Homeताज्या बातम्याकुंजीरवाडी येथील धनश्री कार्यालयात मराठा समाजाची बैठक संपन्न ...

कुंजीरवाडी येथील धनश्री कार्यालयात मराठा समाजाची बैठक संपन्न मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देत ; मुंबईकडे जाण्याच्या नियोजनावर चर्चा

लोणी काळभोर प्रतिनिधी – कुंजीरवाडी (ता. हवेली) येथील धनश्री कार्यालयात मराठा समाजाची महत्त्वपूर्ण बैठक उत्साहात संपन्न झाली. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी संघर्ष करणारे मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर तसेच मुंबई येथे होणाऱ्या आंदोलनासाठी मनोज दादा ज्यावेळी सांगतील त्यावेळी समाजबांधवांनी मोठ्या संख्येने मुंबई येथे सहभागी होण्याबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली.
मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू केलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी हवेली परिसरातील मराठा समाजबांधवांनी एकत्रितपणे भूमिका घेण्याचे आवाहन करण्यात आले. मनोज जरांगे पाटील यांनी सांगितल्या नंतर मुंबईकडे जाताना समाजबांधवांनी शिस्तबद्ध पद्धतीने सहभागी व्हावे, प्रवासाचे नियोजन करावे तसेच आंदोलनादरम्यान शांतता व कायदा-सुव्यवस्था राखावी, याबाबतही बैठकीत मार्गदर्शन करण्यात आले.यावेळी मराठा समाजाचे सुनील शिंदे ,अविनाश काळे ,संदीप डुचे , प्रभाकर धुमाळ ,अनिरुद्ध मराठे , सचिन सुंबे ,निलेश सुंबे ,सोमनाथ धुमाळ ,बापूसाहेब घुले ,सचिन माथेफोड , चंद्रकांत दुंडे ,सुभाष कड , दिपक गोते ,दिलीप आंबेकर शुक्रराज काळे , भाऊसाहेब जाधव , राकेश ओझरकर, व बैठकीस कुंजीरवाडी व परिसरातील मराठा समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दिनांक १७ सप्टेंबर रोजी मनोज जरांगे पाटील हे पुणे सोलापूर महामार्गाने काही निवडक कार्यकर्त्यांबरोबर मुंबईला जाणार असून त्यासाठी हडपसर येथे मुक्काम करणार आहेत. तसेच ज्यावेळी मनोज जरंगे पाटील हे कार्यकर्त्यांना मराठा समाजातील मुंबईला येण्यास सांगतील त्यावेळी जाताना यावेळी मुक्कामाच्या ठिकाणी कसलीही गडबड गोंधळ नको तसेच समाजातील लोकांची राहण्याची व खाण्याचे सोय करण्यासाठी या बैठकीत चर्चा करण्यात आली. यावेळी कुंजीरवाडी येथील धनश्री लॉन्स येथे राहण्याची व जेवण्याची मुख्य व्यवस्था करण्यात येणार असून पुणे- सोलापूर महामार्गावरील अनेक मंगल कार्यालय यासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. कदमवाकवस्ती येथील पालखी मैदान, शेवाळेवाडी जवळील जी . बी .चौधरी यांची मोकळी जागा , मांजरी येथील बाजार समितीची जागा तसेच अनेक ठिकाणच्या मोकळ्या जागेसाठी त्या त्या जागामालकांनी संमती दर्शविली असून त्याप्रमाणे राहण्याची व खाण्याची सोय करण्यात येणार आहे .
यावेळी मुंबईला जाणाऱ्या समाजबांधवांची संख्या, वाहन व्यवस्था, प्रवासाचे नियोजन, आवश्यक साहित्य तसेच विविध गावांतील समन्वय यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी एकजुटीने आणि शांततेच्या मार्गाने आंदोलनाला पाठिंबा देण्याचा निर्धार उपस्थितांनी व्यक्त केला.
यावेळी पोलीस प्रशासनाने धनश्री कार्यालयात येऊन सर्व माहिती घेऊन नियोजनाबाबत चर्चा केली .
मुख्य संपादक चंद्रकांत दुंडे
संपर्क.8806043369

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सुरज चौधरी यांचेकडून पत्रकार बंधुसाठी स्नेहभेटीचे आयोजन.

0
लोणी काळभोर प्रतिनिधी - दिवाळी सणाचे औचित्य साधून पेठ गावचे आदर्श सरपंच सूरज भालचंद्र चौधरी यांच्या वतीने सर्व सन्माननीय पत्रकार बांधवांसाठी खास...

किल्ले सिंहगडावर दिपावली पहाट कार्यक्रम, हवेलीतील ऐतिहासिक वारशाच्या संवर्धनासह गडकिल्ल्यांच्या विकासासाठी कटिबद्ध- सभापती काकडे.

0
लोणी काळभोर प्रतिनिधी चंद्रकांत दुंडे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या व स्वराज्याचे तिसरे छत्रपती राजाराम महाराज आणि नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या...

अंगारकी चतुर्थी निमित्ताने थेऊर येथे भाविकांची मोठी गर्दी.

0
लोणी काळभोर प्रतिनिधी आज भाद्रपद महिन्यातील अंगारक चतुर्थी असल्याने भाविकांनी श्री चिंतामणीच्या दर्शनाला पहाटे पासून गर्दी केली होती. पहाटे पुजारी ...

यशवंत कारखान्याच्या सभेत गोंधळ घालून सभा उधळून पुन्हा बोगस सभा व खोटे प्रोसिडिंग लिहिण्याचा...

0
लोणी काळभोर प्रतिनिधी यशवंत सहकारी साखर कारखान्याची मागिल सर्वसाधारण सभा म्हणजे दिनांक २६.फेब्रुवारी.२०२५ वा दिनांक २८.सप्टेबर.२०२५ च्या सर्वसाधारण सभा म्हणजे फक्त सभासदांना दिखाव्यासाठीचा...

तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता उद्योजक व्हावे.उदय काळभोर.

0
लोणी काळभोर प्रतिनिधी कदमवाकवस्ती येथील एम आयटी काॅर्नर येथे चार तरुणांनी एकत्र येत ‘सात्विक थाळी’ नावाने हॉटेल सुरू केले हॉटेलचे उद्घाटन...

error: Content is protected !!