Homeताज्या बातम्याहा लढा पदासाठी नाही तर स्वाभिमान.निष्ठा आणि जनतेच्या विश्वासासाठी आहे.प्रकाश सावत.

हा लढा पदासाठी नाही तर स्वाभिमान.निष्ठा आणि जनतेच्या विश्वासासाठी आहे.प्रकाश सावत.

लोणी काळभोर प्रतिनिधी
पुष्पलता प्रकाश सावंत यांचा भाजपमधून अर्ज दाखल; पडद्यामागे अनेक घडामोडी, कार्यकर्त्यांच्या आवाहनानंतर लढण्याचा निर्णय
जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असताना पुष्पलता प्रकाश सावंत यांनी अखेर भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला. हा निर्णय अचानक वाटत असला, तरी यामागे पडद्यामागे घडलेल्या अनेक राजकीय घडामोडी, चर्चा आणि कार्यकर्त्यांचा आग्रह कारणीभूत ठरल्याचे समजते.

गेल्या काही दिवसांपासून उमेदवारीबाबत साशंकता होती. पक्षांतर्गत समीकरणे, तिकीट वाटपातील अनिश्चितता आणि शेवटच्या क्षणी बदललेले निर्णय यामुळे संभ्रमाची स्थिती निर्माण झाली होती. मात्र या काळात प्रकाश सावंत यांच्याशी एकनिष्ठ असलेल्या कार्यकर्त्यांनी “निष्ठावानाला डावलले तरी तुम्ही लढाच” अशी ठाम भूमिका घेत, सावंत कुटुंबाच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्धार व्यक्त केला.

या पार्श्वभूमीवर अर्ज दाखल करताना प्रकाश सावंत यांनी भावनिक शब्दांत कार्यकर्त्यांना आवाहन केले. ते म्हणाले,

“हा लढा पदासाठी नाही, तर स्वाभिमान, निष्ठा आणि जनतेच्या विश्वासासाठी आहे. अनेक वर्षे आपण एकत्र संघर्ष केला आहे. आज अडचणीचा क्षण असला तरी खचायचं कारण नाही. कार्यकर्त्यांनी दिलेलं प्रेम, विश्वास आणि पाठबळ हेच माझं खरे बळ आहे. अन्यायाविरुद्ध लढण्याची ताकद तुमच्यामुळेच मिळाली आहे.”

प्रकाश सावंत यांच्या या भावनिक आवाहनानंतर कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य संचारले असून, “हा लढा शेवटपर्यंत नेऊ” अशी भूमिका कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली जात आहे. निष्ठा, संघर्ष आणि जनाधार या मुद्द्यांवर सावंत कुटुंब मैदानात उतरल्याने मतदारसंघातील निवडणूक अधिकच चुरशीची व लक्षवेधी ठरण्याची शक्यता आहे.

पडद्यामागील राजकीय खेळी, तिकीट वाटपातील नाराजी आणि निष्ठावंतांची भूमिका या सर्व घटकांमुळे ही उमेदवारी केवळ औपचारिक न राहता स्वाभिमानाचा आणि संघर्षाचा लढा बनत असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.
मुख्य संपादक चंद्रकांत दुंडे
8806043369

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

कुंजीरवाडी येथील धनश्री कार्यालयात मराठा समाजाची बैठक संपन्न मनोज जरांगे...

0
लोणी काळभोर प्रतिनिधी - कुंजीरवाडी (ता. हवेली) येथील धनश्री कार्यालयात मराठा समाजाची महत्त्वपूर्ण बैठक उत्साहात संपन्न झाली. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी संघर्ष करणारे मनोज...

तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता उद्योजक व्हावे.उदय काळभोर.

0
लोणी काळभोर प्रतिनिधी कदमवाकवस्ती येथील एम आयटी काॅर्नर येथे चार तरुणांनी एकत्र येत ‘सात्विक थाळी’ नावाने हॉटेल सुरू केले हॉटेलचे उद्घाटन...

कोरेगाव भिमा विजयस्तंभ परीसरात वर्षावास प्रवचन मालिकेचे उद्घाटन.

0
लोणी काळभोर प्रतिनिधी दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तालुका हवेली पूर्व च्या अंतर्गत ग्राम शाखा पेरणे फाटा यांच्या विद्यमाने ऐतिहासिक कोरेगाव भीमा ...

थेऊर येथील ‘समाधान शिबिर’ भर पावसात उत्साहात संपन्न, हवेलीतील पानंद रस्त्यांसाठी भरीव निधी उपलब्ध...

0
लोणी काळभोर प्रतिनिधी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त व दिवंगत उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांच्या प्रथम जयंती निमित्त तसेच महसूल दिनाचे औचित्यसाधून, पंचायत...

error: Content is protected !!