Homeताज्या बातम्याओरिजिनल मातोश्री इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

ओरिजिनल मातोश्री इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

लोणी काळभोर प्रतिनिधी
आज दिनांक २६ जानेवारी २०२६ रोजी ओरिजिनल मातोश्री इंग्लिश मीडियम स्कूल येथे ७७ वा प्रजासत्ताक दिन अत्यंत उत्साहात, शिस्तबद्ध आणि देशप्रेमाच्या वातावरणात साजरा करण्यात आला. सकाळच्या सत्रात शाळेच्या मैदानावर शिक्षक, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सायली सुरवसे व निकिता दाभाडे यांनी अत्यंत प्रभावीपणे केले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे छाया मेमाणे, संस्थापक/चेअरमन अविनाश मेमाणे, सेक्रेटरी रूपाली मेमाणे ट्रस्टी ऋषिकेश आखाडे,कल्पेश मेमाणे , श्वेता मेमाणे, प्रगतिशील शेतकरी व सामाजिक कार्यकर्ते मारुती गडदे, तसेच पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते बापू लाड यांच्या हस्ते सकाळी ८.३० वाजता ध्वजारोहण करण्यात आले.

यानंतर उपस्थित सर्वांनी राष्ट्रगीत गाऊन राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्यसैनिकांच्या जीवनावर आधारित नाटिका, देशभक्तीपर नृत्ये व प्रेरणादायी भाषणे सादर केली. या सादरीकरणांनी उपस्थित पालक व मान्यवरांच्या मनात देशभक्तीची भावना अधिक दृढ केली.

कार्यक्रमाच्या शेवटी शैक्षणिक व इतर क्षेत्रांत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले. “भारत माता की जय”, “वंदे मातरम”, “प्रजासत्ताक दिनाचा विजय असो” या गगनभेदी घोषणांमध्ये कार्यक्रमाची सांगता झाली.

शाळेच्या इन्चार्ज मीना कानकाटे यांनी सर्व मान्यवर, पालक व उपस्थितांचे आभार मानत यापुढेही असेच दर्जेदार उपक्रम राबविण्याचे आश्वासन दिले. शाळेच्या मुख्याध्यापिका तनुजा गोरे यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.

एकूणच हा प्रजासत्ताक दिनाचा सोहळा सर्वांच्या स्मरणात राहणारा ठरला.
मुख्य संपादक चंद्रकांत दुंडे
8806043369

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता उद्योजक व्हावे.उदय काळभोर.

0
लोणी काळभोर प्रतिनिधी कदमवाकवस्ती येथील एम आयटी काॅर्नर येथे चार तरुणांनी एकत्र येत ‘सात्विक थाळी’ नावाने हॉटेल सुरू केले हॉटेलचे उद्घाटन...

कोरेगाव भिमा विजयस्तंभ परीसरात वर्षावास प्रवचन मालिकेचे उद्घाटन.

0
लोणी काळभोर प्रतिनिधी दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तालुका हवेली पूर्व च्या अंतर्गत ग्राम शाखा पेरणे फाटा यांच्या विद्यमाने ऐतिहासिक कोरेगाव भीमा ...

थेऊर येथील ‘समाधान शिबिर’ भर पावसात उत्साहात संपन्न, हवेलीतील पानंद रस्त्यांसाठी भरीव निधी उपलब्ध...

0
लोणी काळभोर प्रतिनिधी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त व दिवंगत उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांच्या प्रथम जयंती निमित्त तसेच महसूल दिनाचे औचित्यसाधून, पंचायत...

*एमआयटी एडीटी विद्यापीठाचा तेजस पाटील भारतीय फेन्सिंग संघात!*

0
* लोणी काळभोर प्रतिनिधी चीनमधील शांघायात होणाऱ्या प्रतिष्ठित ‘फॉइल ग्रँड प्रिक्स’ स्पर्धेत करणार देशाचे प्रतिनिधित्व* पुणे : येथील एमआयटी आर्ट, डिझाईन आणि तंत्रज्ञान विद्यापीठ (एडीटी), लोणी-काळभोर,...

error: Content is protected !!