लोणी काळभोर प्रतिनिधी
जिल्हा परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सौ. कोमल संदेश आव्हाळे यांनी अधिकृतपणे उमेदवारी अर्ज दाखल केला असून, आव्हाळवाडी–थेऊर जिल्हा परिषद गटात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. महापालिका निवडणुकीनंतर आता जिल्हा परिषद निवडणूक निर्णायक टप्प्यात पोहोचली असताना राष्ट्रवादी काँग्रेसने या गटात मजबूत उमेदवार उतरवल्याने लढतीला वेगळीच धार मिळाली आहे.
सामाजिक कार्य, महिलांच्या प्रश्नांवरील ठाम भूमिका आणि ग्रामविकासाच्या मुद्द्यांमुळे कोमल आव्हाळे यांना मोठा जनाधार लाभत असून, उमेदवारी अर्ज दाखल करताना पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. “सामान्य जनतेच्या विश्वासावर आणि विकासाच्या अजेंड्यावर निवडणूक लढवणार,” अशी भूमिका त्यांनी यावेळी मांडली.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या या हालचालीमुळे विरोधकांमध्ये अस्वस्थता पसरली असून, आव्हाळवाडी–थेऊर गटात आता सरळसरळ ताकदीची लढत होणार असल्याचे राजकीय जाणकारांकडून बोलले जात आहे. पुढील काही दिवसांत प्रचाराला आणखी वेग येणार असून, ही लढत कोणाच्या पारड्यात जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मुख्य संपादक चंद्रकांत दुंडे
8806043369














