उरुळी कांचन , प्रतिनिधी (सुनील तुपे ) उरुळी कांचन, ता. हवेली येथील सामाजिक कार्यकर्ते तथा हवेली तालुका भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे सदस्य व उरुळी कांचन चे माजी उपसरपंच रामदास तुपे यांना मूकनायक मैत्री संघ व संघ नायक न्यूज २०२५ सामाजिक सेवा गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले, ता. १३ जानेवारी रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन सासवड येथे मूकनायक मैत्री संघ आणि संघ नायक न्यूज आयोजित ३१ जानेवारी १९२० रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेल्या मूकनायक या वृत्तपत्राच्या १०५ स्थापना दिनाच्या निमित्ताने आणि संघ नायक न्यूजच्या ८ व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने विविध क्षेत्रातील ८० मान्यवरांना संघ नायक न्यूजचा २०२५ गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले, याप्रसंगी रामदास तुपे यांना सामाजिक सेवा पुरस्कार , बाळकृष्ण काकडे यांना प्रशासकीय सेवा पुरस्कार , अल्फाज न्यूज चैनलचे राजेखान पटेल पत्रकारिते बद्दल, हनुमंत वाबळे यांना पत्रकारितेबद्दल, बाळासाहेब बडेकर सामाजिक सेवा पुरस्कार, नवनाथ कांबळे सामाजिक सेवा पुरस्कार, अरुण खरात प्रशासकीय सेवा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले, याप्रसंगी पुरस्कार सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून बहुजन हक्क परिषदेचे अध्यक्ष सुनील धिवार, रिपाई नेते विष्णू दादा भोसले, राष्ट्रीय प्रबोधनकार श्रीकांत होवाळ, शिवव्याख्याते संजय भालेराव होते तर स्वागत संघ नायक न्यूज चे अमोल लोंढे यांनी केले तर सूत्रसंचालन संघनायक न्यूज चे संपादक प्रा. सदाशिव कांबळे यांनी केले.
मुख्यसंपादक – चंद्रकांत गुलाब ढुंडे
या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी” संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. संपर्क :-
+918806043369









