मुंबई | महाराष्ट्रनगर–चिताकॅम्प
मुंबई महापालिकेच्या वॉर्ड क्र. १४३ (महाराष्ट्रनगर–चिताकॅम्प)मध्ये यंदाची निवडणूक केवळ राजकीय लढत नसून, घराघरांतील वेदना, संघर्ष आणि आशेची चाचपणी ठरत आहे. झोपडपट्टी असो वा गृहनिर्माण सोसायटी — पाणी, सांडपाणी, स्वच्छता, आरोग्य आणि सुरक्षिततेच्या समस्यांनी हैराण झालेल्या या परिसरात गेली तीन दशके निःस्वार्थ सेवा करणारे ‘नळवाले दाजी’ म्हणून ओळखले जाणारे सदाशिव तुकाराम बालगुडे आज विश्वासाचे प्रतीक झाले आहेत.
नळातून पाणी आणण्यासाठी पहाटेपासून रात्रीपर्यंत घराघरांत धावणारे दाजी बालगुडे केवळ पाणीपुरवठा करणारे नव्हते, तर प्रत्येक कुटुंबाच्या जगण्याशी जोडलेला आधार होते. आजारी व्यक्तीसाठी रुग्णालय, विद्यार्थ्यांसाठी शाळा, महिलांसाठी सुरक्षित पाणी व स्वच्छतेची व्यवस्था — अशा असंख्य कामांत त्यांनी स्वतःला झोकून दिले. त्यामुळेच नागरिक त्यांना प्रेमाने ‘नळवाले दाजी’ म्हणतात.
या सेवाभावी परंपरेला पुढे नेण्यासाठी आता त्यांच्या धर्मपत्नी सौ. केशर सदाशिव बालगुडे मैदानात उतरल्या आहेत. “ज्यांनी आमच्या घरात पाणी आणले, ज्यांनी आमच्या अडचणी आपल्या मानल्या, त्यांच्याच कुटुंबातील व्यक्ती आमची प्रतिनिधी व्हावी,” अशी भावनिक भावना नागरिक व्यक्त करीत आहेत. महिलांमध्ये तर हा विषय श्रद्धेचा बनला असून, “पाणी ही जीवनरेषा आहे आणि दाजींनी ती जपली; आता त्या सेवेच्या पुण्याईसाठी केशरताईंना निवडून देणे हे आमचे कर्तव्य आहे,” असे गृहिणी सांगत आहेत.
धर्म, संस्कार आणि सेवा या तिन्हींचा संगम या निवडणुकीत दिसून येत आहे. मंदिरात देवापुढे दिवा लावून, मशिदीत दुवा मागून, घराघरांतून एकच प्रार्थना केली जात आहे — “आमच्या प्रश्नांची सेवा करणाऱ्यालाच सत्ता मिळू दे.”
१५ तारखेला शिट्टीच्या चिन्हासमोर बटन दाबून सौ. केशर सदाशिव बालगुडे यांना निवडून देणे, हे केवळ मतदान नाही तर कृतज्ञतेचे आणि श्रद्धेचे प्रकटीकरण आहे, अशी भावना वॉर्ड १४३ मधील सामान्य कुटुंबांतून उमटत आहे. “आमचा उमेदवार आम्हीच निवडला आहे, आणि त्याला विजयी करणे हीच आमची खरी पूजा आहे,” असा ठाम निर्धार नागरिकांनी व्यक्त केला आहे.














