Homeताज्या बातम्याजिल्हा परिषद रणधुमाळीपूर्वी आव्हाळवाडीत ‘एक गाव – एक उमेदवार’चा राजकीय स्फोट

जिल्हा परिषद रणधुमाळीपूर्वी आव्हाळवाडीत ‘एक गाव – एक उमेदवार’चा राजकीय स्फोट

हवेली प्रतिनिधी.जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर थेऊर–आव्हाळवाडी गट क्रमांक ४० मध्ये निर्णायक घडामोड घडली असून, आव्हाळवाडी गावाने फुटीर राजकारणाला ठाम नकार दिला आहे.
शिरूर हवेलीचे आमदार माऊली कटके यांनी गावात घेतलेल्या महत्त्वाच्या बैठकीत माजी सभापती नारायण आव्हाळे गट व संदेश आव्हाळे गट एकत्र आले असून, “एक गाव – एक उमेदवार” या भूमिकेवर शिक्कामोर्तब झाले आहे.

जिल्हा परिषद निवडणुकीत नेहमीच मतांचे विभाजन करून संधी साधणाऱ्यांना या निर्णयाने मोठा धक्का बसला आहे. आमदार माऊली कटके यांनी मध्यस्थी करत मतभेद संपवले आणि गावाच्या विकासासाठी एकजूट हाच एकमेव मार्ग असल्याचे ठामपणे मांडले.

या बैठकीस गावातील आजी व माजी ग्रामपंचायत पदाधिकारी, सहकारी संस्थांचे पदाधिकारी, विविध कार्यकारी मंडळांचे प्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, युवक व ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. वेगवेगळ्या पदांवर कार्यरत असलेले सर्व घटक एका व्यासपीठावर आल्याने ही बैठक राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची ठरली आहे.

“एक गाव – एक उमेदवार” ही भूमिका केवळ घोषणा न राहता जिल्हा परिषद निवडणुकीतील गेमचेंजर ठरणार असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. आव्हाळवाडीने दिलेला हा संदेश म्हणजे फोडाफोडीच्या राजकारणाला खुले आव्हान असून, येत्या निवडणुकीत याचे पडसाद संपूर्ण गटात उमटण्याची शक्यता आहे.
जिल्हा परिषद उमेदवार कोमल संदेश आव्हाळे यांना गावाने एकमुखाने पाठिंबा दिल्याने उद्यापासून संपूर्ण गाव त्यांच्या प्रचारासाठी फिरणार आहे.
मुख्य संपादक
चंद्रकांत दुंडे
8806043369

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

*एमआयटी एडीटी विद्यापीठाचा तेजस पाटील भारतीय फेन्सिंग संघात!*

0
* लोणी काळभोर प्रतिनिधी चीनमधील शांघायात होणाऱ्या प्रतिष्ठित ‘फॉइल ग्रँड प्रिक्स’ स्पर्धेत करणार देशाचे प्रतिनिधित्व* पुणे : येथील एमआयटी आर्ट, डिझाईन आणि तंत्रज्ञान विद्यापीठ (एडीटी), लोणी-काळभोर,...

0
लोणी काळभोर प्रतिनिधी : अनिरुद्ध मराठे. येथील पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या माळी मळा परिसरात आज मंगळवारी (५ मे) रोजी सकाळी पेट्रोलजन्य टँकरच्या वेल्डिंगचे काम सुरू...

लोणी काळभोर येथील माळी मळा भीषण स्फोटामुळे हादरला.नागरीकांमध्यै घबराट.

0
ब्रेकिंग न्यूज लोणी काळभोर येथील माळीमळा येथे वेल्डिंग करतेवेळी झालेल्या स्फोटात एक जण गंभीर जखमी असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे यामुळे लोणी काळभोर परीसरात...

मोक्का गुन्हयातील येरवडा जेलमधून पळालेला व ६ वर्षासून फरार असलेला आरोपी जेरबंद : पुणे...

0
लोणी काळभोर : पुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) शनिवार (२ मे) रोजी मोक्का गुन्हयातील व येरवडा जेलमधून पळालेला ६ वर्षापासून फरार असलेला...

सोनाई इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये बारावी मध्ये पुन्हा शंभर टक्के निकाल

0
लोणी काळभोर प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण बोर्डाच्या 2 मे 2026 रोजी जाहीर झालेल्या (HSC) बारावीच्या परीक्षेत राज्यातील अनेक शाळा व कनिष्ठ...

error: Content is protected !!