हवेली तालुका ग्रामपंचायत संघटनेच्या अध्यक्षपदी प्रथम महिला अध्यक्ष सौ. स्वाती भालेराव बिनविरोध निवड
पुणे व सातारा जिल्हा श्रमिक संघ संलग्न महाराष्ट्र राज्य हवेली तालुका ग्रामपंचायत संघटनेच्या अध्यक्षपदी प्रथम महिला सौ. स्वाती भालेराव, उपाध्यक्षपदी श्री. पांडुरंग तात्या येवले तसेच प्रधान सचिव श्री अविनाश मेमाणे / सचिवपदी सौ. अश्विनी वसंत भोर यांची बिनविरोध निवड झाली. या निवडीमुळे संघटनेत समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे.
ग्रामपंचायत पातळीवर कामगार, कर्मचारी व लोकप्रतिनिधी यांच्या हक्कांसाठी सातत्याने लढा देत संघटनेला अधिक बळकटी देण्याचा निर्धार नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या विविध प्रश्नांना प्राधान्य देत संघटनात्मक एकजूट अधिक मजबूत करण्यावर भर दिला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या निवडीबद्दल विविध स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत असून संघटनेच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत. ग्रामपंचायत कर्मचारी संघटने चे अध्यक्ष पद प्रथम महिला सौ स्वाती भालेराव यांना दिल्याने महिलांमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण होते.
दरम्यान, पुणे व सातारा जिल्हा श्रमिक संघ संलग्न महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी संघ, हवेली तालुका ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेच्या वतीने तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत कर्मचारी बंधू-भगिनींना आवाहन करण्यात आले आहे की, आपल्या संघटनेचे संस्थापक सरचिटणीस काॅ. श्री. ज्ञानोबा घोणे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच मा. जिल्हाध्यक्ष श्री. अशोक दिनकर गायकवाड आणि जिल्हा कार्यकारिणीतील सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली संघटनेची ताकद वाढवावी.
यावेळी श्री. अविनाश मेमाणे (तालुका अध्यक्ष, हवेली) यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुख्य संपादक.चंद्रकांत दुंडे
8806043369










