Homeराजकीययशवंत सहकारी साखर कारखाना वार्षिक सर्वसाधारण सभेत अभुतपूर्व गोंधळात सर्व विषय मंजूर

यशवंत सहकारी साखर कारखाना वार्षिक सर्वसाधारण सभेत अभुतपूर्व गोंधळात सर्व विषय मंजूर

लोणी काळभोर प्रतिनिधी
थेऊर येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याचा वार्षिक अहवाल, ताळेबंद व नफा-तोटा पत्रकांसह 6 विषय, विषय पत्रिकेवर घेउ 42 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन कारखान्याचे अध्यक्ष सुभाष जगताप यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते. ही सभा कोलवडी मांजरी खुर्द येथील लक्ष्मी गार्डन येथे रविवारी सकाळी अकरा वाजता अभूतपूर्व गोंधळास सुरुवात झाली. या सभेत कारखान्याचे कार्यकारी संचालक कैलास जरे यांनी वाचुन दाखवले त्यानंतर विशाल हरपळे यांनी कामगार व सभासद यांची बाजु मांडत सभा व्यवस्थित पार पाडण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले. सभेतील विषया व्यतिरिक्त काही माजी संचालकांनी कारखान्याच्या मालकीची 99.27 एकर जमीन विक्रीचा विषय छेडला.

थेऊर येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या वार्षिक अहवाल, ताळेबंद व नफा-तोटा पत्रकांसह सहा विषय, संचालक मंडळाने अभूतपूर्व गोंधळात आवाजी मतदानाने मंजूर करुन घेण्यात यश मिळवले. यावेळी काही ठराविक माजी संचालक व त्यांच्या समर्थकांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला. मात्र, सभासदांनी अधिक चर्चा होऊ न देता आक्रमक पवित्रा घेत संचालक मंडळाला पाठिंबा दिला. त्यामुळे यशवंतची सभा गोंधळात संपन्न झाली.सभेत गोंधळाचे वातावरण सुरु झाल्याने कारखान्याचे कार्यकारी कैलास जरे यांनी विषय पत्रिकेवरील सर्व विषय वाचून, उपस्थितांना ठराव मंजूर आहेत का? अशी विचारणा केली. यावर उपस्थित सभासदांनी सहाही ठराव मंजूर अशा घोषणा देण्यास सुरुवात केली. या गोंधळात घोषणा देत संचालक मंडळाने सभा आटोपती घेतली.

विकास लंवाडे यांनी कार्यकारी संचालक कैलास जरी हे खोटे प्रोसिडिंग करत असल्याचा आरोप केला 2012 व 13 चे प्रोसिडिंग कालबाह्य झाले असून मागचे विषय पुढे लागू होत नसल्याचे त्यांनी सांगितले तसेच राज्य सहकारी बँकेने 30 कोटी रुपयांची कारखान्याचे नुकसान केल्याचा आरोप केला त्यानंतर जमीन विक्री करताना गट नंबर वेगळे दाखवले असून प्रोसिडिंगमध्ये वेगळे दाखवले आहेत त्यामुळे कारखान्याचे व्यवहारावर संशय निर्माण होत असल्याचे विकास लवांडे यांनी सांगितले तसेच कोरेगाव मूळ येथील जागा पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीने पाच कोटी रुपये करणे घेतली असून थेऊर येथील जागा तीन कोटी रुपये एक राणी घेऊन 200 कोटीचा तोटा सबंध सभासदांचा होत असल्याचे सांगितले विकास लवांडे यांनी सांगितले की जमीन विक्रीला माझा विरोध नाही पण एवढ्या कमी किमतीत जमीन देऊन बाजार समिती व कारखाना सभासदांना तोट्यात घालत आहेत.

तशातच सभेत गोंधळाचे वातावरण सुरु झाल्याने कारखान्याचे कार्यकारी कैलास जरे यांनी विषय पत्रिकेवरील सर्व विषय वाचून, उपस्थितांना ठराव मंजूर आहेत का? अशी विचारणा केली. यावर उपस्थित सभासदांनी सहाही ठराव मंजूर अशा घोषणा देण्यास सुरुवात केली. या गोंधळात घोषणा देत संचालक मंडळाने सभा आटोपती घेतली.

