Homeराजकीयविधानसभा निवडणुकीमुळे कार्यकर्त्यांना आले सुगिचे दिवस

विधानसभा निवडणुकीमुळे कार्यकर्त्यांना आले सुगिचे दिवस

लोणी काळभोर प्रतिनिधी :तुळशीराम घुसाळकर

विधानसभा निवडणूक २० नोव्हेंबर रोजी असल्याने गेल्या दीड-दोन वर्षांपासून अडगळीत पडलेल्या कार्यकर्त्यांना चांगलाच भाव आला असून, नेते व विविध पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्त्यांची आस्थेवाईकपणे विचारपूस करत असताना दिसत आहेत. विशेष म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका विविध कारणांनी पुढे ढकलल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये निराशेचे वातावरण होते. नेते, पदाधिकारी, इच्छुक उमेदवारही विचारत नसल्याने कार्यकर्ते जवळपास गायब झाले होते. आता लोकसभेच्या निवडणुकीमुळे कार्यकर्त्यांनी सुगीचे दिवस आले आहेत.
लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणूका आल्याने होण्याची जिल्ह्यातील प्रत्येक मतदारसंघात उमेदवार आणि नेते मंडळी कार्यकर्त्यांची फळी मजबूत करण्यासाठी कामाला लागले आहेत. जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी इच्छुकांना विधानसभा निवडणुका कामाला येणार आहेत. त्यामुळे आतापर्यंत दुर्लक्षित असलेल्या कार्यकर्त्यांची आठवण नेत्यांना होत आहे. त्यामुळे सुख-दुःखाच्या प्रसंगात नेतेमंडळी आता आवर्जून हजेरी लावत आहेत. उमेदवार प्रकाशझोतात राहण्यासाठी वेगवेगळ्या क्लृप्त्या शोधत आहेत.
साखरपुडा टिळा,व . दशक्रिया विधीसाठी गर्दी वाढली आहे. एरवी कोणाचे निधन झाले, याकडे लक्ष न देणारे नेते सांत्वन करण्यासाठी सर्वसामान्यांच्या घराचा उंबरा चढत आहेत. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्याआधीपासुन विविध उपक्रम राबविण्यावर भर देत आहेत.
सद्यःस्थितीत नगरपालिका निवडणुका नसल्या, तरी विधानसभा निवडणूक असल्याने महायुती आणि महाविकास आघाडीतील दोन्ही बाजूचे नेते ॲक्टिव्ह झाले आहेत. महाविकास आघाडीतील लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते तालुका पातळीवर ॲक्टिव्ह झाले आहेत. महायुतीतील नेते, पदाधिकारी एकत्रित विविध कार्यक्रमांना हजेरी लावून वातावरणनिर्मितीसाठी प्रयत्न करीत आहेत. यामुळे जिल्ह्यासह तालुक्यातील राजकारण तापत आहे.
लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत बदललेल्या राजकीय विचारसरणीमुळे निष्ठावंत हा शब्दच आता कोणासाठी वापरायचा हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. कारण सत्ता, निवडणूक आणि पैसा या एकाच विचाराने सगळेच पक्ष निवडणुकीचा विचार करीत आहेत. त्यामुळे पक्षाची ध्येयधोरणे ही कुठेतरी बाजूला ठेवून निवडणूक जिंकण्याचा विचार पक्ष करत आहेत. पूर्वी पक्षाशी प्रामाणिक राहणाऱ्या अनेक वर्ष काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना पक्ष उमेदवारी द्यायचा; परंतु सध्या जिंकून येण्याची शक्यता आणि आर्थिक स्थिती पडताळून दुसऱ्या पक्षातील आयात उमेदवाराला प्राधान्य देवून आपल्या पक्षात घेऊन उमेदवारी दिल्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढल्याने निष्ठावंत कार्यकर्त्यांची ससेहोलपट होताना दिसत आहे.
निवडणूक प्रचारात आपल्या पक्षाची भक्कम बाजू मांडण्याचे काम कार्यकर्त्यांच्या माध्यमातून केले जाते. पूर्वी तन-मन-धनाने आणि हिरीरीने कार्यकर्ते आपल्या नेत्याचा व पक्षाचा प्रचार करायचे; परंतु आता नेतेच
पक्षांतर करीत असल्यामुळे कार्यकर्त्यांसमारे कोणता झेंडा घेऊ हाती? हा प्रश्न पडला आहे. ज्या नेत्याकडून आपल्याला लाभ होणार आहे, ज्यामुळे आपल्याला नोकरी-व्यवसायामध्ये फायदा होणार आहे. तसेच आपल्या अडी-अडचणीसाठी मदत होणार आहे. अशाच नेत्याच्या पाठीमागे कार्यकर्ते पळत असल्याचे पहावयास मिळत आहे. पूर्वी विचारासाठी पक्षात काम करीत असणाऱ्या कार्यकर्त्यांची फळीच आता नामशेष झाली आहे.
पक्ष, त्या पक्षाचा विचार यापेक्षा माझा फायद्याचा कोणता नेता, त्यामागेच पळणाऱ्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे नेत्यांसारखेच कार्यकर्तेही आता मतलबी झाल्याचे पहावयास मिळत आहे. पूर्वी कार्यकर्ता हा सतत पाच वर्ष पक्षाचे काम करायचा; परंतु सध्या निवडणुकीपुरताच पक्षाचे काम करणारे कार्यकर्ते मोठ्या संख्येने दिसत आहेत. त्यामुळे कार्यकर्तेही त्याच पद्धतीचा विचार करुन काम करीत आहेत. सध्या नेत्यांनी कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन मनधरणी करुन प्रचाराला लावण्यासाठी प्रयत्न चालवले आहेत. लग्नसमारंभ, दशक्रिया विधी, पूजा, वाढदिवस यासारख्या कार्यक्रमांमध्ये उपस्थित राहून नेते आपल्या कार्यकर्त्यांना खूश करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे विविध कार्यक्रमांना नेत्यांची वर्दळ वाढली असून अनेक कार्यकर्ते छोट्या- मोठ्या लग्नसमारंभामध्ये जाऊन भेटी देऊ लागले आहेत.
सध्या निवडणुकीचे ऊन तापू लागले आहे. त्याचप्रमाणे प्रचार ही तापू लागला असून येणाऱ्या दिवसांत आरोप-प्रत्यारोपांनी वातावरण गरम होणार आहे. सध्या मात्र सर्वत्र नेतेमंडळी कार्यकर्त्यांची मनधरणी करताना आणि या कार्यकर्त्यांनी आपल्याच पक्षाचे काम करावे, यासाठी प्रयत्न करीत आहेत. निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यांना मोठ्या प्रमाणावर मागणी असून नेतेमंडळी या कार्यकर्त्यांची विशेष दखल घेताना पहावयास मिळणार आहे. त्यामुळे सध्या पक्षापासून दूर असलेला आणि अडगळीत पडलेल्या कार्यकर्त्यांलाही चांगले दिवस आल्याचे पहावयास मिळत आहे.
संपादक चंद्रकात दुंडे
बातमी, जाहिरातीसाठी संपर्क 8806043369

