उरुळी कांचन : प्रतिनिधी ( सुनील तुपे ) ता. हवेली. उरुळी कांचन येथे
आज दिनांक ५ जानेवारी २०२५ रोजी ड्रिम्स युवा सोशल फाऊंडेशन संचलित उरुळी कांचन ग्रामस्वच्छता अभियान ग्रुपच्या १० व्या वर्धापन दिनानिमित्त रक्तदान शिबीराचे बी. जी. शिर्के प्राथमिक शाळा, उरुळी कांचन या ठिकाणी आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमप्रसंगी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र. कुलगुरू डॉ.पराग काळकर, श्रीमती अमृता क्षीरसागर (सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक),श्रीमती रेशमा शेख (सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक), प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणे हे प्रमुख पाहुणे म्हणून तर प्रा. के . डी . कांचन (उपाध्यक्ष, महात्मा गांधी सर्वोदय संघ, ऊरुळी कांचन) हे कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते.
याच कार्यक्रमाचे औचित्य साधून रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या निमित्ताने मान्यवरांच्या हस्ते सर्व सहभागी, आणि स्वयंसेवकांना मोफत हेल्मेट वाटप करण्यात आले. त्याचबरोबर पर्यावरण पूरक उपक्रमांची माहिती असलेल्या ड्रिम्स दिनदर्शिकेचे प्रकाशन देखील करण्यात आले.
उद्घाटन प्रसंगी बोलताना “देशातील समस्यांवरती उपाययोजना करण्यासाठी युवकांची जागृती आणि सहभाग अत्यंत महत्वाचा आहे आणि ड्रिम्स युवा सोशल फाऊंडेशन राबवित असलेल्या सर्व उपक्रम आणि त्यामध्ये असलेला युवकांचे सहभाग उल्लेखनीय आहे.” असे प्रतिपादन कार्यक्रमाचे प्रमुख पाहूणे डॉ. पराग काळकर सरांनी केले.
या शिबिराला देविदास शेठ भन्साळी, महादेव तुकाराम कांचन, सुरेखा देविदास शेठ भन्साळी, सुनिल लक्ष्मण कांचन, सुनिल तांबे, संभाजी कांचन, बजरंग म्हस्के, जयप्रकाश बेंद्रे, विजय टिळेकर, डॉ. शिवाजी बोराडे, अशोक मोरे, राजाराम कांचन, राजेंद्र टिळेकर, अमित कांचन, संतोष हरिभाऊ कांचन, भाऊसाहेब लक्ष्मण कांचन , सुनील जगताप, संतोष आबासाहेब कांचन, अलंकार कांचन, शांताराम चौधरी, सोमनाथ शेलार , सुनील गोते , संतोष चौधरी , महादेव काकडे, महंत रविराज पंजाबी , शैलेश गायकवाड , मनोज ताम्हाणे, सुभाष टिळेकर, तसेच ऊरुळी कांचन नगरी मधील सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रातील सर्वच मान्यवर उपस्थित होते.
ससून रक्तपेढी आणि तर्पण रक्तपेढी यांच्यामार्फत रक्त संकलन करण्यात आले. आजच्या या रक्तदान शिबिरामध्ये एकुण ९९३ रक्तदात्यांनी रक्तदान केले. त्यापैकी १६ महिला तर ९७७ पुरुष रक्तदात्यांचा समावेश होता. फाऊंडेशनच्या वतीने सर्व रक्तदात्यांना प्रमाणपत्र, नूतन वर्षाची ड्रिम्स दिनदर्शिका आणि भेट वस्तु देण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रुषिकेश भालेराव यांनी केले तर प्रास्ताविक धनाजी ढावारे आणि अरविंद चांदगुडे यांनी आभार प्रदर्शन केले.
संपादक चंद्रकांत दुंडे
बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क.8806043369
*ड्रिम्स युवा सोशल फाऊंडेशनने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरास ९९३ रक्तदात्यांचा उच्चांकी प्रतिसाद*
RELATED ARTICLES
- Advertisment -
सुरज चौधरी यांचेकडून पत्रकार बंधुसाठी स्नेहभेटीचे आयोजन.
लोणी काळभोर प्रतिनिधी - दिवाळी सणाचे औचित्य साधून पेठ गावचे आदर्श सरपंच सूरज भालचंद्र चौधरी यांच्या वतीने सर्व सन्माननीय पत्रकार बांधवांसाठी खास...
किल्ले सिंहगडावर दिपावली पहाट कार्यक्रम, हवेलीतील ऐतिहासिक वारशाच्या संवर्धनासह गडकिल्ल्यांच्या विकासासाठी कटिबद्ध- सभापती काकडे.
लोणी काळभोर प्रतिनिधी चंद्रकांत दुंडे
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या व स्वराज्याचे तिसरे छत्रपती राजाराम महाराज आणि नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या...
अंगारकी चतुर्थी निमित्ताने थेऊर येथे भाविकांची मोठी गर्दी.
लोणी काळभोर प्रतिनिधी
आज भाद्रपद महिन्यातील अंगारक चतुर्थी असल्याने भाविकांनी श्री चिंतामणीच्या दर्शनाला पहाटे पासून गर्दी केली होती. पहाटे पुजारी ...
यशवंत कारखान्याच्या सभेत गोंधळ घालून सभा उधळून पुन्हा बोगस सभा व खोटे प्रोसिडिंग लिहिण्याचा...
लोणी काळभोर प्रतिनिधी
यशवंत सहकारी साखर कारखान्याची मागिल सर्वसाधारण सभा म्हणजे दिनांक २६.फेब्रुवारी.२०२५ वा दिनांक २८.सप्टेबर.२०२५ च्या सर्वसाधारण सभा म्हणजे फक्त सभासदांना दिखाव्यासाठीचा...
कुंजीरवाडी येथील धनश्री कार्यालयात मराठा समाजाची बैठक संपन्न मनोज जरांगे...
लोणी काळभोर प्रतिनिधी - कुंजीरवाडी (ता. हवेली) येथील धनश्री कार्यालयात मराठा समाजाची महत्त्वपूर्ण बैठक उत्साहात संपन्न झाली. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी संघर्ष करणारे मनोज...