Homeताज्या बातम्यामोटरसायकल चोरास अटक.त्याच्याकडून एक अग्नीशस्र दहा जीवंत काडतुसे व ॲक्टिव्हा मोटारसायकल जप्त.लोणी...

मोटरसायकल चोरास अटक.त्याच्याकडून एक अग्नीशस्र दहा जीवंत काडतुसे व ॲक्टिव्हा मोटारसायकल जप्त.लोणी काळभोर पोलिसांची कामगिरी.

लोणी काळभोर प्रतिनिधी दिनांक १७/१०/२०२५ रोजी सकाळी १० वाजता राजेंद्र बबनराव काळभोर (वय ५५ वर्षे रा. लोणी काळभोर ता. हवेली, जि. पुणे) यांनी त्यांची दुचाकी ॲक्टीवा गाडी नंबर एम. एच. १२ क्यु. डी. ३२३३ ही लोणी काळभोर येथील स्मशानभुमीसमोर पार्क केली असता कोणीतरी अज्ञात चोरट्याने त्यांची दुचाकी गाडी चोरुन नेली होती. या बाबत लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवीणेत आला होता.

या गुन्हयाच्या तपासादरम्यान लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील तपास पथक अधिकारी सहाय्यकपोलीस निरीक्षक कृष्णा बाबर व त्यांच्या पथकाने सतत ४ दिवसांमध्ये सुमारे १६५ कॅमेरे चेक करुन आरोपीचा शोध घेतला असता आरोपी बिबवेवाडीच्या दिशेने चोरीची मोटारसायकल घेवुन गेल्याचे निदर्शनास आले. त्या माहितीनुसार लोणी काळभोर पोलीसांनी या भागामध्ये कौशल्यपुर्णरित्या आरोपीचा शोध घेतला असता आरोपीचा ठावठिकाण्याबाबत त्यांना माहिती मिळाली. त्यानुसार सदर ठिकाणी लोणी काळभोर पोलीसांनी घेवुन अटक केली आहे.अटक मुदतीत लोणी काळभोर पोलीसांनी आरोपीकडे तपास केला असता त्याचे नाव अरुण बाबुराव देशमुख वय ६७ वर्षे रा. श्रीनिवास सोसायटी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, पुणे असे असल्याचे निष्पन्न झाले असुन त्याचेकडुन गुन्हयात चोरीस गेलेली अॅक्टीवा गाडी नंबर एम. एच. १२ क्यु. डी. ३२३३ ही दुचाकी जप्त करणेत आली आहे.

नमुद आरोपी हा चोरीचे गुन्हे करण्यात सराईत असल्याचे तपासादरम्यान निदर्शनास आल्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांचे मार्गदर्शनाप्रमाणे सपोनि कृष्णा बाबर व त्यांचे पथकाने आरोपीचे राहते घराची दि. २९/१०/२०२५ रोजी पंचांसमक्ष घरझडती घेतली. घरझडती दरम्यान नमुद आरोपीचे राहते घरातील एका बॅग मध्ये एक अग्निशस्त्र (रिव्हॉल्वर), १० जिवंत काडतुसे व बनावट चाव्या मिळुन आल्या आहेत. सदर रिव्हॉल्वर, १० जिवंत काडतुसे व ३० बनावट चाव्या पंचांसमक्ष सविस्तर पंचनाम्याने जप्त करणेत आले आहेत.

सदर गुन्हा अज्ञात आरोपींविरुध्द दाखल असताना, तसेच आरोपीतांबाबत कोणत्याही प्रकारची गाहिती नसताना देखील, लोणी काळभोर पोलीसांनी अत्यंत कौशल्यपुर्णरित्या अज्ञात चोरट्यांचा शोध घेवुन, त्यास गुन्हयात अटक करुन, त्यांचेकडुन गुन्हयातील चोरीस गेलेली दुचाकी तसेच घरझडती दरम्यान रिव्हॉल्वर, १० जिवंत काडतुसे व ३० बनावट चाव्या असा एकुण ६५०००/- रुपये किंमतीचा माल जप्त केला आहे.

सदरची उत्कृष्ठ कागगिरी मा. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ०५. डॉ. राजकुमार शिंदे, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, हडपसर विभाग, श्रीमती अनुराधा उदमले यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री राजेंद्र पन्हाळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री स्मिता पाटील, सहा. पोलीस निरीक्षक श्री कृष्णा बाबर, पो. अंमलदार सातपुते, शिरगिरे, कुदळे, पाटील, माने, विर, देवीकर, कुंभार, गाडे, कर्डीले, सोनवणे. दडस, गिरी, यांनी केली आहे.
मुख्य संपादक चंद्रकांत दुंडे
संपर्क.8806043369

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

कुंजीरवाडी येथील धनश्री कार्यालयात मराठा समाजाची बैठक संपन्न मनोज जरांगे...

0
लोणी काळभोर प्रतिनिधी - कुंजीरवाडी (ता. हवेली) येथील धनश्री कार्यालयात मराठा समाजाची महत्त्वपूर्ण बैठक उत्साहात संपन्न झाली. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी संघर्ष करणारे मनोज...

तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता उद्योजक व्हावे.उदय काळभोर.

0
लोणी काळभोर प्रतिनिधी कदमवाकवस्ती येथील एम आयटी काॅर्नर येथे चार तरुणांनी एकत्र येत ‘सात्विक थाळी’ नावाने हॉटेल सुरू केले हॉटेलचे उद्घाटन...

कोरेगाव भिमा विजयस्तंभ परीसरात वर्षावास प्रवचन मालिकेचे उद्घाटन.

0
लोणी काळभोर प्रतिनिधी दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तालुका हवेली पूर्व च्या अंतर्गत ग्राम शाखा पेरणे फाटा यांच्या विद्यमाने ऐतिहासिक कोरेगाव भीमा ...

थेऊर येथील ‘समाधान शिबिर’ भर पावसात उत्साहात संपन्न, हवेलीतील पानंद रस्त्यांसाठी भरीव निधी उपलब्ध...

0
लोणी काळभोर प्रतिनिधी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त व दिवंगत उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांच्या प्रथम जयंती निमित्त तसेच महसूल दिनाचे औचित्यसाधून, पंचायत...

error: Content is protected !!