Homeक्राईमलोणी काळभोर पोलिसांची कारवाई . खुनाचा प्रयत्न करुन फरारी झालेल्या आरोपींना बारा...

लोणी काळभोर पोलिसांची कारवाई . खुनाचा प्रयत्न करुन फरारी झालेल्या आरोपींना बारा तासाच्या आत केले गजाआड .

लोणी काळभोर प्रतिनिधी – दिनांक २८/०४/२०२५ रोजी रात्री ०१/४५ वा. चे सुमारास इसम नामे सुरज प्रशांत वाघमारे (वय १६ वर्षे व्यवसाय शिक्षण, पत्ता गोपाळपटटी मांजरी बुद्रुक ता. हवेली जि. पुणे ) हा ३ मित्रांसह प्रेम( पूर्ण नाव माहिती रा. कवडीपाट टोलनाका) याच्या कडे असलेल्या पैशांची मागणी करण्याकरीता गेले होते. त्यांना प्रेम याचे घर माहिती नसल्याने, कपडीपाट टोलनाका येथील इराणी चहाच्या हॉटेलजवळ थांबलेल्या ३ अनोळखी इसमांकडे शंकर कदम याने प्रेम याच्या घराबाबत विचारणा केली. त्यावेळी त्यांनी त्यास कारण विचारले असता त्याने प्रेम याच्या कडुन पैसे घ्यायचे आहेत असे सांगितले. त्यावर सदर ३ अनोळखी इसमांनी त्यांचे आणखी अनोळखी साथीदार यांना तेथे बोलावुन घेवून त्यांना हॉकी स्टीक व धारदार हत्याराने मारहाण करुन गंभीर जखमी केले. या मारहाणीमध्ये प्रेम याने त्याचेकडील धारदार हत्याराने शंकर कदम याच्या डोक्यावर वार करून त्यास जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. त्याचप्रमाणे त्यांनी शाहीद शेख याच्या देखील डोक्यात धारदार शस्त्राने वार करुन त्यास गंभीर जखमी केले. आहे. या बाबत लोणी काळमोर पोलीस ठाणेस दि. २८/०४/२०२५ रोजी गु. २. नं. १८५/२०२५ भारतीय न्याय संहीता कलम १०९ (१), ११८ (१), १८९ (२). १८९ (४), ३५२. ३५१ (3) भारतीय हत्यार कायदा कलम ४(२५) महाराष्ट्र पोलीस कायदा कालम ३० (१) सह १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करणेत आला आहे.

हा गुन्हा दाखल झाला त्यावेळी फिर्यादी यांनी प्रेम व त्याचे सोबतचे अनोळखी इसम यांचेविरुध्द तक्रार दाखल केली होती. गुन्हा दाखल झाला त्यावेळी आरोपींची नावे निष्पन्न झाली नव्हती . गुन्हा दाखल होताच गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेवून, पोलीस उप आयुक्त सतो. परिमंडळ ५ पुणे शहर व सहाय्यक पोलीस आयुक्त हडपसर विभाग, पुणे शहर यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे लोणी काळभोर पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी तात्काळ पोलीस ठाणेकडील अधिकारी व अंमलदार यांची पथके तयार करून त्यांना आरोपीचा शोध घेणेबाबत आदेश दिला.

लोणी काळभोर पोलीसांनी गुन्हा दाखल होताच फरार आरोपी प्रेम याचा गोपनिय बातमीदारांमार्फत बातमी प्राप्त करून, त्यास ताब्यात घेतले व त्याचेकडे तपास करुन गुन्हयातील इतर आरोपीतांची नावे निष्पन्न केली. त्यानुसार लोणी काळभोर पोलीसांनी १२ तासांच्या आत आरोपी १) अक्षय अशोक बदर (वय २८ वर्षे रा. लोणीकाळभोर ) २) प्रसाद खंडू ढोबळे (वय २१ वर्षे रा. कदमवाकवस्ती) यांची नावे गुन्हयात निष्पन्न करुन त्यांना अटक केली. असुन इतर ४ विधी संघर्षीत बालकांची देखील नावे निष्पन्न करुन त्यांना ताब्यात घेवुन, गुन्हा उघडकीस आणला आहे.

