हवेली प्रतिनिधी चंद्रकांत दुंडे
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मांजरी येथील उपबाजारात भाजीपाल्याची प्रचंड आवक झाल्याने शेतमालाचे बाजारभाव पडल्याने बळीराजा चिंताग्रस्त बनला आहे.मेथी,कोथिंबीर दोन ते पाच रुपये गड्डी या दराने विक्री होत आहे.कोथंबीरीचे बियाणे दोन किलो बियाण्याच्या पिशवीची किंमत सहाशे ते सातशे रुपयाच्या आसपास आहे.म्हणजे तिनशे ते साडेतीनशे रुपये किलो,मेथीचे बियाणे शंभर ते एकशे दहा रुपये किलो,तसेच फ्लॉवर पिकासाठी एक रोपाची किंमत ऐंशी पैसे ते एक रुपया अशी असताना फ्लॉवरची चाळीस ते पन्नास किलोची पिशवी पन्नास ते दिडशे रुपयांना विकली जात आहे.इतरही भाजीपाल्याला नाममात्र दर मिळण आहे.दहा किलोमीटर अंतरावर असणाऱ्या मालासाठी डागाला चाळीस ते पन्नास रुपये भाडे द्यावे लागते.भाजी काढणीसाठी शैकडा पन्नास ते सत्तर रुपये मोजावे लागतात. खुरपणीसाठी सकाळी आठ ते बारा वाजेपर्यंत तिनशे ते साडेतीनशे रुपये मोजावे लागतात.पुन्हा दुपारी तीन ते पाच दोन तासासाठी दोनशे ते अडीचशे रुपये मोजावे लागतात.खत जमिनीची मशागत यासाठी एकरी वीस ते पंचवीस हजार मोजावे लागतात.कोट्यावधी रुपये एकरी किंमत असणाऱ्या जमिनीतून शेतकऱ्यांना उदरनिर्वाह करता येईल इतकेही उत्पन्न तर नाहीच परंतु सतत कर्जबाजारी अशी अवस्था बळीराजाची झाली आहे.
तरी सरकारने निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांची पुर्तता करत शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करून शेतमालाला हमीभाव द्यावा अशी मागणी बळीराजा व्यक्त करत आहे.
शेतातील शेतमाल काढून बाजारात विक्री करुन पैसे मिळण्याऐवजी पदरमोड करुन घरी परतावे लागत आहे. तरी शासनाने शेतकऱ्यांचा सहानुभूती पुर्वक विचार करावा व शेतमालाला हमीभाव द्यावा.
किशोर कामठे शेतकरी फुरसुंगी पुणे.
संपादक.चंद्रकांत दुंडे.
बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क.8806043369
RELATED ARTICLES
- Advertisment -
अंगारकी चतुर्थी निमित्ताने थेऊर येथे भाविकांची मोठी गर्दी.
लोणी काळभोर प्रतिनिधी
आज भाद्रपद महिन्यातील अंगारक चतुर्थी असल्याने भाविकांनी श्री चिंतामणीच्या दर्शनाला पहाटे पासून गर्दी केली होती. पहाटे पुजारी ...
यशवंत कारखान्याच्या सभेत गोंधळ घालून सभा उधळून पुन्हा बोगस सभा व खोटे प्रोसिडिंग लिहिण्याचा...
लोणी काळभोर प्रतिनिधी
यशवंत सहकारी साखर कारखान्याची मागिल सर्वसाधारण सभा म्हणजे दिनांक २६.फेब्रुवारी.२०२५ वा दिनांक २८.सप्टेबर.२०२५ च्या सर्वसाधारण सभा म्हणजे फक्त सभासदांना दिखाव्यासाठीचा...
कुंजीरवाडी येथील धनश्री कार्यालयात मराठा समाजाची बैठक संपन्न मनोज जरांगे...
लोणी काळभोर प्रतिनिधी - कुंजीरवाडी (ता. हवेली) येथील धनश्री कार्यालयात मराठा समाजाची महत्त्वपूर्ण बैठक उत्साहात संपन्न झाली. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी संघर्ष करणारे मनोज...
तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता उद्योजक व्हावे.उदय काळभोर.
लोणी काळभोर प्रतिनिधी
कदमवाकवस्ती येथील एम आयटी काॅर्नर येथे चार तरुणांनी एकत्र येत ‘सात्विक थाळी’ नावाने हॉटेल सुरू केले हॉटेलचे उद्घाटन...
कोरेगाव भिमा विजयस्तंभ परीसरात वर्षावास प्रवचन मालिकेचे उद्घाटन.
लोणी काळभोर प्रतिनिधी
दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तालुका हवेली पूर्व च्या अंतर्गत ग्राम शाखा पेरणे फाटा यांच्या विद्यमाने ऐतिहासिक कोरेगाव भीमा ...