Homeताज्या बातम्याश्रीक्षेत्र थेऊर येथील, सर्वरोग निदान मोफत महाआरोग्य शिबिरास नागरिकांचा भरघोस प्रतिसाद.

श्रीक्षेत्र थेऊर येथील, सर्वरोग निदान मोफत महाआरोग्य शिबिरास नागरिकांचा भरघोस प्रतिसाद.

लोणी काळभोर प्रतिनिधी चंद्रकांत दुंडे
श्रीक्षेत्र थेऊर येथे आरोग्यदूत युवराज हिरामण काकडे व पल्लवीताई काकडे यांच्या वतीने, थेऊर पेशवेवाडा येथे आयोजित करण्यात आलेल्या, सर्वरोग निदान मोफत महाआरोग्य शिबिरास स्थानिक नागरिकांचा मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिबिरामध्ये तब्बल 1770 हून अधिक नागरिकांनी सहभाग नोंदवून, समाजाच्या आरोग्याबाबतची जागरूकता अधोरेखित केली.

शिबिरादरम्यान 1260 नागरिकांची डोळ्यांची तपासणी करण्यात आली असून, त्यापैकी 820 नागरिकांना मोफत चष्म्यांचे वाटप करण्यात आले. तसेच 38 रुग्णांमध्ये मोतीबिंदू शस्त्रक्रियेची आवश्यकता निदान झाली असून या सर्वांवर पुढील काही दिवसांत मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्यदूत युवराज काकडे यांनी दिली. याशिवाय 3 नागरिकांना कृत्रिम हात व पाय मोफत देण्याची नोंदणी करण्यात आली.

या महाआरोग्य शिबिरात हृदयविकार तपासणी, सर्वसाधारण आरोग्य तपासणी, दंत तपासणी, हाडांची घनता तपासणी, स्त्रीरोग तपासणी, ईसीजी, हिमोग्लोबिन तपासणी, शुगर चाचणी, रक्तदाब मापन तसेच कान-नाक-घसा तपासणी अशा विविध सेवा नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आल्या. तसंच हात-पायांच्या कृत्रिम अवयवांसाठी नोंदणीची सुविधाही उपलब्ध होती.

या उपक्रमामुळे थेऊर परिसरातील नागरिकांना सर्वसमावेशक आरोग्य सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध झाल्या असून, शिबिराच्या यशस्वी आयोजनाबद्दल आरोग्यदूत युवराज काकडे व पल्लवीताई युवराज काकडे यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
मुख्य संपादक चंद्रकांत दुंडे
संपर्क 8806043369

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सुरज चौधरी यांचेकडून पत्रकार बंधुसाठी स्नेहभेटीचे आयोजन.

0
लोणी काळभोर प्रतिनिधी - दिवाळी सणाचे औचित्य साधून पेठ गावचे आदर्श सरपंच सूरज भालचंद्र चौधरी यांच्या वतीने सर्व सन्माननीय पत्रकार बांधवांसाठी खास...

किल्ले सिंहगडावर दिपावली पहाट कार्यक्रम, हवेलीतील ऐतिहासिक वारशाच्या संवर्धनासह गडकिल्ल्यांच्या विकासासाठी कटिबद्ध- सभापती काकडे.

0
लोणी काळभोर प्रतिनिधी चंद्रकांत दुंडे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या व स्वराज्याचे तिसरे छत्रपती राजाराम महाराज आणि नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या...

अंगारकी चतुर्थी निमित्ताने थेऊर येथे भाविकांची मोठी गर्दी.

0
लोणी काळभोर प्रतिनिधी आज भाद्रपद महिन्यातील अंगारक चतुर्थी असल्याने भाविकांनी श्री चिंतामणीच्या दर्शनाला पहाटे पासून गर्दी केली होती. पहाटे पुजारी ...

यशवंत कारखान्याच्या सभेत गोंधळ घालून सभा उधळून पुन्हा बोगस सभा व खोटे प्रोसिडिंग लिहिण्याचा...

0
लोणी काळभोर प्रतिनिधी यशवंत सहकारी साखर कारखान्याची मागिल सर्वसाधारण सभा म्हणजे दिनांक २६.फेब्रुवारी.२०२५ वा दिनांक २८.सप्टेबर.२०२५ च्या सर्वसाधारण सभा म्हणजे फक्त सभासदांना दिखाव्यासाठीचा...

कुंजीरवाडी येथील धनश्री कार्यालयात मराठा समाजाची बैठक संपन्न मनोज जरांगे...

0
लोणी काळभोर प्रतिनिधी - कुंजीरवाडी (ता. हवेली) येथील धनश्री कार्यालयात मराठा समाजाची महत्त्वपूर्ण बैठक उत्साहात संपन्न झाली. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी संघर्ष करणारे मनोज...

error: Content is protected !!