उरुळी कांचन : प्रतिनिधी ( सुनील तुपे ) ता . हवेली ,उरुळी कांचन येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई ज्योतिराव फुले यांच्या १९४ व्या जयंतीनिमित्त उरुळी कांचन अखिल माळी समाज संघाच्या वतीने तुपे वस्ती उरुळी कांचन येथे सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून सर्व उपस्थितांच्या वतीने सावित्रीबाईंच्या अद्वितीय कार्यास अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी सावित्रीबाई फुलेंचे जीवन चरित्र सांगत असतानाच त्यांनी केलेले सकल समाजासाठीचे कार्य शेकडो वर्षानंतर आजही समाजास दीपस्तंभ प्रमाणे मार्गदर्शक आणि प्रेरणादायी ठरत असल्याचे सांगितले. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचा इतिहास, छत्रपती संभाजी राजांच्या बलिदानाच्या इतिहासा प्रमाणेच, जिजाऊ माँसाहेब, राणी लक्ष्मीबाई, अहिल्यादेवी होळकर, बाजीराव पेशव्यांपासून ते लोकमान्य टिळक, नेताजी सुभाषचंद्र बोस, महात्मा गांधी, वीर सावरकर, डॉ बाबासाहेब आंबेडकर, राजश्री शाहू महाराज अशा आपल्या तमाम राष्ट्रपुरुषांच्या गौरवशाली आणि अभिमानास्पद कार्याचा इतिहास आपण आवर्जून आपल्या पुढील पिढीस शिकवून एक आदर्श समाज व्यवस्था निर्माण करणे, हीच खऱ्या अर्थाने सावित्रीबाई फुले यांना आदरांजली ठरेल असे मत महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेचे पुणे विभागीय संचालक विकास जगताप यांनी व्यक्त केले. याप्रसंगी अस्मिता महिला पतसंस्थेच्या चेअरमन प्रतिभा कांचन , रोहिणी कुदळे , भानुदास जगताप, नामदेव जगताप , गोविंद शिवरकर , गणेश जगताप, सुरेश जगताप , आदी मान्यवर उपस्थित होते , संजय रायकर यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले, तर कार्यक्रमाचे आयोजन अखिल माळी समाज संघाच्या सर्व कार्यकर्त्यांन कडून करण्यात आले होते,
संपादक चंद्रकांत दुंडे.
बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क.8806043369
पुणे फास्ट नुजचे ,व्हाट्स अप गृप मध्ये सहभागी होण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा https://punefastnews.in
*क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे कार्य दीपस्तंभा सारखे – विकास जगताप*
RELATED ARTICLES
- Advertisment -
कुंजीरवाडी येथील धनश्री कार्यालयात मराठा समाजाची बैठक संपन्न मनोज जरांगे...
लोणी काळभोर प्रतिनिधी - कुंजीरवाडी (ता. हवेली) येथील धनश्री कार्यालयात मराठा समाजाची महत्त्वपूर्ण बैठक उत्साहात संपन्न झाली. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी संघर्ष करणारे मनोज...
तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता उद्योजक व्हावे.उदय काळभोर.
लोणी काळभोर प्रतिनिधी
कदमवाकवस्ती येथील एम आयटी काॅर्नर येथे चार तरुणांनी एकत्र येत ‘सात्विक थाळी’ नावाने हॉटेल सुरू केले हॉटेलचे उद्घाटन...
कोरेगाव भिमा विजयस्तंभ परीसरात वर्षावास प्रवचन मालिकेचे उद्घाटन.
लोणी काळभोर प्रतिनिधी
दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तालुका हवेली पूर्व च्या अंतर्गत ग्राम शाखा पेरणे फाटा यांच्या विद्यमाने ऐतिहासिक कोरेगाव भीमा ...
थेऊर येथील ‘समाधान शिबिर’ भर पावसात उत्साहात संपन्न, हवेलीतील पानंद रस्त्यांसाठी भरीव निधी उपलब्ध...
लोणी काळभोर प्रतिनिधी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त व दिवंगत उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांच्या प्रथम जयंती निमित्त तसेच महसूल दिनाचे औचित्यसाधून, पंचायत...