Homeताज्या बातम्यासमाजहिताला नडणारा नाही तर समाजाच्या हितासाठी लढणारा उमेदवार निवडा ...

समाजहिताला नडणारा नाही तर समाजाच्या हितासाठी लढणारा उमेदवार निवडा – राजेंद्र चौधरी

लोणी काळभोर प्रतिनिधी – आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांचा बिगुल वाजला असुन मतदान काही दिवसांवर येऊन ठेपले आहे. तस तसे पुर्व हवेलीतील राजकीय वातावरण तापू लागले असून विविध पक्षांचे इच्छुक उमेदवार मतदारसंघात फिरत असल्याचे दिसून येत आहे . पुर्व हवेलीसारख्या वाढत्या, आधुनिक होत असलेल्या भागात सशक्त नेतृत्व, पारदर्शक प्रशासन आणि नागरिकांची खरी काळजी घेणारा प्रतिनिधी निवडणे ही काळाची गरज बनली असून समाजहिताला नडणारा नाही तर समाजहितासाठी लढणारा उमेदवार निवडा असे आवाहन नायगावचे माजी प्रभारी सरपंच राजेंद्र चौधरी यांनी केले आहे .
आज सर्वात जास्त गरज आहे ती “समाजहिताला नडणारा नव्हे, तर समाजहितासाठी लढणारा उमेदवार ” निवडण्याची.निवडणूक आली की वचनांची बरसात होते. पण प्रत्यक्ष कामाच्या वेळी काही लोक गायब होतात.त्यामुळे या वेळेस हुशारीने मतदान करत भविष्य घडवणारा उमेदवार निवडणे महत्त्वाचे आहे. हे गुण कोरेगाव मुळ गणाचे भाजपचे उमेदवार आदर्श सरपंच सुरज चौधरी यांच्या मध्ये असुन एका शेतकरी कुंटुबातुन आलेला युवा कार्यकर्ता म्हणून पुर्व हवेलीतील प्रत्येक गावात ओळख निर्माण केली आहे .

नागरिकांसाठी लढणारा

अनेक वेळा अधिकारी, कंत्राटदार किंवा राजकीय दबावामुळे नागरी सुविधा रखडतात. अशावेळी तुमच्या भागाचा सदस्य
ठामपणे आवाज उठवणारा हवा. रस्ते, पाणी, वाहतूक कोंडी , कचरा व्यवस्थापन यांसारख्या मूलभूत प्रश्नांसाठी पंचायत समितीमध्ये ठाम भूमिका घेणारा नागरिकांच्या तक्रारींवर तत्काळ अँक्शन घेणारा प्रशासनासमोर निडरपणे उभा राहणारा सदस्य म्हणून सरज चौधरी निवडणे खुप महत्वाचे आहे .

भ्रष्टाचारापासून दूर असलेला उमेदवार

उमेदवाराने आपल्या भागासाठी किंवा समाजकार्यासाठी काय केले आहे .त्याचा जनसंपर्क आणि त्याची उपलब्धता किती आहे .तो नागरिकांमध्ये मिसळतो का? समस्यांकडे लक्ष देतो का? हे बघणे सुद्धा महत्वाचे आहे . तो भ्रष्टाचारापासून दूर आहे का त्याच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप तर नाही ना ? हे पाहणे खुप गरजेचे असुन सुरज चौधरी या भ्रष्टाचारापासून दूर असुन वेळ प्रसंगी स्वतः च्या खिशातील पैसे समाजासाठी खर्च करण्याची दानत आदर्श सरपंच सुरज चौधरी यांच्या मध्ये असल्याचे राजेंद्र चौधरी यांनी सांगितले
मुख्य संपादक चंद्रकांत दुंडे
8806043369
.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

कुंजीरवाडी येथील धनश्री कार्यालयात मराठा समाजाची बैठक संपन्न मनोज जरांगे...

0
लोणी काळभोर प्रतिनिधी - कुंजीरवाडी (ता. हवेली) येथील धनश्री कार्यालयात मराठा समाजाची महत्त्वपूर्ण बैठक उत्साहात संपन्न झाली. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी संघर्ष करणारे मनोज...

तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता उद्योजक व्हावे.उदय काळभोर.

0
लोणी काळभोर प्रतिनिधी कदमवाकवस्ती येथील एम आयटी काॅर्नर येथे चार तरुणांनी एकत्र येत ‘सात्विक थाळी’ नावाने हॉटेल सुरू केले हॉटेलचे उद्घाटन...

कोरेगाव भिमा विजयस्तंभ परीसरात वर्षावास प्रवचन मालिकेचे उद्घाटन.

0
लोणी काळभोर प्रतिनिधी दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तालुका हवेली पूर्व च्या अंतर्गत ग्राम शाखा पेरणे फाटा यांच्या विद्यमाने ऐतिहासिक कोरेगाव भीमा ...

थेऊर येथील ‘समाधान शिबिर’ भर पावसात उत्साहात संपन्न, हवेलीतील पानंद रस्त्यांसाठी भरीव निधी उपलब्ध...

0
लोणी काळभोर प्रतिनिधी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त व दिवंगत उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांच्या प्रथम जयंती निमित्त तसेच महसूल दिनाचे औचित्यसाधून, पंचायत...

error: Content is protected !!