यावेळी हवेली कृषी बाजार समितीचे विद्यमान सभापती प्रकाश जगताप, उपसभापती शशिकांत गायकवाड, कारखान्याचे उपाध्यक्ष किशोर उंद्रे, संचालक सुनिल कांचन, राहुल घुले, योगेश काळभोर, सुशांत दरेकर, विजय चौधरी, शशिकांत चौधरी, ताराचंद कोलते, नवनाथ काकडे, सागर काळभोर, रामदास गायकवाड, शामराव कोतवाल, हेमा काळभोर, रत्नाबाई काळभोर, दिलीप शिंदे, अमोल हरपळे रोहिदास उंद्रे मोहन म्हेत्रे, कुंडलिक थोरात माजी जेष्ठ संचालक पांडुरंग काळे,प्रताप गायकवाड ,कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रशांत काळभोर यांच्यासह सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सर्वसाधारण सभेचा वृत्तांत वाचून कायम करण्यात आला. संस्थेचे सन 2024-2025 या वर्षाचा संचालक मंडळानी सादर केलेला वार्षिक अहवाल, ताळेबंद व नफा-तोटा पत्रके स्वीकारणे व त्यांची नोंद घेणे. सन 2026-202 वर्षाकरिता संचालक मंडळाने तयार केलेल्या भांडवल महसुली अंदाजपत्रकाची नोंद घेण्यात येणार आहे. सन 2026-2027 या वर्षा करीता भांडवल उभारणीस संचालक मंडळास अधिकार देणे, 31 मार्च 2025 अखेरच्या वर्षातील वैधानिक लेखापरीक्षकांच्या अहवालाची नोंद घेण्यात येणार आहे. सन 2025-26 वर्षाकरीता शासनमान्य वैधानिक लेखापरीक्षकांच्या नामतालिकेमधून वैधानिक लेखापरीक्षकाची नेमणूक करणे व लेखापरीक्षण शुल्क ठरविणे. अंतर्गत लेखापरीक्षकाची नेमणूक करणे व लेखापरीक्षण शुल्क ठरविणे. हे विषय करण्यात आले आहेत.

संचालक मंडळाने सभेतून पळ काढला – राजेंद्र रतन चौधरी

आजच्या वार्षिक सभेत मागील सभा वृत्तांत वर चर्चा करत असताना चेअरमन व संचालक मंडळाला विचारलेले प्रश्न अवघड वाटल्याने कोणत्याही विषयावर चर्चा न करता सर्व विषय मंजूर मंजूर म्हणून संचालक मंडळ पळून गेले.
विषय क्रमांक एक चर्चा न होताच अर्धवट राहिला. विषय क्रमांक दोन व चार मध्ये चर्चेचे विषय चेअरमन व कार्यकारी संचालक यांना मी समक्ष लेखी व प्रादेशिक सहसंचालक पुणे यांना मेलद्वारे पाठवले होते . त्याची देखील उत्तरे देता आली नाहीत. नफा-तोटा पत्रकात 77.42 लाख ही तोडणी वाहतूक संस्थेची व्याजाची रक्कम दाखविल्याने तसेच स्टोअर्स व शिल्लक साठयाचे प्रत्यक्ष मोजदाद न केल्याने पूर्वीचे आकडे ताळेबंद मध्ये दाखविल्याने लेखापरीक्षकांनी प्रमाणित केलेली हिशोब पत्रके सत्य व वास्तव परिस्थिती दर्शवीत नाहीत. अशा अनेक प्रश्नांची उत्तरे देणे अवघड असल्याने संचालक मंडळांनी सभेतून पळ काढला असा आरोप राजेंद्र चौधरी यांनी केला
संपादक.चंद्रकांत दुंडे
संपर्क 8806043369

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

लोणी काळभोर गावच्या शिरपेचात मानाचा तुरा .युवा समाजसेवक शिवराज काळभोर यांना अमेरिका आंतराष्ट्रीय विद्यापीठाची...

0
लोणी काळभोर प्रतिनिधी लहान वयापासून समाजसेवेत उल्लेखनीय कार्य करत युवकांमध्ये भक्कम ओळख निर्माण करणारे युवा समाजसेवक शिवराज मनोज काळभोर यांना “अमेरिका इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी”तर्फे समाजसेवा क्षेत्रातील...

संत निरंकारी मंडळातर्फे लोणी काळभोर येथे स्वच्छता अभियान.

0
लोणी काळभोर प्रतिनिधी पद्मश्री महाराष्ट्र भूषण डॉ. श्री. दत्तात्रय नारायण तथा आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या प्रेरणेने आणि डॉ. श्री. सचिन दादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनानुसार, महाराष्ट्र...

लोणी काळभोर बाजामळा दुंडे वस्ती येथे सलग दुसऱ्या दिवशी चोरांचा धुमाकूळ.

0
लोणी काळभोर प्रतिनिधी ब्रेकिंग न्यूज लोणी काळभोर बाजारमळा दुंडे वस्ती येथे चोरट्यांनी बंद घराचे कुलुप तोडून घरातील वायरींग स्विच आणि वाररींग कामाची हत्यारे असा सुमारे...

हवेली तालुक्यात शांततेत मतदान पार पडले.

0
लोणी काळभोर प्रतिनिधी आज हवेली तालुक्यात . जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या मतदान शांततेत पार पडले अनेक मतदान केंद्रावर साडेसहा ते सात पर्यंत रांगा...

दिल्ली पासुन गल्ली पर्यंत भाजपच्या विकास कामाचे कौतुक – कृष्णाआप्पा चौधरी ...

0
लोणी काळभोर प्रतिनिधी - कोरेगाव - केसनंद जिल्हा परिषद गटातील भाजपाच्या उमेदवार सौ कविताताई विजय पायगुडे, कोरेगाव मूळ पंचायत समिती गणातील भाजपाचे...

error: Content is protected !!