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

*एमआयटी एडीटी विद्यापीठाचा तेजस पाटील भारतीय फेन्सिंग संघात!*

0
* लोणी काळभोर प्रतिनिधी चीनमधील शांघायात होणाऱ्या प्रतिष्ठित ‘फॉइल ग्रँड प्रिक्स’ स्पर्धेत करणार देशाचे प्रतिनिधित्व* पुणे : येथील एमआयटी आर्ट, डिझाईन आणि तंत्रज्ञान विद्यापीठ (एडीटी), लोणी-काळभोर,...

0
लोणी काळभोर प्रतिनिधी : अनिरुद्ध मराठे. येथील पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या माळी मळा परिसरात आज मंगळवारी (५ मे) रोजी सकाळी पेट्रोलजन्य टँकरच्या वेल्डिंगचे काम सुरू...

लोणी काळभोर येथील माळी मळा भीषण स्फोटामुळे हादरला.नागरीकांमध्यै घबराट.

0
ब्रेकिंग न्यूज लोणी काळभोर येथील माळीमळा येथे वेल्डिंग करतेवेळी झालेल्या स्फोटात एक जण गंभीर जखमी असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे यामुळे लोणी काळभोर परीसरात...

मोक्का गुन्हयातील येरवडा जेलमधून पळालेला व ६ वर्षासून फरार असलेला आरोपी जेरबंद : पुणे...

0
लोणी काळभोर : पुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) शनिवार (२ मे) रोजी मोक्का गुन्हयातील व येरवडा जेलमधून पळालेला ६ वर्षापासून फरार असलेला...

सोनाई इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये बारावी मध्ये पुन्हा शंभर टक्के निकाल

0
लोणी काळभोर प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण बोर्डाच्या 2 मे 2026 रोजी जाहीर झालेल्या (HSC) बारावीच्या परीक्षेत राज्यातील अनेक शाळा व कनिष्ठ...

error: Content is protected !!