Homeराजकीयनिष्ठावंत शिलेदाराला भरघोस मतांनी निवडून द्या.सुप्रिया सुळे

निष्ठावंत शिलेदाराला भरघोस मतांनी निवडून द्या.सुप्रिया सुळे

लोणी काळभोर प्रतिनिधी महाविकास आघाडीचे शिरूर हवेलीचे अधिकृत उमेदवार अशोक बापू पवार यांच्या प्रचारार्थ सुप्रिया सुळे यांची लोणी काळभोर येथे सभा झाली यावेळी बोलताना त्यांनी महायुतीवर चौफेर टीका करत महायुतीच्या ध्येयधोरणांचा समाचार घेतला.
या सभेला नागरिकांची मोठी गर्दी होती यावेळी बोलताना त्यांनी अनेक मुद्द्यांना हात घातला. राज्यात गेल्या अडीच वर्षांपासून जे घडतंय यांचा पाढाच खासदार सुप्रिया सुळे यांनी मांडला.राज्यातील वाढती महागाई बेरोजगारी महिलांवरील अत्याचारांच्या वाढत्या घटना याकडे लक्ष वेधले राज्यासमोर हे मुद्दे असताना हे मुद्दे सोडवण्यात महायुती सरकार सपशेल अपयशी ठरले असून याला भारतीय जनता पार्टीच जबाबदार असल्याचा घणाघात त्यांनी केला.
यावेळी त्यांनी एका दैनिकाचा हवाला देत सांगितले की यशवंतराव चव्हाण साहेबांपासून आजपर्यंत महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती कशी राहिलेली आहे नोकऱ्या कधी आलेले आहेत हा सगळा जर चार्ट बघितला तर सगळ्यात विकासाचा उच्चांक कुठल्या मुख्यमंत्र्यांच्या काळात झाला त्या माणसाचं नाव शरद पवार आहे.
यावेळी त्यांनी शिवाजीराव भोसले सहकारी बँकेच्या ठेवीदारांचे बुडलेल्या पैसे वसूल करण्यासाठी संसदेत आवाज उठवणार असून ठेवीदारांच्या हक्कासाठी अर्थमंत्र्यांना भेटून प्रश्नाची सोडवणूक करणार असल्याचे सांगितले. सरकार आल्यावर अशोक पवारांना राज्यात मोठी जबाबदारी देणार असल्याचे सांगून राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर महिलांच्या सुरक्षेसाठी राज्यात सगळ्यात मोठी पोलिस भरती करणार तसेच राज्यातील महिलांसाठी महालक्ष्मी योजना राबवून महिलांना तीन हजार रुपये देणार असल्याचे सांगितले मी विकासला मत मागायला आलेली आहे. गेल्या दीड दोन वर्षाच्या काळात या राज्यामध्ये अनेक दुर्दैवी घटना घडल्या पक्ष फोडला अशा कठिण संघर्षाच्या काळात पवार साहेबांच्या खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या ज्यांच्यावर खोटेनाटे आरोप झालं कुटुंबांला त्रास दिला तरीही न डागमगता आपल्या भूमिकेवर ठाम राहणाऱ्या आमदार अशोक पवार यांनी पवार साहेबांबरोबर थांबण्याचा निर्णय घेतला त्यामुळे तुम्ही पवार साहेबांच्या निष्ठावांत शिलेदाराला भरघोस मतांनी निवडून द्या असे आवाहन खासदार सुप्रिया सुळे यांनी केले

यावेळी महाविकास आघाडीच्या अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी हवेलीचे जेष्ठ नेते माधव काळभोर,आप्पासाहेब काळभोर,मा.सरपंच शरद काळभोर मा.उपसभापती युगंधर उर्फ सनी काळभोर ग्रामपंचायत सदस्य नागेश काळभोर यांचेसह अनेक पुर्व हवेलीतील नेतेमंडळी पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने मतदार उपस्थित होते. संपादक चंद्रकांत दुंडे. बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क 8806043369

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता उद्योजक व्हावे.उदय काळभोर.

0
लोणी काळभोर प्रतिनिधी कदमवाकवस्ती येथील एम आयटी काॅर्नर येथे चार तरुणांनी एकत्र येत ‘सात्विक थाळी’ नावाने हॉटेल सुरू केले हॉटेलचे उद्घाटन...

कोरेगाव भिमा विजयस्तंभ परीसरात वर्षावास प्रवचन मालिकेचे उद्घाटन.

0
लोणी काळभोर प्रतिनिधी दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तालुका हवेली पूर्व च्या अंतर्गत ग्राम शाखा पेरणे फाटा यांच्या विद्यमाने ऐतिहासिक कोरेगाव भीमा ...

थेऊर येथील ‘समाधान शिबिर’ भर पावसात उत्साहात संपन्न, हवेलीतील पानंद रस्त्यांसाठी भरीव निधी उपलब्ध...

0
लोणी काळभोर प्रतिनिधी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त व दिवंगत उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांच्या प्रथम जयंती निमित्त तसेच महसूल दिनाचे औचित्यसाधून, पंचायत...

*एमआयटी एडीटी विद्यापीठाचा तेजस पाटील भारतीय फेन्सिंग संघात!*

0
* लोणी काळभोर प्रतिनिधी चीनमधील शांघायात होणाऱ्या प्रतिष्ठित ‘फॉइल ग्रँड प्रिक्स’ स्पर्धेत करणार देशाचे प्रतिनिधित्व* पुणे : येथील एमआयटी आर्ट, डिझाईन आणि तंत्रज्ञान विद्यापीठ (एडीटी), लोणी-काळभोर,...

error: Content is protected !!