Homeताज्या बातम्यालोणी काळभोर कदमवाकवस्ती जिल्हा परिषद इच्छुक उमेदवारांचा नव परिवर्तन फाउंडेशन

लोणी काळभोर कदमवाकवस्ती जिल्हा परिषद इच्छुक उमेदवारांचा नव परिवर्तन फाउंडेशन

लोणी काळभोर : पुणे जिल्हा परिषद निवडणुकीचे बिगुल वाजले असून हवेली तालुक्यात त्याची जोरदार तय्यारी सुरु झाली आहे. त्या अनुषंगाने नवपरिवर्तन फौंडेशनच्यावतीने लोणी काळभोर कदमवाकवस्ती जिल्हा परिषद गट व दोन गणांच्या इच्छुक उमेदवारांचा मेळावा कदमवाकवस्ती येथील मनाली रिसॉर्ट या ठिकाणी नवपरिवर्तन फाउंडेशनच्या कोर कमिटी सदस्य समवेत रविवारी (दि. १८) पार पडला. या मेळाव्याचे अध्यक्ष स्थान कदमवाकवस्ती ग्रामपंचायतीचे माजी सरपंच गणपतराव काळभोर यांनी भूषविले. लोणी काळभोर कदमवाकवस्ती वडकी या जिल्हा परिषद गटासाठी अनुसूचित जाती महिला असे आरक्षण असून लोणी काळभोर पंचायत समिती गणासाठी इतर मागासवर्गीय प्रवर्ग महिला व कदमवाकवस्ती पंचायत समिती गणासाठी अनुसूचित जाती आरक्षण जाहीर झाले आहे. या गटासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या मेळाव्यात लोणी काळभोर कदमवाकवस्ती जिल्हा परिषद गटासाठी सोनम नामुगडे,पूनम गायकवाड,पूजा काळभोर यांनी नवपरिवर्तन पॅनल मधून उमेदवारीसाठी इच्छा व्यक्त केली. तर पंचायत समिती लोणी काळभोर वडकी गणासाठी उज्वला महेश फलटणकर,दिपाली घाडगे व कदमवाकवस्ती पंचायत समिती गणासाठी ज्ञानेश्वर नामुगडे,राकेश लोंढे,नकुल शिंदे,भगवान साळवे यांनी इच्छा व्यक्त केली. या मेळाव्यास उपस्थित नागरिकांनी यावेळी मत व्यक्त करताना जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत निवडून येणाऱ्या उमेदवाराने गटातील परिसरामध्ये पाणी, कचरा, रस्ते ही प्रमुख कामे व मागासवर्गीय नागरिकांची घरे नियमित करणे, कदमवाकवस्ती शिवरस्ता करणे अशी अनेक कामांची मागणी केली. या मेळाव्यास अध्यक्ष गणपतराव काळभोर, माजी सरपंच चित्तरंजन काळभोर, गौरी गायकवाड, उपसरपंच नासिरखान पठाण, गुरुदेव जाधव,अशोक कदम, मुकुंद काळभोर, सूर्यनारायण काळभोर, माऊली काळभोर, प्रताप कदम, उद्यय काळभोर,कदमवाकवस्ती ग्रामपंचायत सदस्य, सदस्या, तंटामुक्ती अध्यक्ष अभिजित बडदे, नागरिक व इतर मान्यवर उपस्थित होते.
मुख्य संपादक चंद्रकांत दुंडे
संपर्क 8806043369

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता उद्योजक व्हावे.उदय काळभोर.

0
लोणी काळभोर प्रतिनिधी कदमवाकवस्ती येथील एम आयटी काॅर्नर येथे चार तरुणांनी एकत्र येत ‘सात्विक थाळी’ नावाने हॉटेल सुरू केले हॉटेलचे उद्घाटन...

कोरेगाव भिमा विजयस्तंभ परीसरात वर्षावास प्रवचन मालिकेचे उद्घाटन.

0
लोणी काळभोर प्रतिनिधी दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तालुका हवेली पूर्व च्या अंतर्गत ग्राम शाखा पेरणे फाटा यांच्या विद्यमाने ऐतिहासिक कोरेगाव भीमा ...

थेऊर येथील ‘समाधान शिबिर’ भर पावसात उत्साहात संपन्न, हवेलीतील पानंद रस्त्यांसाठी भरीव निधी उपलब्ध...

0
लोणी काळभोर प्रतिनिधी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त व दिवंगत उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांच्या प्रथम जयंती निमित्त तसेच महसूल दिनाचे औचित्यसाधून, पंचायत...

*एमआयटी एडीटी विद्यापीठाचा तेजस पाटील भारतीय फेन्सिंग संघात!*

0
* लोणी काळभोर प्रतिनिधी चीनमधील शांघायात होणाऱ्या प्रतिष्ठित ‘फॉइल ग्रँड प्रिक्स’ स्पर्धेत करणार देशाचे प्रतिनिधित्व* पुणे : येथील एमआयटी आर्ट, डिझाईन आणि तंत्रज्ञान विद्यापीठ (एडीटी), लोणी-काळभोर,...

error: Content is protected !!