Homeताज्या बातम्यामोक्का गुन्हयातील येरवडा जेलमधून पळालेला व ६ वर्षासून फरार असलेला आरोपी जेरबंद...

मोक्का गुन्हयातील येरवडा जेलमधून पळालेला व ६ वर्षासून फरार असलेला आरोपी जेरबंद : पुणे ग्रामीण एटीएस पथकाची कामगिरी.

लोणी काळभोर : पुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) शनिवार (२ मे) रोजी मोक्का गुन्हयातील व येरवडा जेलमधून पळालेला ६ वर्षापासून फरार असलेला रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार अजिंक्य उत्तम कांबळे (वय ३१, रा.टिळेकरवाडी ता.हवेली) यास जेरबंद करण्यात यश मिळवले आहे.
२३ डिसेंबर २०१९ रोजी आरोपी अजिंक्य उत्तम कांबळे व त्याचे तिघे साथीदारांनी उरुळी कांचन न येथील प्लॉटींग व्यावसायिक विशाल खेडेकर यांना २० लाख रुपये खंडणीसाठी गाडीतून पळवून नेवून कोयत्याचा धाक दाखवून मारहाण केली. तसेच खंडणी न दिल्यास व्यावसायिक नुकसान व त्याचे कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिली होती. वगैरे फिर्यादीवरुन लोणी काळभोर पोलीस स्टेशनला खंडणी व महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सह मोक्का कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. त्यावेळी गुन्हयातील मुख्य सुत्रधार अजिंक्य कांबळे व त्याचे साथीदारांना पोलिसांनी अटक करुन त्यांची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आलेली होती.
येरवडा कारागृहात असताना जुन २०२० मध्ये अजिंक्य कांबळे व त्याचेसोबत इतर ५ आरोपी रात्रीचे वेळी खिडकीचे गज काढून पळून गेलेले होते. त्याबाबत येरवडा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. त्यावेळी जेलमधून पळून गेलेले ६ आरोपींचा पुणे शहर व पुणे ग्रामीण पोलीसांकडून शोध घेवून त्यापैकी ५ आरोपींना जेरबंद करणेत पोलीसांना यश आलेले होते. परंतु अजिंक्य कांबळे हा पोलीसांना गुंगारा देत होता.
कांबळे हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याचेवर यापूर्वी लोणी काळभोर, उरुळी कांचन व यवत पोलीस स्टेशनला खुन तसेच खंडणी, गंभीर दुखापत, मोक्का, आर्म ॲक्ट व चोरी असे एकूण ८ गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. कांबळे हा फरार असल्याने व त्याचेपासून प्लॉटींग व्यवसायिक विशाल खेडेकर यांचे जिवीतास धोका असल्याने मागील ६ वर्षापासून त्यांना पोलीस अंगरक्षक संरक्षणही देण्यात आलेले होते.
त्यास पकडणेसाठी पुणे शहर व पुणे ग्रामीण तसेच पोलीस स्टेशन व गुन्हे शाखेची वेगवेगळी स्वतंत्र पथके त्याचे मागावर होती. तो नेहमी राहण्याची ठिकाणे तसेच परराज्यात वास्तव्य करुन नाव बदलून व वेषांतर करुन राहत होता. सदर आरोपी हा परराज्यात असताना अवैध गावठी अग्नीशस्त्र विक्री करणारे गुन्हेगार यांचे संपर्कात असल्याची माहिती पुणे ग्रामीण एटीएस पथकाचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक महेश गायकवाड व पोलीस हवालदार निलेश कदम यांना मिळाली होती. सदर माहिती प्रमाणे पोलीस अधीक्षक संदिपसिंह गिल्ल यांनी त्याचा शोध घेणेसाठी एटीएस पथकाची नेमणूक केलेली होती. त्याप्रमाणे सदर पथकाने त्याची माहिती काढून त्याचेवर पाळत ठेवून उरुळी कांचन सोलापूर रोड येथून वेषांतर करून त्यास शिताफीने ताब्यात घेतलेले आहे. त्याला फरार राहणेसाठी कोणी मदत केली? त्याचे संपर्कात कोण होते? याबाबत पोलीसांकडून अधिक तपास चालू आहे.
सदर कामगिरी ही पुणे जिल्हा पोलीस अधीक्षक संदिपसिंह गिल्ल व बारामती अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांचे मार्गदर्शनाखाली दहशतवाद विरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पवार, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक महेश गायकवाड, पोलीस हवालदार निलेश कदम, सुनिल कोळी, पोलीस कॉन्स्टेबल मोसीन शेख, ओंकार शिंदे यांचे पथकाने केलेली आहे.
मुख्य संपादक चंद्रकांत दुंडे
संपर्क 8806043369

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

*एमआयटी एडीटी विद्यापीठाचा तेजस पाटील भारतीय फेन्सिंग संघात!*

0
* लोणी काळभोर प्रतिनिधी चीनमधील शांघायात होणाऱ्या प्रतिष्ठित ‘फॉइल ग्रँड प्रिक्स’ स्पर्धेत करणार देशाचे प्रतिनिधित्व* पुणे : येथील एमआयटी आर्ट, डिझाईन आणि तंत्रज्ञान विद्यापीठ (एडीटी), लोणी-काळभोर,...

0
लोणी काळभोर प्रतिनिधी : अनिरुद्ध मराठे. येथील पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या माळी मळा परिसरात आज मंगळवारी (५ मे) रोजी सकाळी पेट्रोलजन्य टँकरच्या वेल्डिंगचे काम सुरू...

लोणी काळभोर येथील माळी मळा भीषण स्फोटामुळे हादरला.नागरीकांमध्यै घबराट.

0
ब्रेकिंग न्यूज लोणी काळभोर येथील माळीमळा येथे वेल्डिंग करतेवेळी झालेल्या स्फोटात एक जण गंभीर जखमी असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे यामुळे लोणी काळभोर परीसरात...

सोनाई इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये बारावी मध्ये पुन्हा शंभर टक्के निकाल

0
लोणी काळभोर प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण बोर्डाच्या 2 मे 2026 रोजी जाहीर झालेल्या (HSC) बारावीच्या परीक्षेत राज्यातील अनेक शाळा व कनिष्ठ...

*श्रीक्षेत्र थेऊर येथील ‘महाराजस्व समाधान शिबिराला’ नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; १००० पेक्षा जास्त नागरिकांनी घेतला...

0
लोणी काळभोर प्रतिनिधी महाराष्ट्र शासनाची महत्वकांक्षी योजना असलेल्या व महसूल विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान” अंतर्गत थेऊर मंडल भागात आयोजित करण्यात...

error: Content is protected !!