Homeताज्या बातम्या*एमआयटी एडीटी विद्यापीठाचा तेजस पाटील भारतीय फेन्सिंग संघात!*

*एमआयटी एडीटी विद्यापीठाचा तेजस पाटील भारतीय फेन्सिंग संघात!*

* लोणी काळभोर प्रतिनिधी
चीनमधील शांघायात होणाऱ्या प्रतिष्ठित ‘फॉइल ग्रँड प्रिक्स’ स्पर्धेत करणार देशाचे प्रतिनिधित्व*
पुणे : येथील एमआयटी आर्ट, डिझाईन आणि तंत्रज्ञान विद्यापीठ (एडीटी), लोणी-काळभोर, पुणे येथील स्कूल ऑफ कॉम्प्युटिंगचा (एसओसी) विद्यार्थी तेजस मनोज पाटील याची चीनमधील शांघाय येथे १५ ते १७ मे २०२६ दरम्यान होणाऱ्या प्रतिष्ठित ‘फॉइल ग्रँड प्रिक्स’ फेन्सिंग (तलवारबाजी) स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली आहे.
ही निवड भारतीय तलवारबाजी संघटनेतर्फे अधिकृतपणे जाहीर करण्यात आली असून, या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत जगभरातील अव्वल फेन्सर्स सहभागी होणार आहेत. फेन्सिंग असोसिएशन ऑफ इंडियाने प्रसिद्ध केलेल्या अधिकृत निवड अधिसूचनेनुसार, तेजस मनोज पाटील याची भारतीय पुरुष ‘फॉइल’ संघात निवड करण्यात आली आहे.
तेजस पाटीलने आपल्या सातत्यपूर्ण कामगिरी, मेहनत आणि खेळातील उत्कृष्ट कौशल्याच्या जोरावर भारतीय संघात स्थान मिळवले आहे. त्याच्या या यशामुळे एमआयटी-एडीटी विद्यापीठाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असून, विद्यापीठाच्या क्रीडा क्षेत्रातील वाढत्या यशाची नोंद पुन्हा अधोरेखित झाली आहे.
या कामगिरीनंतर एमआयटी एडीटी विद्यापीठाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड, कार्याध्यक्ष तथा प्र-कुलपती प्रा. डॉ. मंगेश कराड, कार्यकारी संचालक डाॅ.सुनिता कराड, कुलगुरू डॉ. राजेश एस., प्रोवोस्ट डाॅ.सायली गणकर, प्र.कुलपती डाॅ.रामचंद्र पुजेरी, डाॅ.मोहित दुबे, डाॅ.नचिकेत ठाकूर, कुलसचिव डॉ. महेश चोपडे, छत्रपती शिवाजी पुरस्कारप्राप्त क्रीडा विभाग संचालक प्रा. पद्माकर फड यांनी तेजसचे अभिनंदन करत शांघाय येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. त्याच्या कामगिरीमुळे विद्यापीठातील तसेच राज्यातील युवा खेळाडूंना निश्चितच प्रेरणा मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
*चीनमधील शांघायात होणाऱ्या प्रतिष्ठित ‘फॉइल ग्रँड प्रिक्स’ स्पर्धेत करणार देशाचे प्रतिनिधित्व*

मूग्य संपादक.चंद्रकांत दुंडे
संपर्क 8806043369

Previous article
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

0
लोणी काळभोर प्रतिनिधी : अनिरुद्ध मराठे. येथील पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या माळी मळा परिसरात आज मंगळवारी (५ मे) रोजी सकाळी पेट्रोलजन्य टँकरच्या वेल्डिंगचे काम सुरू...

लोणी काळभोर येथील माळी मळा भीषण स्फोटामुळे हादरला.नागरीकांमध्यै घबराट.

0
ब्रेकिंग न्यूज लोणी काळभोर येथील माळीमळा येथे वेल्डिंग करतेवेळी झालेल्या स्फोटात एक जण गंभीर जखमी असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे यामुळे लोणी काळभोर परीसरात...

मोक्का गुन्हयातील येरवडा जेलमधून पळालेला व ६ वर्षासून फरार असलेला आरोपी जेरबंद : पुणे...

0
लोणी काळभोर : पुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) शनिवार (२ मे) रोजी मोक्का गुन्हयातील व येरवडा जेलमधून पळालेला ६ वर्षापासून फरार असलेला...

सोनाई इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये बारावी मध्ये पुन्हा शंभर टक्के निकाल

0
लोणी काळभोर प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण बोर्डाच्या 2 मे 2026 रोजी जाहीर झालेल्या (HSC) बारावीच्या परीक्षेत राज्यातील अनेक शाळा व कनिष्ठ...

*श्रीक्षेत्र थेऊर येथील ‘महाराजस्व समाधान शिबिराला’ नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; १००० पेक्षा जास्त नागरिकांनी घेतला...

0
लोणी काळभोर प्रतिनिधी महाराष्ट्र शासनाची महत्वकांक्षी योजना असलेल्या व महसूल विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान” अंतर्गत थेऊर मंडल भागात आयोजित करण्यात...

error: Content is protected !!