Homeताज्या बातम्यामतांसाठी पाणी बंद? महाराष्ट्रनगरमध्ये लोकशाहीवर घाला”

मतांसाठी पाणी बंद? महाराष्ट्रनगरमध्ये लोकशाहीवर घाला”

मुंबई | मानखुर्द प्रतिनिधी

मुंबई महापालिकेच्या २०२६ निवडणुकीच्या तोंडावर मानखुर्दमधील महाराष्ट्रनगर–चिताकॅम्प (वॉर्ड क्र.१४३) येथे नागरिकांना दबावात आणण्यासाठी पाणी कमी दाबाने देण्याचे आदेश देण्यात आल्याचा गंभीर आरोप स्थानिकांनी केला आहे. मतदारांच्या दैनंदिन जगण्याशी खेळ करणारी ही कृती लोकशाहीच्या मुळावर घाव घालणारी असल्याचा संतप्त सूर वस्तीभर उमटत आहे.

मुंबईसारख्या देशाच्या आर्थिक राजधानीत पिण्याचे पाणीही राजकीय हत्यार ठरावे, ही बाब लोकशाहीसाठी लज्जास्पद असल्याचे नागरिक ठामपणे सांगतात. गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्रनगर परिसरात पाणीपुरवठा मुद्दाम कमी दाबाने करण्यात आल्याने कष्टकरी, कामगार व नोकरदार वर्ग अक्षरशः अडचणीत सापडला आहे. “मतदार राजा आहे; पण येथे राजाची तहान मारली जात आहे,” अशी संतप्त प्रतिक्रिया रहिवाशांकडून व्यक्त होत आहे.
या पार्श्वभूमीवर वॉर्डातील नागरिकांनी कोणत्याही पक्षाच्या किंवा नेत्याच्या हस्तक्षेपाविना सौ. केशर सदाशिव बालगुडे यांना उमेदवारी दिली आहे. “ही उमेदवारी आमची आहे. आम्हीच तिला दिली आणि आम्हीच तिला विजयी करणार,” असा निर्धार वस्तीभर दिसून येतो. त्यांचे पती सदाशिव ऊर्फ ‘नळवाले दाजी’ बालगुडे यांनी कोरोना काळात घराघरांत जाऊन मदतीचा हात दिला, सुख-दुःखात सहभागी होत माणुसकीचे नाते जपले याच विश्वासावर हे नेतृत्व उभे राहिले आहे.
मात्र, निवडणूक दोन दिवसांवर असताना सत्ताधाऱ्यांकडून पाणीपुरवठ्यावर गदा आणली जात असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. “गटारे तुंबलेली, स्वच्छतागृहांची दयनीय अवस्था आणि आता पाण्याची अडवणूक हेच का लोकप्रतिनिधींचे काम?” असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला आहे.
विचारवंतांच्या मते, मूलभूत गरजा रोखून राजकीय फायदा मिळवण्याचा प्रयत्न हा लोकशाहीच्या आत्म्यावर आघात आहे. ९०च्या दशकात समाजसेविका मृणाल गोरे ‘पाणीवाली बाई’ म्हणून ओळखल्या गेल्या, कारण त्यांनी नागरिकांना पाणी मिळवून दिले तेव्हाच जनतेने त्यांना प्रचंड बहुमताने निवडून दिले होते. आज महाराष्ट्रनगरमध्येही नागरिकांनी स्वतःचा उमेदवार उभा केला असून, “हा विजय व्यक्तीचा नव्हे, आमच्या हक्कांचा असेल,” अशी भावना प्रबळ होत आहे.
पाणी हा हक्क आहे; दबावाचे साधन नव्हे. मतदाराला त्रास देऊन सत्ता मिळवता येत नाही—हा इशारा महाराष्ट्रनगरमधून सत्ताधाऱ्यांना ठामपणे दिला जात आहे
मुख्य संपादक
चंद्रकांत दुंडे
संपर्क 8806043369

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता उद्योजक व्हावे.उदय काळभोर.

0
लोणी काळभोर प्रतिनिधी कदमवाकवस्ती येथील एम आयटी काॅर्नर येथे चार तरुणांनी एकत्र येत ‘सात्विक थाळी’ नावाने हॉटेल सुरू केले हॉटेलचे उद्घाटन...

कोरेगाव भिमा विजयस्तंभ परीसरात वर्षावास प्रवचन मालिकेचे उद्घाटन.

0
लोणी काळभोर प्रतिनिधी दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तालुका हवेली पूर्व च्या अंतर्गत ग्राम शाखा पेरणे फाटा यांच्या विद्यमाने ऐतिहासिक कोरेगाव भीमा ...

थेऊर येथील ‘समाधान शिबिर’ भर पावसात उत्साहात संपन्न, हवेलीतील पानंद रस्त्यांसाठी भरीव निधी उपलब्ध...

0
लोणी काळभोर प्रतिनिधी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त व दिवंगत उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांच्या प्रथम जयंती निमित्त तसेच महसूल दिनाचे औचित्यसाधून, पंचायत...

*एमआयटी एडीटी विद्यापीठाचा तेजस पाटील भारतीय फेन्सिंग संघात!*

0
* लोणी काळभोर प्रतिनिधी चीनमधील शांघायात होणाऱ्या प्रतिष्ठित ‘फॉइल ग्रँड प्रिक्स’ स्पर्धेत करणार देशाचे प्रतिनिधित्व* पुणे : येथील एमआयटी आर्ट, डिझाईन आणि तंत्रज्ञान विद्यापीठ (एडीटी), लोणी-काळभोर,...

error: Content is protected !!