लोणी काळभोर प्रतिनिधी – उरुळी कांचन सोरतापवाडी जिल्हा परिषदेच्या निवडणूकीमध्ये गटात व दोन्ही गणात भारतीय जनता पक्षाने तगडे उमेदवार दिल्याने राजकारणात नवे समीकरण आकार घेत असल्याचे संकेत दिसत आहे .सुरुवातीला उरुळी कांचन – सोरतापवाडी गटातील वातावरण राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाजुने होते. पण तिकीट वाटपात अनेक कार्यकर्ते नाराज झाले आणि या नाराजीचा फायदा भारतीय जनता पक्षाने उचलला आणि नाराज कार्यकर्तांना आपल्याकडे घेऊन उमेदवारी दिली . त्यामुळे सामान्य माणसाचे प्रश्न सोडवण्यासाठी तयार असणाऱ्या उमेदवारांमुळे भाजपची बाजु भक्कम झाली .त्यातच सोरतापवाडी पंचायत समितीच्या निवडणुकीत उमेदवारी दाखल केलेले सुदर्शन चौधरी यांच्या पाठिशी सोरतापवाडी ग्रामस्थांनी एकमुखी समर्थनाची भक्कम भिंत उभी केली आहे.
गावातील ज्येष्ठ नागरिक, महिला बचतगट, युवकवर्ग तसेच विविध सामाजिक संस्थांच्या उपस्थितीत झालेली बैठक केवळ औपचारिक चर्चा न ठरता ग्रामस्तरावरील लोकभावनेचे संकेत देणारा महत्त्वपूर्ण क्षण ठरला. चौधरी यांच्या नावावर पडलेला एकमताचा शिक्का, स्थानिक राजकारणातील त्यांच्या वाढत्या प्रभावाचीच जणू घोषणा करतो.
सुदर्शन चौधरी यांनी सरपंचकीच्या काळात ग्रामपंचायतीमध्ये अनेक ग्रामविकासाची कामे केली . खासदार ,आमदार फंड आणून गावाचा विकास केला .कौटुंबिक वारसा लाभल्याने सातत्याने साधना, सर्वसामान्यांशी राखलेला आपुलकीचा वारसा आणि तरुणांमध्ये असलेली मजबूत पकड या घटकांमुळे सुदर्शन चौधरी यांचे नेतृत्व गावकऱ्यांच्या विश्वासाचा केंद्रबिंदू ठरले आहे. रस्ते, पाणीपुरवठा, शिक्षण, मूलभूत सुविधा तर सोडविण्यासाठी प्रयत्न केला .परंतु कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे येथे संचालक म्हणून निवड झाल्यानंतर कृषी क्षेत्रातील प्रलंबित प्रश्न सोडवण्याची क्षमता त्यांच्यात असल्याचा ठाम विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला.
सुदर्शन चौधरी यांच्या उमेदवारीकडे गणातील सर्व गावातील जेष्ठ , तरुण व लाडक्या बहिणीचा “भाऊ “ला आता भावी सभापती म्हणून बघितले जात आहे. आणि तोच नव्या उंचीवर नेणारा ‘टर्निंग पॉईंट’ ठरू शकतो. त्यामुळे सोरतापवाडी गणातील निवडणूक रंगतदार न होता भाजपमय होणार अशी चर्चा नागरिकांमध्ये आहे.सुदर्शन चौधरी हे या स्पर्धेत एक प्रभावी आणि मजबूत उमेदवार म्हणून उभे राहतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात वेगाने सुरु आहे .
मुख्य संपादक चंद्रकांत दुंडे
8806043369



















