Homeताज्या बातम्यापाईप लाईनसाठी खोदलेल्या घड्ड्यात पडून झालेल्या अपघातास रिव्हरव्ह्यू सिटी व त्यांचे कंत्राटदार...

पाईप लाईनसाठी खोदलेल्या घड्ड्यात पडून झालेल्या अपघातास रिव्हरव्ह्यू सिटी व त्यांचे कंत्राटदार जबाबदार ; माजी सरपंच चित्तरंजन गायकवाड यांचा आरोप .

लोणी काळभोर : कदमवाकवस्ती ( हवेली) ग्रामपंचायतीची मंजूर असलेली महाराष्ट्र जलजीवन योजनेचे काम पूर्ण होऊ नये असे प्रयत्न करीत असलेले काहीजण कदमवाकवस्ती फुरसुंगी शिव रस्त्यामधून पाईपलाइन नेण्यासाठी विरोध करीत असल्याने रिव्हरव्ह्यू सिटीने सर्व शासकीय आदेश पायदळी तुडवून, पुणे-सोलापूर महामार्गाचा सेवा रस्ता खोदून अनधिकृतपणे पाईपलाईनचे काम सुरु केले आहे. त्यांच्या निष्काळजीपणामुळे कदमवाकवस्ती (ता. हवेली) येथील दुचाकीवरील दोन तरुण खड्डयात पडून गंभीर जखमी झाले आहेत त्यातील एकाची प्रकृती गंभीर आहे. या अपघाताला रिव्हरव्ह्यू सिटी व शिव रस्त्यावरून पाईप लाइन करून न देणारे हेच जबाबदार आहे. असा आरोप माजी सरपंच तथा नवपरिवर्तन फाउंडेशनचे अध्यक्ष चित्तरंज गायकवाड यांनी केला आहे. मागील दोन तीन महिन्यांपासून रिव्हरव्ह्यू सिटी जाणारी पाईपलाईन ही शिवरस्त्याने नेण्यात यावी. याबाबत कदमवाकवस्ती ग्रामपंचायतीने जिल्हा प्रशासनाकडे वारंवार पत्रव्यवहार केला आहे. याबाबत अधिक बोलताना चित्तरंजन गायकवाड म्हणाले की, रिव्हरव्ह्यू सिटीसाठी जाणारी पाईपलाईन शिवरस्त्याने न नेता सेवा रस्त्याने बळजबरीने नेण्याचा प्रकार चालू आहे. सदर रस्त्यावर काम करताना नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून कुठल्याही उपाययोजना केल्याचे दिसून येत नाही.पुणे-सोलापूर महामार्गाच्या सेवारस्ताच खोदला असल्याने वाहनचालकांना राँग साईडने जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. या खड्ड्यांमुळे अजूनही मोठ्या दुर्घटना होण्याच्या शक्यता नाकारता येत नाही.प्रशासनाने ही अनधिकृत पाईपलाईन बंद करावी. शासनाने दिलेल्या परवानगीप्रमाणेच काम करावे. या झालेल्या अपघातात आदित्य आटोळे हा तरुण जीवन मरणार्थ झुंज देत आहे. या अपघातास रिव्हरव्ह्यू सिटी व त्यांचे कंत्राटदार जबाबदार असल्याने त्यांनी या जखमींच्या उपचारासाठी लागणारा सर्व खर्च द्यावा. तसेच जखमींना न्याय देण्यासाठी पोलीस प्रशासन व जिल्हा प्रशासनाने या अपघातास जबाबदार असणाऱ्या सर्वांवर कडक कारवाई करावी आणि सेवारस्त्यावरूनच पाईपलाईन नेली जाणार असेल तर याला आमचा तीव्र विरोध असून आम्ही आंदोलनालाही मागेपुढे पाहणार नाही असा इशारा गायकवाड यांनी दिला. याबाबत बोलताना भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी रोहन जगताप म्हणाले की, सोलापूर राष्ट्रीय महामार्गाच्या मध्यापासून येणाऱ्या १५ मीटर अंतर सोडून बाहेर काम करण्यास परवानगी दिली आहे. सेवा रस्त्यावर काम करण्याची कोणतीही परवानगी नाही. अनधिकृतपणे सेवा रस्ता खोडून अपघात झाला असेल तर जे कोण यामध्ये दोषी असतील त्यांच्यावर लवकरच गुन्हा दाखल करण्यात येईल. चौकट वेदांत सावंत आणि आदित्य सुरेश आटोळे (दोघेही रा. पांडवदंड, कदमवाकवस्ती, ता. हवेली) अशी जखमी झालेल्या दोघांची नावे आहेत. त्यातील आदित्यवर लोणी काळभोर येथील विश्वराज हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु असून त्याची प्रकृती गंभीर असल्याची माहिती तेथील डॉक्टरांकडून मिळत आहे.
पुणे फास्ट न्युज संपादक.चंद्रकांत दुंडे
संपर्क 8806043369

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

यशवंत कारखान्याच्या सभेत गोंधळ घालून सभा उधळून पुन्हा बोगस सभा व खोटे प्रोसिडिंग लिहिण्याचा...

0
लोणी काळभोर प्रतिनिधी यशवंत सहकारी साखर कारखान्याची मागिल सर्वसाधारण सभा म्हणजे दिनांक २६.फेब्रुवारी.२०२५ वा दिनांक २८.सप्टेबर.२०२५ च्या सर्वसाधारण सभा म्हणजे फक्त सभासदांना दिखाव्यासाठीचा...

कुंजीरवाडी येथील धनश्री कार्यालयात मराठा समाजाची बैठक संपन्न मनोज जरांगे...

0
लोणी काळभोर प्रतिनिधी - कुंजीरवाडी (ता. हवेली) येथील धनश्री कार्यालयात मराठा समाजाची महत्त्वपूर्ण बैठक उत्साहात संपन्न झाली. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी संघर्ष करणारे मनोज...

तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता उद्योजक व्हावे.उदय काळभोर.

0
लोणी काळभोर प्रतिनिधी कदमवाकवस्ती येथील एम आयटी काॅर्नर येथे चार तरुणांनी एकत्र येत ‘सात्विक थाळी’ नावाने हॉटेल सुरू केले हॉटेलचे उद्घाटन...

कोरेगाव भिमा विजयस्तंभ परीसरात वर्षावास प्रवचन मालिकेचे उद्घाटन.

0
लोणी काळभोर प्रतिनिधी दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तालुका हवेली पूर्व च्या अंतर्गत ग्राम शाखा पेरणे फाटा यांच्या विद्यमाने ऐतिहासिक कोरेगाव भीमा ...

थेऊर येथील ‘समाधान शिबिर’ भर पावसात उत्साहात संपन्न, हवेलीतील पानंद रस्त्यांसाठी भरीव निधी उपलब्ध...

0
लोणी काळभोर प्रतिनिधी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त व दिवंगत उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांच्या प्रथम जयंती निमित्त तसेच महसूल दिनाचे औचित्यसाधून, पंचायत...

error: Content is protected !!