Homeताज्या बातम्यादिल्ली पासुन गल्ली पर्यंत भाजपच्या विकास कामाचे कौतुक - कृष्णाआप्पा चौधरी...

दिल्ली पासुन गल्ली पर्यंत भाजपच्या विकास कामाचे कौतुक – कृष्णाआप्पा चौधरी कोरेगाव मुळ केसनंद गटात व गणात गुलाल भाजपचाच – नितीन हगवणे

लोणी काळभोर प्रतिनिधी – कोरेगाव – केसनंद जिल्हा परिषद गटातील भाजपाच्या उमेदवार सौ कविताताई विजय पायगुडे, कोरेगाव मूळ पंचायत समिती गणातील भाजपाचे उमेदवार सुरज चौधरी व केसनंद वाडेबोल्हाई पंचायत समिती गणातील उमेदवार कुशाल सातव यांना मतदारांची खंबीर साथ मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विकासासाठी ठेवलेला दृष्टिकोन तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली विकास कामे यामुळे दिल्ली पासून गल्ली पर्यंत राजकारण बदलले असुन कोरेगावमुळ गटातील तिन्ही उमेदवार निवडून येणार असुन कमळ फुलल्याशिवाय राहणार नाही.असे नायगाव ग्रामपंचायतीचे माजी सदस्य कृष्णा आप्पा चौधरी यांनी सांगितले .

केसनंद–कोरेगाव मूळ जिल्हा परिषद गटातील उमेदवार सौ कविताताई विजय पायगुडे व कोरेगाव मूळ पंचायत समिती गणातील भाजपाचे उमेदवार सुरज चौधरी या उमेदवारांना मतदारांचा उत्स्फूर्त व खंबीर पाठिंबा मिळत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. प्रचारादरम्यान गावोगावी होणाऱ्या भेटी, घराघरातील संपर्क व कोपरा सभांना नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत असून भाजपाच्या विकासाभिमुख धोरणांवर मतदारांनी विश्वास व्यक्त केला आहे.

प्रयागधामचे माजी तंटामुक्त अध्यक्ष नितीन हगवणे यांनी सांगितले की भाजपचे तीनहीउमेदवारांचा गुलाल निश्चित असुन सुरज चौधरी यांनी तळागाळातील लोकांच्या साठी कामे केली असुन जनमानसात आवरणारा कार्यकर्ता अशी ओळख आहे . आम्ही श्रीकाळभैरव नाथ पँनलच्या माध्यमातून करोडो रुपयांची नायगाव येथे कामे केली असून भाजपची खंबीर साथ सुरजला चौधरी यांना लाभली आहे .
त्यामुळे भाजपाच्या उमेदवारांनी आजपर्यंत केलेली विकासकामे, पारदर्शक कारभार, रस्ते, पाणीपुरवठा, शिक्षण, आरोग्य व मूलभूत सुविधांसाठी केलेले प्रयत्न यामुळे सर्वसामान्य जनतेत समाधानाची भावना आहे. याच कामांची पोचपावती म्हणून मतदार भाजपाच्या उमेदवारांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले असल्याचे नितीन हगवणे यांनी सांगितले .

प्रचारादरम्यान युवक, महिला, शेतकरी तसेच ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होत असून विकासासाठी भाजप अशी भावना मतदारांमध्ये दिसून येत आहे. अनेक गावांमध्ये उमेदवारांचे जल्लोषात स्वागत करण्यात येत असून निवडणुकीत भाजपाला मोठे यश मिळणार , असा विश्वास कार्यकर्ते व समर्थकांकडून व्यक्त केला जात आहे.

याबाबत माजी उपसरपंच उत्तमदादा शेलार यांनी सांगितले की सुरज चौधरी यांनी परिसरातील अनेक शाळेतील विदयार्थ्यांना वहया वाटल्या आहेत .करोनाच्या काळात अनेक जणांना किटचे वाटप केले आहे .करोनाच्या पेठ गावात करोना सेंटर उभारुन गावातील रुग्ण गावातच बरे केले आहे. त्यामुळे
केसनंद–कोरेगाव मूळ गट व गणात भाजपाच्या उमेदवारांना मिळणारी ही खंबीर साथ आगामी निवडणुकीत निर्णायक ठरणार असल्याचे स्पष्ट होत आहे.
मुख्य संपादक चंद्रकांत दुंडे
8806043369

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

*एमआयटी एडीटी विद्यापीठाचा तेजस पाटील भारतीय फेन्सिंग संघात!*

0
* लोणी काळभोर प्रतिनिधी चीनमधील शांघायात होणाऱ्या प्रतिष्ठित ‘फॉइल ग्रँड प्रिक्स’ स्पर्धेत करणार देशाचे प्रतिनिधित्व* पुणे : येथील एमआयटी आर्ट, डिझाईन आणि तंत्रज्ञान विद्यापीठ (एडीटी), लोणी-काळभोर,...

0
लोणी काळभोर प्रतिनिधी : अनिरुद्ध मराठे. येथील पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या माळी मळा परिसरात आज मंगळवारी (५ मे) रोजी सकाळी पेट्रोलजन्य टँकरच्या वेल्डिंगचे काम सुरू...

लोणी काळभोर येथील माळी मळा भीषण स्फोटामुळे हादरला.नागरीकांमध्यै घबराट.

0
ब्रेकिंग न्यूज लोणी काळभोर येथील माळीमळा येथे वेल्डिंग करतेवेळी झालेल्या स्फोटात एक जण गंभीर जखमी असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे यामुळे लोणी काळभोर परीसरात...

मोक्का गुन्हयातील येरवडा जेलमधून पळालेला व ६ वर्षासून फरार असलेला आरोपी जेरबंद : पुणे...

0
लोणी काळभोर : पुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) शनिवार (२ मे) रोजी मोक्का गुन्हयातील व येरवडा जेलमधून पळालेला ६ वर्षापासून फरार असलेला...

सोनाई इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये बारावी मध्ये पुन्हा शंभर टक्के निकाल

0
लोणी काळभोर प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण बोर्डाच्या 2 मे 2026 रोजी जाहीर झालेल्या (HSC) बारावीच्या परीक्षेत राज्यातील अनेक शाळा व कनिष्ठ...

error: Content is protected !!