Homeताज्या बातम्याकेसनंद गावात राष्ट्रवादी पक्षाने एकाच घरातील दोन उमेदवार दिल्याने इतर गावे नाराज...

केसनंद गावात राष्ट्रवादी पक्षाने एकाच घरातील दोन उमेदवार दिल्याने इतर गावे नाराज – शामराव गावडे

लोणी काळभोर प्रतिनिधी – केसनंद गाव मतदार संख्येने मोठे असले तरी आमची पूर्व भागातील खालची गावेही महत्वाची आहे.राष्ट्रवादी पक्षाने जिल्हा परिषद ल पंचायत समितीचे उमेदवार एकाच गावात व घरात दोन उमेदवार दिल्याने केसनंद गावासह इतर गावांमधील जनता नाराज झाली आहे.बाकीच्या गावांची मते त्यांना नको आहेत.असे एकंदरीत वाटत असून यावेळी इतर गावे त्यांना दाखवून देतील.व केसनंदसह इतर गावांचे सर्वाधिक मतदान भाजपाच्या उमेदवारांनाच होणार असल्याचे मत पंचायत समितीचे माजी सदस्य तथा भाजपचे माजी तालुकाध्यक्ष शामराव गावडे यांनी सांगितले. नुकताच कोरेगाव मुळ – केसनंद जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या उमेदवार कविता विजय पायगुडे,कुशाल सातव,सूरज चौधरी यांच्या प्रचाराचा शुभारंभ
वाडेबोल्हाई येथील बोल्हाईमाता मंदिरात झाला .सभेत अनेक मान्यवरांनी भाषण केले.तर आता केसनंद-कोरेगाव मूळ जिल्हा परिषद गटात व केसनंद,कोरेगाव मूळ पंचायत समिती गणांमध्ये वातावरण फिरले असल्याचे समोर येत आहे.भाजपच्या या प्रचार शुभारंभ सभेला प्रचंड गर्दीने जनतेचा प्रतिसाद लाभला
तर सर्वांनी एकत्रित ताकदीने येऊन तिन्ही ठिकाणी पॅनल टू पॅनल ! कमळ टू कमळ मतदान झालपाहिजेत.केसनंद-कोरेगाव मूळ गटाच्या सर्वांगीण विकासासाठी भाजपाच्या तिन्ही उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने विजयी करावे असे आवाहन प्रदिप कंद यांनी भाजप उमेदवारांच्या प्रचार शुभारंभ सभेत बोलताना केले.९ हजार लोकांना स्वामी समर्थांचे दर्शन घडविणारा युवक कुशाल गोरख सातव असून गणात घरोघरी पोहोचणारा उमेदवार आहे.भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी उभा आहे.त्यामुळे स्वामी समर्थांना सह सर्वांचा आशिर्वाद कुशालला मिळाल्याशिवाय राहणार नाही.असे प्रदिप कंद यांनी सांगितले

तर अजितदादांचे योगदान महाराष्ट्रासाठी मोठे राहिले आहे.दादांचे योगदान महाराष्ट्र कधीही विसरू शकत नसल्याचे सांगून अजितदादा यांना प्रदीप कंद यांनी भर सभेत श्रध्दांजली वाहिली.

यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य दादासाहेब सातव,वाडेबोल्हाई माजी सरपंच कुशाभाऊ गावडे,माजी सरपंच संजयराव भोरडे,केसनंदचे माजी सरपंच चंद्रकांत सातव,यशवंत कारखान्याचे संचालक शामराव कोतवाल,भाजपचे उपाध्यक्ष प्रवीण काळभोर,पंचायत समितीचे माजी सदस्य शामराव गावडे,माजी सरपंच तथा बोल्हाई देवस्थान सल्लागार राजेंद्र चौधरी,वाडेबोल्हाई माजी आदर्श सरपंच दिपक गावडे,केसनंदचे माजी उपसरपंच पांडुरंग हरगुडे,युवा नेते प्रतापराव सातव,भाजपचे तालुकाध्यक्ष गणेश चौधरी ,विजय जाचक,शिरसवडीचे उपसरपंच मंगेश गावडे,युवा नेते प्रदिप शिंदे,माजी उपसरपंच योगेश गायकवाड,मंगेश कानकाटे,शिवसेनेचे तालुकाध्यक्ष विपुल शितोळे,माजी उपसरपंच सूरज भोरडे,माजी सरपंच सुजाता सावंत,ज्येष्ठ नेते विठठल गावडे,माजी सरपंच राजाराम सातव,माजी उपसरपंच हिरामण हरगुडे,शिवसेनेचे तालुकाध्यक्ष विपुल शितोळे,सांगवी सांडसचे माजी सरपंच भाऊसाहेब शिंदे,ज्येष्ठ नेते तुकाराम शिंदे,निळकंठ केसवड,माजी सरपंच वैशाली केसवड,प्रभारी सरपंच स्वाती इंगळे,राहुल शिंदे,सचिन कोतवाल,आदी विविध गावचे आजी,माजी सरपंच,उपसरपंच व मोठ्या संख्येत मतदार उपस्थित होते.यावेळी स्वर्गीय अजितदादा पवार यांना या सभेत सर्वांनी श्रध्दांजली वाहिली. यावेळी कोरेगाव मुळचे माजी सरपंच मंगेश कानकाटे ,भानुदास जेधे ,उपसरपंच लोकेश कानकाटे ,सामाजिक कार्यकर्ते दिलीप शितोळे , संतोष काकडे,आप्पासाहेब कड ,अशोक शितोळे , संदीप कड , संतोष डिंबळे ,बाळासाहेब साठे चेअरमन भवरापूर ,सुहास आबा चौधरी ,आकाश घुले ,प्रविण दरेकर आदी उपस्थित होते.
मुख्य संपादक
चंद्रकांत दुंडे
8806043369

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

*एमआयटी एडीटी विद्यापीठाचा तेजस पाटील भारतीय फेन्सिंग संघात!*

0
* लोणी काळभोर प्रतिनिधी चीनमधील शांघायात होणाऱ्या प्रतिष्ठित ‘फॉइल ग्रँड प्रिक्स’ स्पर्धेत करणार देशाचे प्रतिनिधित्व* पुणे : येथील एमआयटी आर्ट, डिझाईन आणि तंत्रज्ञान विद्यापीठ (एडीटी), लोणी-काळभोर,...

0
लोणी काळभोर प्रतिनिधी : अनिरुद्ध मराठे. येथील पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या माळी मळा परिसरात आज मंगळवारी (५ मे) रोजी सकाळी पेट्रोलजन्य टँकरच्या वेल्डिंगचे काम सुरू...

लोणी काळभोर येथील माळी मळा भीषण स्फोटामुळे हादरला.नागरीकांमध्यै घबराट.

0
ब्रेकिंग न्यूज लोणी काळभोर येथील माळीमळा येथे वेल्डिंग करतेवेळी झालेल्या स्फोटात एक जण गंभीर जखमी असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे यामुळे लोणी काळभोर परीसरात...

मोक्का गुन्हयातील येरवडा जेलमधून पळालेला व ६ वर्षासून फरार असलेला आरोपी जेरबंद : पुणे...

0
लोणी काळभोर : पुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) शनिवार (२ मे) रोजी मोक्का गुन्हयातील व येरवडा जेलमधून पळालेला ६ वर्षापासून फरार असलेला...

सोनाई इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये बारावी मध्ये पुन्हा शंभर टक्के निकाल

0
लोणी काळभोर प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण बोर्डाच्या 2 मे 2026 रोजी जाहीर झालेल्या (HSC) बारावीच्या परीक्षेत राज्यातील अनेक शाळा व कनिष्ठ...

error: Content is protected !!