Homeताज्या बातम्यालोणी काळभोर वि.वि.कार्यकारी सेवा सोसायटी पन्नास वर्षात प्रथमच बिनविरोध.

लोणी काळभोर वि.वि.कार्यकारी सेवा सोसायटी पन्नास वर्षात प्रथमच बिनविरोध.

लोणी काळभोर प्रतिनिधी
लोणी काळभोर विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेची निवडणूक कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रशांत काळभोर यांना बिनविरोध करण्यात यश आले असुन त्यांच्या नेतृत्वाखाली ५० वर्षानंतर सोसायटीची निवडणूक बिनविरोध झाली आहे.

लोणी काळभोर येथे १९७१ साली विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेची स्थापन काही शेतकऱ्यांनी एकत्र येऊन केली. या संस्थेच्या माध्यमातून भरीव कर्जवाटप, पिककर्ज आणि रासायनिक खतांची विक्री अशा स्वरुपाचे भरमसाठ कामे चालू असुन या संस्थेची निवडणूक प्रक्रिया २०२४-२०२५ते२०२८-२०२९ या कालावधीसाठी जाहीर करण्यात आली होती.

लोणी काळभोर विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेची निवडणूक प्रक्रियेत १३ जागांसाठी एकूण २६ अर्ज आले होते. त्यामुळे ही निवडणूक चुरशीची होणार असल्याची चर्चा पुणे जिल्ह्यात रंगली होती. परंतु २६ पैकी : १३ अर्ज माघारी घेतले त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध झाल्याचे सहकार विभागाच्या सहाय्यक अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी सोनाली देसाई यांनी घोषित केले.

ही निवडणूक प्रक्रिया प्रत्यक्षात लोणी काळभोर येथील संस्थेच्या कार्यालयात शुक्रवारी (ता. १४) पार पडली. कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रशांत काळभोर यांच्या नेतृत्वाखालील सर्व उमेदवार बिनविरोध निवडून आले आहे.

प्रशांत काळभोर यांनी सर्व उमेदवारांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. त्यानंतर सर्व कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण व फटाक्यांची आतिषबाजी करून मोठा जल्लोष साजरा केला. तर ५० वर्षानंतर निवडणूक प्रक्रिया बिनविरोध करण्यासाठी प्रशांत काळभोर यांनी महत्वाची भूमिका पार पाडली आहे. पुणे जिल्हात ज्या काही मोजक्या विकास सोसायटया नफ्यात आहेत त्यापैकी लोणी विकास सोसायटी अग्रगण्य आहे.

बिनविरोध निवडून आलेल्या सभासदांची नावे पुढीलप्रमाणे रमेश यशवंत भोसले (सर्वसाधारण खातेदार कर्जदार प्रतिनिधी), बाळासाहेब जयवंत काळभोर, राहुल दत्तात्रय काळभोर, गुरुदेव दत्तात्रय काळभोर, सागर बाळासो काळभोर, संजय लक्ष्मण काळभोर, बाळासाहेब पर्वतराव काळभोर, सचिन मुरलीधर काळभोर (सर्वसाधारण खातेदार कर्जदार प्रतिनिधी),

राजश्री उदय काळभोर (महिला प्रतिनिधी) संजय भिमराव भालेराव (अनुसूचित जाती / जमाती), हेमंत गंगाराम गायकवाड (इतर मागास प्रवर्ग) व अमोल सिदु कोळपे (वि.जा/भ.ज.वि.मा.प्र
मुख्य संपादक पुणे फास्ट न्युज.चंद्रकांत दुंडे
8806043369.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

*टिकली व टिळा धागा चालणार नाही पण हिजाब चालेल असा धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या...

0
लोणी काळभोर प्रतिनिधी हायवे कंपनी लेन्स कार्ड हे विवाद मध्ये सापडले आहे कंपनीचे सीईओ पियुष बंसल यांनी ग्रुमिंग गाईड असा एक स्टेटमेंट काढले आहे त्या...

लोणी काळभोर गावच्या शिरपेचात मानाचा तुरा .युवा समाजसेवक शिवराज काळभोर यांना अमेरिका आंतराष्ट्रीय विद्यापीठाची...

0
लोणी काळभोर प्रतिनिधी लहान वयापासून समाजसेवेत उल्लेखनीय कार्य करत युवकांमध्ये भक्कम ओळख निर्माण करणारे युवा समाजसेवक शिवराज मनोज काळभोर यांना “अमेरिका इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी”तर्फे समाजसेवा क्षेत्रातील...

संत निरंकारी मंडळातर्फे लोणी काळभोर येथे स्वच्छता अभियान.

0
लोणी काळभोर प्रतिनिधी पद्मश्री महाराष्ट्र भूषण डॉ. श्री. दत्तात्रय नारायण तथा आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या प्रेरणेने आणि डॉ. श्री. सचिन दादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनानुसार, महाराष्ट्र...

लोणी काळभोर बाजामळा दुंडे वस्ती येथे सलग दुसऱ्या दिवशी चोरांचा धुमाकूळ.

0
लोणी काळभोर प्रतिनिधी ब्रेकिंग न्यूज लोणी काळभोर बाजारमळा दुंडे वस्ती येथे चोरट्यांनी बंद घराचे कुलुप तोडून घरातील वायरींग स्विच आणि वाररींग कामाची हत्यारे असा सुमारे...

हवेली तालुक्यात शांततेत मतदान पार पडले.

0
लोणी काळभोर प्रतिनिधी आज हवेली तालुक्यात . जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या मतदान शांततेत पार पडले अनेक मतदान केंद्रावर साडेसहा ते सात पर्यंत रांगा...

error: Content is protected !!