Homeराजकीयमतदारांचा विश्वास सार्थ ठरविणार.सुरज चौधरी.

मतदारांचा विश्वास सार्थ ठरविणार.सुरज चौधरी.

लोणी काळभोर प्रतिनिधी – आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीची तयारी जोरात असून,कोरेगावमुळ गणातील एक प्रबळ दावेदार पेठ गावचे आदर्श सरपंच सुरज चौधरी यांनी पुणे आवाजला दिलेल्या मुलाखतीत कोरेगावमुळ गणातील विकासासाठी मी कटिबद्ध असुन मतदारांच्या विश्वासाला कधीही तडा जावु देणार नसल्याचे सांगितले.सुरज चौधरी यांनी दाखवलेली कामाची निष्ठा, नागरिकांशी असलेला जवळचा संवाद आणि विकासासाठीची तत्परता यामुळे गणात त्यांची छाप अधिक गडद होत आहे.सरपंचपदावर असताना त्यांनी अनेक विकासकामे केली .तसेच कोरेगावमुळ गणात विकास कामाचा पाठपुरावा करत स्वतःच्या स्वखर्चातूनही ती पूर्ण केली, ही बाब नागरिकांच्या मनात त्यांच्या विषयी जास्त विश्वास निर्माण करणारी ठरली आहे. रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, ग्रामपंचायत कार्यालयाचे सुशोभीकरण ,पोलीस पाटील यांना स्वतंत्र कार्यालय ,सार्वजनिक ठिकाणे, आरोग्य सेवा या सर्व क्षेत्रांत त्यांनी प्रभावीपणे काम केले. ग्रामपंचायत कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सुरज चौधरी यांचे भरभरून कौतुक केले.करोना महामारीच्या काळात पेठ गावातच कोवीड सेंटरची उभारणी करुन अनेक रुग्ण गावातच बरे केले अनेक आरोग्य शिबिरे, नागरिकांना दिलेली तातडीची मदत आणि प्रत्येक कुटुंबाशी ठेवलेला संपर्क यामुळे त्यांचे नेतृत्व अधिक मजबूत झाले आहे.अशा पध्दतीने काम करत असताना नागरिकांची तहान भागविण्यासाठी  हिंगणगाव  येथील कांबळे वस्ती येथे स्वखर्चाने बोअर मारुन पिण्याच्या पाण्याची सोय करुन दिली आहे .तसेच संपूर्ण गणात शालेय विद्यार्थ्यांना वहयांचे  वाटप केले आहे .
अनेक गरीब व गरजु विद्यार्थ्यांना शाळेसाठी  मदत करत असुन   पूर्व हवेलीला एक सच्चा कार्यकर्ता मिळाल्याची भावना नागरिकांच्यामध्ये आहे.पुणे – सोलापूर महामार्गावर म्हसोबा फाटा येथे अपघातात २०० पेक्षा जास्त लोकांचा बळी गेला असुन येथे भुयारी मार्गासाठी ,रस्ते विभाग ,पोलीस यंत्रणा ,व खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्याशी संपर्क करुन व निवेदन देऊन तो भुयारी मार्ग मंजूर करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे .गावातील अंतर्गत रस्त्यांचे सिमेंट काँक्रीटीकरण, पावसाळयाच्या आधी ओढा खोलीकरण व ड्रेनेज लाईनची उभारणी या महत्त्वाच्या कामांसाठी ते सतत प्रयत्नशील असतात . “शहरात जशा सुविधा मिळतात तशाच सुविधा या गावातील नागरिकांनाही मिळाल्या पाहिजेत,” असा स्पष्ट मनोदय त्यांनी व्यक्त केला. त्यांनी गणाच्या विकासाबद्दल अनेक महत्त्वाची माहिती दिली. रस्ते, पाणी, स्वच्छता, वाहतूक व्यवस्थापन, आरोग्य सुविधा आणि सार्वजनिक सोयी या सर्व मुद्द्यांवर लक्ष केंद्रीत करून गणाचा सर्वांगीण विकास साधण्याचा त्यांचा संकल्प आहे.सर्व पक्षांतील नेत्यांशी त्यांनी जपलेले सौहार्दपूर्ण संबंध यामुळे नायगाव येथील एका कार्यक्रमात सर्व पक्षातील नेत्यांनी सुरज चौधरी यांना पाठिंबा दिला आहे . त्यामुळेच स्थानिकांमध्ये त्यांची दावेदारी प्रबळ मानली जाते. कोरेगावमुळ भागातील अनेक नागरिक त्यांना “हक्काचा सुरज भाऊ” मानतात. विकासकामांची निष्ठा, शहरातल्या सुविधा इथेही आणणे हा माझा ठाम मानस आहे. लोकांचा विश्वास हीच माझी मोठी ताकद आहे. एकूणच पाहता एक सक्षम, शांत-संयमी, लोकाभिमुख आणि विकासाभिमुख नेता म्हणून सुरज चौधरी यांना मतदारसंघात जोरदार पाठिंबा मिळत आहे .
मूख्य संपादक चंद्रकांत दुंडे
संपर्क.8806043369

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

लोणी काळभोर गावच्या शिरपेचात मानाचा तुरा .युवा समाजसेवक शिवराज काळभोर यांना अमेरिका आंतराष्ट्रीय विद्यापीठाची...

0
लोणी काळभोर प्रतिनिधी लहान वयापासून समाजसेवेत उल्लेखनीय कार्य करत युवकांमध्ये भक्कम ओळख निर्माण करणारे युवा समाजसेवक शिवराज मनोज काळभोर यांना “अमेरिका इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी”तर्फे समाजसेवा क्षेत्रातील...

संत निरंकारी मंडळातर्फे लोणी काळभोर येथे स्वच्छता अभियान.

0
लोणी काळभोर प्रतिनिधी पद्मश्री महाराष्ट्र भूषण डॉ. श्री. दत्तात्रय नारायण तथा आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या प्रेरणेने आणि डॉ. श्री. सचिन दादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनानुसार, महाराष्ट्र...

लोणी काळभोर बाजामळा दुंडे वस्ती येथे सलग दुसऱ्या दिवशी चोरांचा धुमाकूळ.

0
लोणी काळभोर प्रतिनिधी ब्रेकिंग न्यूज लोणी काळभोर बाजारमळा दुंडे वस्ती येथे चोरट्यांनी बंद घराचे कुलुप तोडून घरातील वायरींग स्विच आणि वाररींग कामाची हत्यारे असा सुमारे...

हवेली तालुक्यात शांततेत मतदान पार पडले.

0
लोणी काळभोर प्रतिनिधी आज हवेली तालुक्यात . जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या मतदान शांततेत पार पडले अनेक मतदान केंद्रावर साडेसहा ते सात पर्यंत रांगा...

दिल्ली पासुन गल्ली पर्यंत भाजपच्या विकास कामाचे कौतुक – कृष्णाआप्पा चौधरी ...

0
लोणी काळभोर प्रतिनिधी - कोरेगाव - केसनंद जिल्हा परिषद गटातील भाजपाच्या उमेदवार सौ कविताताई विजय पायगुडे, कोरेगाव मूळ पंचायत समिती गणातील भाजपाचे...

error: Content is protected !!