Homeताज्या बातम्यापोरगं सोडलं अन् नातूच काढला… ‘त्या’ प्रचारावरून अजित पवार संतापले*

पोरगं सोडलं अन् नातूच काढला… ‘त्या’ प्रचारावरून अजित पवार संतापले*

हवेली प्रतिनिधी बारामतीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या भावनिक आवाहनावर अजित पवार यांनी तिखट प्रतिक्रिया दिली आहे. युगेंद्र पवार यांच्या प्रचारासाठी केलेल्या “साहेबांची शेवटची निवडणूक” या आवाहनाला त्यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
राज्यात निवडणुकीचा फिवर चढलेला असतानाच बारामतीचं राजकारणही ढवळून निघालं आहे. माजी केंद्रीय मंत्री शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी बारामतीवर विशेष लक्ष केंद्रीत केलं आहे. युगेंद्र पवार यांना निवडून आणण्यासाठी पवार फॅमिलीच मतदारसंघात उतरली आहे. यावेळी मतदारांना भावनिक आवाहन केलं जात आहे. साहेबांची शेवटची निवडणूक आहे. नातवाकडे लक्ष द्या, असं आवाहन शरद पवार गटाकडून केलं जात आहे. या आवाहनामुळे अजित पवार यांच्या पायाखालची चांगलीच वाळू सरकली आहे. या आवाहनावर त्यांनी आज मीडियाशी संवाद साधताना प्रतिक्रिया दिली आहे.

अजित पवार हे लोणी भापकर येथे आले होते. यावेळी त्यांनी मतदारांशी संवाद साधताना या आवाहनावर प्रतिक्रिया दिली. आता वेगवेगळे लोक भेटत आहेत. पलिकडच्यांच्या प्रचाराविषयी सांगत आहेत. सुप्रियाच्यावेळीही सांगायचे साहेबांची शेवटची निवडणूक आहे, सुप्रियाकडे लक्ष द्या. तुम्ही लक्ष दिलं. तो तुमचा अधिकार आहे. मला काही म्हणायचं नाही. आता पण साहेबांची शेवटची निवडणूक आहे, नातावाकडे लक्ष द्या…. आयला म्हटलं कठिणच झालं. पोरगं सोडलं आणि यांनी नातूच काढलाय. मी मुलासारखाच आहे ना. पुतण्या असलो तरी मुलासारखाच आहे. माझ्यात काय कमी आहे? मी काय कमी केलं आहे? असा सवाल अजित पवार यांनी मतदारांना केला आहे.
*काही वर्ष घासावी लागतात*
मागं ज्यांनी कुणी लोकसभेला निर्णय घेतला तो मला मान्य आहे. पण आताची निवडणूक माझ्या भवितव्याच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. आजच्या घडीला राजकारणात आठ दहा नावं प्रमुख आहेत. उद्धव ठाकरे, राज ठाकरे, नाना पटोले, बाळासाहेब थोरात, जयंत पाटील, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार, अशी आठ दहाच नावं आहेत. यापेक्षा अधिक नावं नाही. इथपर्यंत पोहोचायला काही वर्ष घासावी लागतात. तेव्हा कुठे नेतृत्व तयार होतं, असं अजित पवार म्हणाले.

*अजितदादांचा टोला*
काही लोक म्हणतात दादाला इंग्रजी बोलता येत नाही. परंतु युगेंद्रला देखील मराठी बोलता येत नसल्याचे खाली बसलेला कार्यकर्ता म्हणाला. यावर अजित पवार म्हणाले, मला नाही येत इंग्रजी. त्याला म्हणावं 6.5 लाख कोटी मधला टिंब कुठं असतो? असा टोला अजित पवार यांनी युगेंद्र पवार यांना लगावला.

संपादक चंद्रकांत दुंडे

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सुरज चौधरी यांचेकडून पत्रकार बंधुसाठी स्नेहभेटीचे आयोजन.

0
लोणी काळभोर प्रतिनिधी - दिवाळी सणाचे औचित्य साधून पेठ गावचे आदर्श सरपंच सूरज भालचंद्र चौधरी यांच्या वतीने सर्व सन्माननीय पत्रकार बांधवांसाठी खास...

किल्ले सिंहगडावर दिपावली पहाट कार्यक्रम, हवेलीतील ऐतिहासिक वारशाच्या संवर्धनासह गडकिल्ल्यांच्या विकासासाठी कटिबद्ध- सभापती काकडे.

0
लोणी काळभोर प्रतिनिधी चंद्रकांत दुंडे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या व स्वराज्याचे तिसरे छत्रपती राजाराम महाराज आणि नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या...

अंगारकी चतुर्थी निमित्ताने थेऊर येथे भाविकांची मोठी गर्दी.

0
लोणी काळभोर प्रतिनिधी आज भाद्रपद महिन्यातील अंगारक चतुर्थी असल्याने भाविकांनी श्री चिंतामणीच्या दर्शनाला पहाटे पासून गर्दी केली होती. पहाटे पुजारी ...

यशवंत कारखान्याच्या सभेत गोंधळ घालून सभा उधळून पुन्हा बोगस सभा व खोटे प्रोसिडिंग लिहिण्याचा...

0
लोणी काळभोर प्रतिनिधी यशवंत सहकारी साखर कारखान्याची मागिल सर्वसाधारण सभा म्हणजे दिनांक २६.फेब्रुवारी.२०२५ वा दिनांक २८.सप्टेबर.२०२५ च्या सर्वसाधारण सभा म्हणजे फक्त सभासदांना दिखाव्यासाठीचा...

कुंजीरवाडी येथील धनश्री कार्यालयात मराठा समाजाची बैठक संपन्न मनोज जरांगे...

0
लोणी काळभोर प्रतिनिधी - कुंजीरवाडी (ता. हवेली) येथील धनश्री कार्यालयात मराठा समाजाची महत्त्वपूर्ण बैठक उत्साहात संपन्न झाली. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी संघर्ष करणारे मनोज...

error: Content is protected !!