लोणी काळभोर प्रतिनिधी – कोरेगावमूळ – केसनंद जिल्हा परिषद गटात सुरुवातीला एकतर्फी वाटणारी निवडणूक आता भाजपने दिग्गज उमेदवार दिल्यामुळे ही निवडणूक आता रंगदार होणार असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे . आता राष्ट्रवादी काँग्रेस समोर भाजपचे तगडे आव्हान उभे राहिले असून भारतीय जनता पक्षाकडून जिल्हा परिषद सदस्य पदासाठी अधिकृत उमेदवारी कविता विजय पायगुडे यांना मिळाली असून तसेच भाजपकडून केसनंद पंचायत समिती गणातून अधिकृत उमेदवारी कुशाल गोरख सातव तर कोरेगाव मूळ पंचायत समिती गणातून अधिकृत उमेदवारी सूरज भालचंद्र चौधरी यांना मिळाल्याने खरे तर आता केसनंद – कोरेगाव मूळ जिल्हा परिषद गटात व दोन्ही पंचायत समिती गणात भाजपचे तगडे आव्हान उभे राहिल्याने निवडणुकीत रंगत आली आहे.
अनेक दिवसांपासून केसनंद – कोरेगाव मूळ या जिल्हा परिषद गटातील नागरिकांना उत्सुकता लागली होती की राष्ट्रवादी विरुद्ध भाजप लढत होणार का ? ही नागरिकांची उत्सुकता आता सत्यात उतरली असून राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध भारतीय जनता पक्ष अशी समोरासमोर काट्याची टक्कर होणार असल्याने या गटात व गणांमध्ये निवडणुकीत नवा टूवीस निर्माण झाला आहे.त्यामुळे आता या गटात व दोन्ही गणांची राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली आहे.राष्ट्रवादीला आधी सोपी वाटणारी निवडणूक आता सोपी राहिली नाही.तर आता काट्याची टक्कर नागरिकांना पहायला मिळणार आहे.भाजपच्या तीनही उमेदवारांनी आता प्रचारात आघाडी घेतली असुन संपूर्ण गट व दोन्ही गण भाजपमय झाला आहे .
त्यामुळे” आता वार फिरलय कमळ फुललं ” अशी नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे .
फॉर्म भरण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपकडून केसनंद – कोरेगाव मूळ जिल्हा परिषद सदस्य पदाचा अधिकृत उमेदवारी अर्ज कविता विजय पायगुडे यांनी दाखल केला.तर उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी केसनंद पंचायत समिती गणातून सदस्य पदासाठी भाजपकडून अधिकृत ए.बी.फॉर्म कुशाल गोरख सातव यांना मिळाला तर कोरेगाव मूळ पंचायत समिती गणातून सदस्य पदासाठी भाजपकडून अधिकृत ए.बी.फॉर्म सूरज भालचंद्र चौधरी यांना मिळाल्याने दोघांची भारतीय जनता पक्षाकडून अधिकृत उमेदवारी जाहिर करण्यात आली.यावेळी कुशाल सातव व सूरज चौधरी यांनी यावेळी भाजपचे व भाजप पक्ष श्रेष्ठींचे आभार मानले.
भाजपकडून अधिकृत उमेदवारी जाहिर झाल्यानंतर केसनंद-कोरेगाव मूळ जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार कविता विजय पायगुडे यांनी त्वरित जोरदार प्रचाराला सुरुवात केली असून याआधी प्रचारात आघाडी घेतलेले केसनंद पंचायत समितीचे भाजपचे अधिकृत उमेदवार कुशाल गोरख सातव व कोरेगाव मूळ पंचायत समितीचे भाजपचे अधिकृत उमेदवार सूरज भालचंद्र चौधरी या दोघांची मोठी साथ खरे तर जिल्हा परिषदेच्या भाजपच्या अधिकृत कविता विजय पायगुडे यांना लाभली आहे.
त्यामुळे आता विजयाची राजकीय समीकरणे बदलणार ? अशी चिन्हे समोर आली असून गट व गणातील भाजप उमेदवारांना मोठी पसंती मिळत असून भाजप उमेदवारांची जोरदार चर्चाही नागरिकांमध्ये केसनंद-कोरेगाव मूळ जिल्हा परिषद गटात रंगू लागली आहे.
मुख्य संपादक
चंद्रकांत दुंडे
8806043369
कोरेगाव मुळ,केसनंद जिल्हा परिषद गटात कमळ फुलणार.नागरीकांयध्ये चर्चा
RELATED ARTICLES
- Advertisment -
तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता उद्योजक व्हावे.उदय काळभोर.
लोणी काळभोर प्रतिनिधी
कदमवाकवस्ती येथील एम आयटी काॅर्नर येथे चार तरुणांनी एकत्र येत ‘सात्विक थाळी’ नावाने हॉटेल सुरू केले हॉटेलचे उद्घाटन...
कोरेगाव भिमा विजयस्तंभ परीसरात वर्षावास प्रवचन मालिकेचे उद्घाटन.
लोणी काळभोर प्रतिनिधी
दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तालुका हवेली पूर्व च्या अंतर्गत ग्राम शाखा पेरणे फाटा यांच्या विद्यमाने ऐतिहासिक कोरेगाव भीमा ...
थेऊर येथील ‘समाधान शिबिर’ भर पावसात उत्साहात संपन्न, हवेलीतील पानंद रस्त्यांसाठी भरीव निधी उपलब्ध...
लोणी काळभोर प्रतिनिधी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त व दिवंगत उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांच्या प्रथम जयंती निमित्त तसेच महसूल दिनाचे औचित्यसाधून, पंचायत...
*एमआयटी एडीटी विद्यापीठाचा तेजस पाटील भारतीय फेन्सिंग संघात!*
* लोणी काळभोर प्रतिनिधी
चीनमधील शांघायात होणाऱ्या प्रतिष्ठित ‘फॉइल ग्रँड प्रिक्स’ स्पर्धेत करणार देशाचे प्रतिनिधित्व*
पुणे : येथील एमआयटी आर्ट, डिझाईन आणि तंत्रज्ञान विद्यापीठ (एडीटी), लोणी-काळभोर,...