना कलेच्या माध्यमातून मानवी स्वभावाच्या नऊ भावनांची माहिती होणे गरजेचे आहे. या करिता अन्युअल डे साठी ‘नवरस’ या संकल्पनेची निवड करण्यात आली. या कार्यक्रमात सादर झालेल्या नृत्य प्रकारांची कल्पकता आणि विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाची कला वाखाणण्या जोगी होती. ‘नवरस – द नाईन इमोशन्स’ म्हणजे मानवी स्वभातील नऊ भावनांचे नृत्य व नाटकाच्या माध्यमातून सादरीकरण. या मध्ये आनंद दर्शवणारा’ हास्य रस, करुण भाव जागवणारा ‘करुणा रस’, प्रेम व सुंदरतेची प्रचिती देणारा ‘शृंगाररस, आश्चर्य दर्शवणारा ‘अद्भुतरस’, मानवी मना मध्ये निर्माण होणारी घृणा दर्शवणारा ‘बीभत्सरस’, रागा व द्वेषाचे प्रदर्शन मांडणारा ‘रुद्ररस’, शांततेचे प्रतीक ‘शांतरस’, शौर्याचे वीरतेचा अनुभव देणारा ‘वीररस’. भीती निर्माण करणारा ‘भयानकरस’ यांचे विद्यार्थ्यांनी मोठया कौशल्याने सादरीकरण केले. द टायग्रिष चा अन्युअल डे म्हणजे पालक व विद्यर्थ्यांना साठी एक आनंदाची व नवीन अनुभवाची एक पर्वणीच असते. कार्यक्रमाचे नियोजन व नियंत्रण टायग्रिष टीमने केले. नृत्य शिक्षक सुयश सुरवसे व सांस्कृतिक विभाग प्रमुख नैना घंटे यांनी बाबत सविस्तर माहिती गोळा करून कार्यक्रमाची आखणी व नियोजन केले. कर्यक्रमाच्या स्टेज सजावट, नेपथ्याची जवाबदारी ज्ञानेश्वर ताते व शुभम सर यांनी सांभाळली. सूत्र संचालन आठवी व नववीच्या विद्यार्थ्यांनी केले, त्यांना पूनम सावंत व अदिती गोयल यांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांचे नियंत्रण वैशाली काळे व विद्या जगताप यांनी केले. स्टेजवरील सादरीकरण संयोजन मोनाली जयकर व शोभा लोणकर यांनी सांभाळले. पडद्या मागील जवाबदरी रोहिणी कुलकर्णी यांनी सांभाळी. सध्या सुरु असलेल्या केवळ स्टेज डेअरिंगच्या नावाखाली विद्यार्थ्यांना त्यांच्या वय व मनाला नजाणवणाऱ्या चित्रपटाला गाण्यांवर नृत करण्याचा खटाटोप सुरु असणाऱ्या व्यवहारी पद्धतीला आव्हाहन देत नैसर्गिक संकल्पनेचा शिक्षणाच्या प्रत्येक अंगाने वापर करता येऊ शकतो. हे या कार्यक्रमाच्या माध्यमातून द टायग्रिष स्कुलच्या शाला प्रशासनाने दाखवून दिले.
संपादक.चद्रकांत दुंडे
बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क 8806043369









