Homeताज्या बातम्यालोणी काळभोर जिल्हा परिषद गटात बहुजन समाज पार्टीची प्रचारात आघाडी

लोणी काळभोर जिल्हा परिषद गटात बहुजन समाज पार्टीची प्रचारात आघाडी

लोणी काळभोर प्रतिनिधी – लोणी काळभोर जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत शेवटच्या टप्प्यात रंगत आली असून बहुजन समाज पार्टीच्या जिल्हा परिषदेच्या उमेदवार नीताताई संजय आवारे यांनी मतदारसंघात सर्वत्र प्रचार करून जोरदार आघाडी घेतली आहे. त्यामुळे लोणी काळभोर जिल्हा परिषद निवडणूकीला एक वेगळाच रंग चढू लागला आहे.

तसेच लोणी काळभोर ,कदमवाकवस्ती पंचायत समिती गणात वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रकाश नारायण भिसे यांनी सुद्धा मतदारसंघात प्रचार करून शेवटच्या टप्प्यात जोरदार आघाडी घेतली आहे .यावेळी बहुजन समाज पार्टीच्या उमेदवार नीता ताई संजय आवारे यांनी सांगितले की आमचा लढा हा कुठल्याही वर्चस्वासाठी नाही की पदासाठी किंवा पैसे कमावण्यासाठी नाही .तर आमचा हा लढा सामान्य जनतेच्या मूलभूत गरजांसाठी आहे. या जनतेला फसवण्यासाठी अनेक उमेदवार आज एका पक्षाचे उद्या दुसऱ्या पक्षात दिसतात. सर्वच नेते भ्रष्ट व लबाड झाले आहेत त्यांना जनतेचे काही देणे घेणे नाही . त्यामुळे लोकशाही धोक्यात आली आहे .शेतकऱ्यांचा वाली कोणी उरला नाही पिकाला बाजार भाव मिळत नाही. बी बियाणे महाग होत चालली आहे .शाळांचे मोठ्या प्रमाणावर खाजगीकरण झाले आहे. त्यामुळे पूर्ण लूटमार चालू असून त्या लुटमारीकडे कोणाचे लक्ष नाही . दिवसेंदिवस दवाखान्याचे मोठ्या प्रमाणावर खाजगीकरण चालू असून तिथेही मनमानी कारभार चालू आहे .सरकारी दवाखाने बंद पडत आहेत.

सरकारी शाळा बंद पडत आहेत .सरकारी नोकऱ्यांचे देखील खाजगीकरण चालू आहे .भरमसाठ महागाईने तर मीठ ,मिरची , तेल याचे सामान्य जनतेला वांदे करून ठेवले आहे. पेट्रोल ,डिझेल, गॅस सिलेंडर यांचे बाजार भाव तर कधीच गगनाला भिडले आहेत . या सर्व मूलभूत प्रश्नावर कोणीही शब्द बोलत नाही निवडून आले की पाच वर्षे गायब होतात त्यामुळे मतदारांनो जागे व्हा. या भूलथापांना बळी न पडता कोणता पक्ष कोणती जात पात न पाहता बहुजन समाज पार्टीच्या नीता संजय आवारे व वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश नारायण भिसे यांना निवडून देण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. या दोन्हीही उमेदवारांचे कार्यकर्ते घरोघरी जाऊन प्रचार करत असल्यामुळे कमी कालावधीत प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे. यापुढे कमी कालावधीत घरोघरी मतदारांपर्यंत जाऊन विजय खेचुन आणु असे नीता संजय आवारे यांनी सांगितले .
मुख्य संपादक
चंद्रकांत दुंडे
8806043369

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता उद्योजक व्हावे.उदय काळभोर.

0
लोणी काळभोर प्रतिनिधी कदमवाकवस्ती येथील एम आयटी काॅर्नर येथे चार तरुणांनी एकत्र येत ‘सात्विक थाळी’ नावाने हॉटेल सुरू केले हॉटेलचे उद्घाटन...

कोरेगाव भिमा विजयस्तंभ परीसरात वर्षावास प्रवचन मालिकेचे उद्घाटन.

0
लोणी काळभोर प्रतिनिधी दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तालुका हवेली पूर्व च्या अंतर्गत ग्राम शाखा पेरणे फाटा यांच्या विद्यमाने ऐतिहासिक कोरेगाव भीमा ...

थेऊर येथील ‘समाधान शिबिर’ भर पावसात उत्साहात संपन्न, हवेलीतील पानंद रस्त्यांसाठी भरीव निधी उपलब्ध...

0
लोणी काळभोर प्रतिनिधी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त व दिवंगत उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांच्या प्रथम जयंती निमित्त तसेच महसूल दिनाचे औचित्यसाधून, पंचायत...

*एमआयटी एडीटी विद्यापीठाचा तेजस पाटील भारतीय फेन्सिंग संघात!*

0
* लोणी काळभोर प्रतिनिधी चीनमधील शांघायात होणाऱ्या प्रतिष्ठित ‘फॉइल ग्रँड प्रिक्स’ स्पर्धेत करणार देशाचे प्रतिनिधित्व* पुणे : येथील एमआयटी आर्ट, डिझाईन आणि तंत्रज्ञान विद्यापीठ (एडीटी), लोणी-काळभोर,...

error: Content is protected !!