लोणी काळभोर प्रतिनिधी
कदमवाकवस्ती येथील एम आयटी काॅर्नर येथे चार तरुणांनी एकत्र येत ‘सात्विक थाळी’ नावाने हॉटेल सुरू केले हॉटेलचे उद्घाटन कदमवाकवस्ती गावचे सुपुत्र पोलीस उपनिरीक्षक उदय काळभोर यांच्या शुभहस्ते संपन्न झाले यावेळी त्यांनी चारही तरूणांना शुभेच्छा देत तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता स्वतःचे व्यवसाय सुरू करुन उद्योजक व्हावे असे आवाहन केले.यामध्ये लोणी काळभोर व कदमवाकवस्ती येथे रहिवासी असणारे अक्षय गिरमकर,विशाल दुंडे,विशाल निगडे आणि बलराम मोळवणे या तरुणांनी एकत्र येत या व्यवसायात पदार्पण केले आहे.तरुणांनी सुरू केलेल्या ‘सात्विक थाळी’ हॉटेलचे उद्घाटन उत्साहात आणि आनंदी वातावरणात संपन्न झाले. पारंपरिक महाराष्ट्रीयन चवीचा आस्वाद ग्राहकांना मिळावा, या उद्देशाने या हॉटेलची सुरुवात करण्यात आली आहे. तसेच या ठिकाणी मेसच्या माध्यमातून चांगले दर्जेदार जेवण देणारे असल्याचे या तरुणांनी सांगितले.त्यांच्या या उपक्रमाचे परीसरातुन कोतुक होत आहे.
यावेळी परिसरातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, मित्रपरिवार व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तरुणांनी व्यवसाय क्षेत्रात पुढाकार घेत स्वतःचा व्यवसाय उभारल्याबद्दल उपस्थितांनी त्यांचे कौतुक केले.
स्वच्छता, दर्जेदार पदार्थ, घरगुती चव आणि ग्राहकांना उत्तम सेवा देण्यावर विशेष भर देण्यात येणार असल्याचे हॉटेल व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले. सात्विक व रुचकर भोजनामुळे हे हॉटेल ग्राहकांच्या पसंतीस उतरेल, असा विश्वास यावेळी उपस्थितांकडुन व्यक्त करण्यात आला.
मुख्य संपादक चंद्रकांत दुंडे
संपर्क.8806043369.
तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता उद्योजक व्हावे.उदय काळभोर.
RELATED ARTICLES
- Advertisment -
कोरेगाव भिमा विजयस्तंभ परीसरात वर्षावास प्रवचन मालिकेचे उद्घाटन.
लोणी काळभोर प्रतिनिधी
दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तालुका हवेली पूर्व च्या अंतर्गत ग्राम शाखा पेरणे फाटा यांच्या विद्यमाने ऐतिहासिक कोरेगाव भीमा ...
थेऊर येथील ‘समाधान शिबिर’ भर पावसात उत्साहात संपन्न, हवेलीतील पानंद रस्त्यांसाठी भरीव निधी उपलब्ध...
लोणी काळभोर प्रतिनिधी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त व दिवंगत उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांच्या प्रथम जयंती निमित्त तसेच महसूल दिनाचे औचित्यसाधून, पंचायत...
*एमआयटी एडीटी विद्यापीठाचा तेजस पाटील भारतीय फेन्सिंग संघात!*
* लोणी काळभोर प्रतिनिधी
चीनमधील शांघायात होणाऱ्या प्रतिष्ठित ‘फॉइल ग्रँड प्रिक्स’ स्पर्धेत करणार देशाचे प्रतिनिधित्व*
पुणे : येथील एमआयटी आर्ट, डिझाईन आणि तंत्रज्ञान विद्यापीठ (एडीटी), लोणी-काळभोर,...