Homeमहत्त्वाचे*पुण्यात रविवारी 'हार्टफुलनेस रन'चे आयोजन* *शारीरिक व मानसिक आरोग्यासह पर्यावरणासाठी...

*पुण्यात रविवारी ‘हार्टफुलनेस रन’चे आयोजन* *शारीरिक व मानसिक आरोग्यासह पर्यावरणासाठी अभिनव उपक्रम*

पुणे : ग्रॅन्यूल्स ग्रीन हार्टफुलनेस रन या जागतिक उपक्रमाचे आयोजन 1 डिसेंबर 2024 रोजी सकाळी ६ वाजता पुण्यात होणार आहे. वाघोली येथील एसएनबीपी इंटरनॅशनल स्कूल येथे सुरू होणारी आणि नगर रोडवरून परत येणारी ही स्पर्धा हार्टफुलनेस संस्थेने श्री.कमलेश डी. पटेल (दाजी) यांच्या मार्गदर्शनाखाली युवा व क्रीडा मंत्रालय व फिट इंडिया मूव्हमेंट यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आली आहे. देशभरात ८० ठिकाणी होणारी ही मॅरेथाॅनमध्ये जवळपास ४०,०००+ लोक एकत्र येणार आहेत. या मॅरेथाॅनचा उद्देश शारीरिक, मानसिक आणि भावनिक स्वास्थ्य वाढवणे तसेच पर्यावरणीय शाश्वतता टिकवणे हा आहे.
या रनमध्ये सहभागी होणाऱ्यांना 1 किमी, 3 किमी, 5 किमी, व 10 किमी या श्रेणीमध्ये सहभागी होण्याचा पर्याय देण्यात आला आहे. तसेच, या उपक्रमातून जमा होणाऱ्या निधीचा उपयोग 10,000 झाडे लावण्यासाठी करण्यात येईल. या मॅरेथॉनला डॉ. जगन्नाथ दीक्षित, डायबेटीस रिव्हर्सल तज्ज्ञ आणि प्रीती मस्के, गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड धारक, यांच्या प्रमुख उपस्थितीत हिरवा झेंडा दाखविण्यात येणार आहे.
एमआयटी-एडीटी युनिव्हर्सिटी, अदार पूनावाला ग्रुप, जी.एच. रायसोनी कॉलेज, अॅडव्हेंचर आयआयटी, गिरिराज ज्वेलर्स आणि आयव्ही इस्टेट या नामांकित संस्थांनी या अभीनव उपक्रमाला पाठिंबा दर्शविला आहे. या उपक्रमाची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेसाठी एसएनबीपी स्कूलच्या प्राचार्या श्वेता वकील, हार्टफुलनेसचे प्रवक्ते विक्रम मकवाना, प्रतिनिधी सुरभी सहाई, युवा प्रतिनिधी प्रशांत पाटील, एडव्हेंचर आयआयटीचे प्रभज्योत सिंग, गौतम बिरहाडे, एमआयटी एडीटी विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी प्रा.चंद्रकांत बोरुडे आदी उपस्थित होते.
मकवाना म्हणाले, “या धावण्याच्या उपक्रमात सर्वांनी सहभागी व्हावे, मग धावणे असो, जॉगिंग असो किंवा चालणे, हे शाश्वतता आणि सामुदायिक आरोग्यासाठी आहे. हार्टफुलनेसने 2020 पासून 20 लाखांहून अधिक झाडे लावली आहेत आणि 80 हून अधिक दुर्मिळ प्रजातींचे संवर्धन केले आहे. या उपक्रमामुळे 1,027 एकर जमीन पुनर्जीवित झाली आहे आणि 25,000 टन कार्बन उत्सर्जनाचे समतोल राखण्यात यश आले आहे.
सुरभी सहाई म्हणाल्या, १६० देशांमध्ये सक्रिय असलेल्या हार्टफुलनेसकडून व्यक्ती, शाळा आणि कॉर्पोरेशनसाठी मोफत ध्यान आणि इतर आरोग्य कार्यक्रम राबविले जातात. त्यामुळे या हरित आणि आरोग्यदायी उपक्रमाचा भाग बनण्यासाठी greenheartfulnessrun.com येथे त्वरित नोंदणी करा,” असे आवाहनही त्यांनी केले.
प्रा. बोरुडे म्हणाले की, “प्रा. डॉ. विश्वनाथ कराड यांनी विद्यार्थ्यांना शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या सशक्त होण्याचा सल्ला दिला आहे. त्यांच्या दृष्टिकोनाला पूरक उपक्रम म्हणून डॉ. मंगेश कराड यांनी या हार्टफुलनेस मिशनला पाठिंबा दिला आहे.”

आजकाल आपण बहुतेक जण छोट्या कुटुंबांमध्ये राहतो त्यामुळे आपल्याला आधाराची गरज आहे. ही एकत्र उभे राहण्याची, इतरांसाठी विचार करण्याची, आणि दयाळू व करुणामय समाज तयार करण्याची वेळ आहे. आपल्याला चांगुलपणा आणि एकतेचा प्रसार करायचा आहे. प्रत्येक कुटूंबातील व्यक्तीला आधार व मदत देण्यासाठी हार्टफुलनेस समर्पित आहे.
*- श्री.कमलेश डी. पटेल (दाजी),*
संस्थापक, हार्टफुलनेस इन्स्टिट्यूट

संपादक.चंद्रकांत दुंडे. बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क 8806043369

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

यशवंत कारखान्याच्या सभेत गोंधळ घालून सभा उधळून पुन्हा बोगस सभा व खोटे प्रोसिडिंग लिहिण्याचा...

0
लोणी काळभोर प्रतिनिधी यशवंत सहकारी साखर कारखान्याची मागिल सर्वसाधारण सभा म्हणजे दिनांक २६.फेब्रुवारी.२०२५ वा दिनांक २८.सप्टेबर.२०२५ च्या सर्वसाधारण सभा म्हणजे फक्त सभासदांना दिखाव्यासाठीचा...

कुंजीरवाडी येथील धनश्री कार्यालयात मराठा समाजाची बैठक संपन्न मनोज जरांगे...

0
लोणी काळभोर प्रतिनिधी - कुंजीरवाडी (ता. हवेली) येथील धनश्री कार्यालयात मराठा समाजाची महत्त्वपूर्ण बैठक उत्साहात संपन्न झाली. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी संघर्ष करणारे मनोज...

तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता उद्योजक व्हावे.उदय काळभोर.

0
लोणी काळभोर प्रतिनिधी कदमवाकवस्ती येथील एम आयटी काॅर्नर येथे चार तरुणांनी एकत्र येत ‘सात्विक थाळी’ नावाने हॉटेल सुरू केले हॉटेलचे उद्घाटन...

कोरेगाव भिमा विजयस्तंभ परीसरात वर्षावास प्रवचन मालिकेचे उद्घाटन.

0
लोणी काळभोर प्रतिनिधी दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तालुका हवेली पूर्व च्या अंतर्गत ग्राम शाखा पेरणे फाटा यांच्या विद्यमाने ऐतिहासिक कोरेगाव भीमा ...

थेऊर येथील ‘समाधान शिबिर’ भर पावसात उत्साहात संपन्न, हवेलीतील पानंद रस्त्यांसाठी भरीव निधी उपलब्ध...

0
लोणी काळभोर प्रतिनिधी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त व दिवंगत उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांच्या प्रथम जयंती निमित्त तसेच महसूल दिनाचे औचित्यसाधून, पंचायत...

error: Content is protected !!