Homeक्राईमखुनातील आरोपीला वीस दिवसानंतर पोलिसांनी ठोकल्या बेड्या.

खुनातील आरोपीला वीस दिवसानंतर पोलिसांनी ठोकल्या बेड्या.

पुणे प्रतिनिधी.दारु पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या रागातुन एकाच्या डोक्यात सिमेंटच्या गडूने मारहाण करून खून केल्याची घटना लोणी काळभोर परिसरात घडली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

योगेश लक्ष्मण काळभोर (वय ४५, रा. लोणी काळभोर, ता. हवेली) असे खून झालेल्याचे नाव आहे. याबाबत पोलिस अंमलदार केतन उत्तम धेंडे यांनी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून नंदू ऊर्फ पोपट लक्ष्मण म्हात्रे (वय ३९, रा. लोणी काळभोर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, योगेश काळभोर आणि सोमनाथ जाधव हे १५ डिसेंबरला सायंकाळी लोणी काळभोरमधील रायवाडी भागात दत्तात्रेय कांबळेच्या खोलीत दारू पीत बसले होते. त्यावेळी नंदूने दारू पिण्यास पैसे देत नाही, असे म्हणत योगेशला शिवीगाळ केली. त्यानंतर योगेशच्या डोक्यात सिमेंटच्या गडूने मारहाण केली. त्यात गंभीर जखमी झाल्याने योगेशला पुतण्या ऋषिकेश काळभोर याने जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल केले; परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याबाबत प्रारंभी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली.व त्यानंतर हत्या की अपघात याविषयी पोलिसांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते.यानंतर पोलिसांनी कसुन तपास करत सुमारे वीस दिवसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या पोलिसांच्या या कामगिरीचे लोणी काळभोर परिसरातून कौतुक होत आहे. तपासादरम्यान पोलिसांनी प्रत्यक्षदशों सोमनाथ जाधव, दत्तात्रेय कांबळे यांच्याकडे चौकशी केली. त्यावेळी दारू पिण्यास पैसे न दिल्याने योगेशचा खून केल्याचे उघड झाले. त्यानंतर पोलिसांनी म्हात्रेला अटक केली.
संपादक.चंद्रकांत दुंडे
बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क.8806043369
फोटो.मयत योगेश काळभोर.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता उद्योजक व्हावे.उदय काळभोर.

0
लोणी काळभोर प्रतिनिधी कदमवाकवस्ती येथील एम आयटी काॅर्नर येथे चार तरुणांनी एकत्र येत ‘सात्विक थाळी’ नावाने हॉटेल सुरू केले हॉटेलचे उद्घाटन...

कोरेगाव भिमा विजयस्तंभ परीसरात वर्षावास प्रवचन मालिकेचे उद्घाटन.

0
लोणी काळभोर प्रतिनिधी दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तालुका हवेली पूर्व च्या अंतर्गत ग्राम शाखा पेरणे फाटा यांच्या विद्यमाने ऐतिहासिक कोरेगाव भीमा ...

थेऊर येथील ‘समाधान शिबिर’ भर पावसात उत्साहात संपन्न, हवेलीतील पानंद रस्त्यांसाठी भरीव निधी उपलब्ध...

0
लोणी काळभोर प्रतिनिधी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त व दिवंगत उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांच्या प्रथम जयंती निमित्त तसेच महसूल दिनाचे औचित्यसाधून, पंचायत...

*एमआयटी एडीटी विद्यापीठाचा तेजस पाटील भारतीय फेन्सिंग संघात!*

0
* लोणी काळभोर प्रतिनिधी चीनमधील शांघायात होणाऱ्या प्रतिष्ठित ‘फॉइल ग्रँड प्रिक्स’ स्पर्धेत करणार देशाचे प्रतिनिधित्व* पुणे : येथील एमआयटी आर्ट, डिझाईन आणि तंत्रज्ञान विद्यापीठ (एडीटी), लोणी-काळभोर,...

error: Content is protected !!