हा गुन्हा अनोळखी आरोपीं विरुध्द दाखल असताना तसेच सर्व आरोपी गुन्हा केल्यानंतर फरार झाले असताना देखील, १२ तासांच्या आत लोणी काळभोर पोलीसांनी गुन्हयाचा कौशल्यपुर्णरित्या तपास करुन तांत्रीक द भौतीक पुराव्यांच्या आधारे आरोपीतांची नावे निष्पन्न केली व त्यांना गुन्हयात अटक केले आहे. त्यामुळे अतिशय गंभीर स्वरुपाचा गुन्हा १२ तासांच्या आत उघडकीस आणण्यात लोणी काळभोर पोलीसांना पुन्हा एकदा यश आले आहे.

ही उत्कृष्ठ कामगिरी डॉ. राजकुमार शिंदे पोलीस उपआयुक्त, परिमंडळ ५. पुणे शहर व अनुराधा उदमले, सहा, पोलीस आयुक्त हडपसर विभाग, पुणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली लोणी काळभोर पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, राजेंद्र पन्हाळे, पोलीस उप निरीक्षक रत्नदिप बिराजदार, पो. उप निरी. सोनटक्के, पो. हवा, गणेश सातपुते, पो. हवा. रामहरी वणवे, पी. हया. विलास शिंदे, पो. शि. बाजीराव विर, पो. शि. प्रदिप गाडे, पो. शि. चक्रधर शिरगीरे, पो. शि. राहुल कर्डीले, पो. शि. सचिन सोनवणे, पो. शि. अमोल जाधव यांच्या पथकाने केली आहे.
मुख्य संपादक.चंद्रकांत दुंडे
संपर्क 8806043369.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

*एमआयटी एडीटी विद्यापीठाचा तेजस पाटील भारतीय फेन्सिंग संघात!*

0
* लोणी काळभोर प्रतिनिधी चीनमधील शांघायात होणाऱ्या प्रतिष्ठित ‘फॉइल ग्रँड प्रिक्स’ स्पर्धेत करणार देशाचे प्रतिनिधित्व* पुणे : येथील एमआयटी आर्ट, डिझाईन आणि तंत्रज्ञान विद्यापीठ (एडीटी), लोणी-काळभोर,...

0
लोणी काळभोर प्रतिनिधी : अनिरुद्ध मराठे. येथील पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या माळी मळा परिसरात आज मंगळवारी (५ मे) रोजी सकाळी पेट्रोलजन्य टँकरच्या वेल्डिंगचे काम सुरू...

लोणी काळभोर येथील माळी मळा भीषण स्फोटामुळे हादरला.नागरीकांमध्यै घबराट.

0
ब्रेकिंग न्यूज लोणी काळभोर येथील माळीमळा येथे वेल्डिंग करतेवेळी झालेल्या स्फोटात एक जण गंभीर जखमी असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे यामुळे लोणी काळभोर परीसरात...

मोक्का गुन्हयातील येरवडा जेलमधून पळालेला व ६ वर्षासून फरार असलेला आरोपी जेरबंद : पुणे...

0
लोणी काळभोर : पुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) शनिवार (२ मे) रोजी मोक्का गुन्हयातील व येरवडा जेलमधून पळालेला ६ वर्षापासून फरार असलेला...

सोनाई इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये बारावी मध्ये पुन्हा शंभर टक्के निकाल

0
लोणी काळभोर प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण बोर्डाच्या 2 मे 2026 रोजी जाहीर झालेल्या (HSC) बारावीच्या परीक्षेत राज्यातील अनेक शाळा व कनिष्ठ...

error: Content is protected !!