लोणी काळभोर प्रतिनिधी – कोरेगावमुळ गावातील सर्व पक्षाने भाजपचे उमेदवार सुरज चौधरी यांना पाठिंबा देऊन निवडून आणण्याचा निर्धार केला आहे .त्यामुळे कोरेगाव मुळ गटात व गणातील उमेदवारांनी जोरदार प्रचारात आघाडी घेतली आहे . प्रचाराच्या वेळी गणात राष्ट्रवादी काँग्रेसला एकही कॅपेबल उमेदवार दिसला नाही का ? त्यामुळे त्यांनी बाहेरचा उमेदवार लादला आहे .त्यामुळे कोरेगाव मूळ गावातील नागरिकांनी व सर्व पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी भाजपचे कोरेगावमुळ गणातील उमेदवार सुरज चौधरी यांना एकमुखी पाठिंबा दिला असून प्रचंड मतांनी निवडून आणण्याचा निर्धार केला असल्याचे मत कोरेगाव मूळचे माजी सरपंच व तालुका युवा मोर्चा अध्यक्ष भाजपा , मंगेश कानकाटे यांनी सांगितले .यावेळी कोरेगाव गणातील व गटातील सर्व पक्षातील पदाधिकारी उपस्थित होते. भाजपने गणातीलच उमेदवार देऊन न्याय दिलेला असून आता वारं फिरवायचं आणि कमळ फुलवायचं आणि गणाचा मान राखायचा असा निर्धार केल्याचे मंगेश कानकाटे यांनी सांगितले . भाजपचे उमेदवार सुरज भालचंद्र चौधरी हे स्थानिक असून त्यांना सर्व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी पाठिंबा दिला आहे. भाजप हा न्याय देणारा पक्ष असून कोरेगावमूळ केसनंद गटातून जिल्हा परिषद व पंचायत समितीचे सर्व उमेदवार प्रचंड मतांनी विजयी होतील असे मंगेश कानकाटे यांनी सांगितले.
यावेळी कोरेगाव मुळचे माजी सरपंच मंगेश कानकाटे ,भानुदास जेधे ,उपसरपंच लोकेश कानकाटे ,सामाजिक कार्यकर्ते दिलीप शितोळे , विशाल आप्पा कानकाटे , योगेश सुरज जाधव ,संतोष काकडे,आप्पासाहेब कड ,अशोक शितोळे , संदीप कड , संतोष डिंबळे ,बाळासाहेब साठे चेअरमन भवरापूर ,सुहास आबा चौधरी ,आकाश घुले ,प्रविण दरेकर आदी उपस्थित होते. यावेळी अनेकांनी कोरेगाव मुळ गणातीलच स्थानिक उमेदवार निवडून आणण्यासाठी मतदारसंघात एकजुट दाखविली .तर आता केसनंद-कोरेगाव मूळ जिल्हा परिषद गटात व केसनंद,कोरेगाव मूळ पंचायत समिती गणांमध्ये वातावरण फिरले असल्याचे समोर येत आहे.भाजपच्या प्रचार सभेला जागजागी प्रचंड गर्दीने जनतेचा प्रतिसाद मिळत आहे.
लोकांमध्ये राहणारा लोकांची कामे करणारा सूरज चौधरी हा लोकांच्या घरघरात पोहोचलेला आहे.इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या माध्यमातून सर्व सामान्य कार्यकर्तांना चांगली संधी मिळाली आहे. सर्वांनी एकत्रित ताकदीने येऊन केसनंद-कोरेगाव मूळ गटाच्या सर्वांगीण विकासासाठी भाजपाच्या तिन्ही उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने विजयी करावे असे आवाहन यावेळी करण्यात आले.
मूख्य संपादक
चंद्रकांत दुंडे
संपर्क
8806043369
राष्ट्रवादी काँग्रेसने बाहेरचा उमेदवार लादला – मंगेश कानकाटे
RELATED ARTICLES
- Advertisment -
लोणी काळभोर गावच्या शिरपेचात मानाचा तुरा .युवा समाजसेवक शिवराज काळभोर यांना अमेरिका आंतराष्ट्रीय विद्यापीठाची...
लोणी काळभोर प्रतिनिधी
लहान वयापासून समाजसेवेत उल्लेखनीय कार्य करत युवकांमध्ये भक्कम ओळख निर्माण करणारे युवा समाजसेवक शिवराज मनोज काळभोर यांना “अमेरिका इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी”तर्फे समाजसेवा क्षेत्रातील...
संत निरंकारी मंडळातर्फे लोणी काळभोर येथे स्वच्छता अभियान.
लोणी काळभोर प्रतिनिधी
पद्मश्री महाराष्ट्र भूषण डॉ. श्री. दत्तात्रय नारायण तथा आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या प्रेरणेने आणि डॉ. श्री. सचिन दादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनानुसार, महाराष्ट्र...
लोणी काळभोर बाजामळा दुंडे वस्ती येथे सलग दुसऱ्या दिवशी चोरांचा धुमाकूळ.
लोणी काळभोर प्रतिनिधी
ब्रेकिंग न्यूज
लोणी काळभोर बाजारमळा दुंडे वस्ती येथे चोरट्यांनी बंद घराचे कुलुप तोडून घरातील वायरींग स्विच आणि वाररींग कामाची हत्यारे असा सुमारे...
हवेली तालुक्यात शांततेत मतदान पार पडले.
लोणी काळभोर प्रतिनिधी आज हवेली तालुक्यात . जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या मतदान शांततेत पार पडले अनेक मतदान केंद्रावर साडेसहा ते सात पर्यंत रांगा...
दिल्ली पासुन गल्ली पर्यंत भाजपच्या विकास कामाचे कौतुक – कृष्णाआप्पा चौधरी ...
लोणी काळभोर प्रतिनिधी - कोरेगाव - केसनंद जिल्हा परिषद गटातील भाजपाच्या उमेदवार सौ कविताताई विजय पायगुडे, कोरेगाव मूळ पंचायत समिती गणातील भाजपाचे...