लोणी काळभोर प्रतिनिधी
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या निमित्ताने दिनांक 31/01/2026 रोजी सायंकाळी 17/30 ते 18/50 वाजलेच्या दरम्यान जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक 2026 चे अनुषंगाने रूट मार्च चे आयोजन करण्यात आलेले होते.
सदरचा रूट मार्च – लोणी काळभोर पोलीस स्टेशन – लोणी काळभोर आठवडे बाजार मैदान -लोणी फाटा – लोणी स्टेशन चौक – समता नगर- इंदिरानगर – पालखी तळ मैदान – पाषाणकर बाग- विठ्ठल मंदिर – आलमगीर मज्जित – सावता माळी मंदिर चौक बिग बाजार चौक खोकलाई देवी माता चौक- श्री दत्त मंदिर चौक- पोलीस स्टेशन या ठिकाणी समाप्त करण्यात आला आहे.
सदरचा रूट मार्च जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने पोलीस स्टेशन हद्दीतील लोणी काळभोर व कदम वस्ती गावात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी घेण्यात आलेला होता.
सदरचा रूट मार्ग शांततेत पार पडला असून रूट मार्च करिता सहाय्यक पोलीस आयुक्त लोणी काळभोर विभाग पुणे शहर ,आम्ही स्वतः, 09 सपोनी/पोउपनि, 56 अंमलदार, पीटर मोबाईल, वन मोबाईल, सी आर मोबाईल लोणी स्टेशन मार्शल हजर होते.
मुख्य संपादक चंद्रकांत दुंडे
8806043369










